Powered by Blogger.

Wednesday, 21 December 2016

सिनेमा बदलतोय
स्वाती हुद्दार
समाज जीवनाचे प्रतिबिंब कलाकृतीत उमटत असते. मग ती चित्रकला असो, साहित्य असो, नाटक असो की आजचे लोकप्रिय माध्यम सिनेमा असो. माणूस जे जगतो, तेच तो कलेतून मांडत असतो. म्हणूनच आदिमानवाने रेखाटलेल्या चित्रांमधून त्यावेळचे समाजजीवन शोधण्याचा प्रयत्न केला जातो. अजिंठा-वेरूळच्या शिल्पकृतीतून तत्कालिन जीवनशैलीचा धांडोळा घेतला जातो. विविध साहित्यिकांच्या कलाकृतींमधून त्यांच्या आयुष्याविषयीचे आडाखे बांधले जातात. गायकांच्या शैलीतून त्यांच्या गायकीचे घराणे, त्यांच्या गायकीवरील प्रभाव याचा अंदाज बांधला जातो. कुठलीही कलाकृती मनोरंजनासाठी असली तरी ती कलाकाराच्या मनोव्यापाराची, समाजजीवनाची निदर्शक असते.
आदिम काळापासूनच मानव कलाप्रिय आहे. रोजचे रहाटगाडगे हाकताना त्याला दोन घटकांचा विरंगुळा हवा असतो. या प्रेरणेतूनच आदिवासी नृत्य, संगीत जन्माला आले. पुढे मानव जसजसा प्रगत होत गेला तसा संगितिका आणि पुढे नाटके असा कलेचा प्रवास झाला. नाटकांनीही खूपशी स्थित्यंतरे अनुभवली. विष्णुदास भाव्यांच्या पौराणिक आख्यानांपासून तरल मनोव्यापार रेखाटणाऱ्या एलकुंचवार आणि तेंडुलकरांच्या प्रायोगिक रंगभुमीपर्यंत आणि आता त्याही पुढे जाऊन रोजच्या जगण्याचे प्रश्‍न मांडण्यापर्यंत. असाच प्रवास सिनेमाचाही झाला. राजा हरिश्‍चंद्र या पौराणिक सिनेमापासून सुरू झालेल्या सिनेमाने खूप वाटा वळणे घेतली. पौराणिक, ऐतिहासिक, संगीतप्रधान चित्रपटांपासून पुढे प्रेमाच्या विश्‍वात नेणारे देवानंदचे स्वप्नाळू सिनेमे, शो मॅन राज कपूरचे बुट पॉलिशसारखे वास्तवाला भिडणारे सिनेमे, दूर गगन कि छाव मे सारखे किशोर कुमारचे हसता हसता अंतर्मुख करणारे, दो बिघा जमीन, नयादौर सारखे सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारे सिनेमे, अंगुरसारखे कौटुंबिक, सामाजिक विषयांवरचे गुलजारचे हलके-फुलके सिनेमे आणि नंतर झंझावातासारखी सगळी सिनेसृष्टी आपल्या कवेत घेणारे अँग्री यंग मॅनच्या रुपात एक युग गाजविणाऱ्या अमिताभ बच्चनचे सिनेमे. त्याचवेळी नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, स्मिता पाटील, शबाना सारख्या कलावंतांना घेऊन जगण्याच्या प्रश्‍नांना भिडणारा समांतर सिनेमाही आपले वेगळेपण जपत आकाराला येत होता. त्यानंतर खान युग आले मैने प्यार किया, कयामत ये कयामत तक, कुछ कुछ होता है, मै हूँ ना पासून अगदी अलिकडच्या चेन्नई एक्‍सप्रेसपर्यंत लोकांना हसवणारा, प्रेमाच्या कथा आणि व्यथा रंगवणारा चित्रपट अलिकडे मात्र पुरता बदललाय. सिनेमाच्या शतकभराच्या प्रवासात अगदी सुरुवातीच्या काळात कुंकूसारखे अपवाद वगळता आणि पुढे फुल बने अंगारे सारखे काही सिनेमे सोडले तर सिनेमाच्या केंद्रस्थानी कधीही नसलेली स्त्री आता मात्र सिनेमाच्या मध्यवर्ती आहे. विशेष म्हणजे हे सिनेमे केवळ स्त्रीप्रधान नसून तिच्या मनाचे पापुद्रे उलगडणारे आहेत. द डर्टी पिक्‍चर सिनेमातून सिल्क स्मिता या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या जीवनाची नव्हे तिच्या व्यथेची कथा सांगणारा आणि त्याचबरोबर तिच्या मनाची पडझड दाखवणारा प्रयोग यशस्वी झाला. त्याचे श्रेय विद्या बालनच्या समर्थ अभिनयाला जाते. त्यानंतर आलेला कहानीमधल्या देशद्रोही यंत्रणेविरुद्ध एकाकी लढा देणारी विद्या बापची ठसा उमटवून जातेच, मात्र खरा हळवा करतो तिचा सिनेमाच्या शेवटचा पती आणि पोटातल्या बाळाच्या विरहात केलेला आक्रोश.
त्यानंतर असाच लक्षात राहिला प्रियंकाच्या अभिनयाने सजलेला मेरी कोम, मेरी कोमचा कारकीर्दीतला संघर्ष आणि जीवनातलाही संघर्ष खूप छान चित्रित केला आहे. त्यानंतर मनात घर करून जाते नीरजाची कहाणी. पतीच्या जाचामुळे आत्मविश्‍वास गमावलेली नीरजा अपहरण झालेल्या विमानातील अतिरेक्‍यांचा कणखरपणे सामना करते आणि शेवटी अनेकांचे जीव वाचविण्यासाठी प्राणांची आहुती देते. मध्यंतरी फारसा लक्षात न राहिलेला मधुर भांडारकरचा हिरोईन हा देखील स्त्री केंद्री सिनेमा.
अलिकडे आलेल्या पिंकने बदलत्या सिनेमावर शिक्‍कामोर्तब केले आहे. एकूणच बदलत जाणारी समाजव्यवस्था, पर्यायाने प्रवाहाबरोबर बदलत जाणारी स्त्री, मात्र तिचे बदलणे मान्य नसणारा समाज. त्यातून निर्माण झालेला संघर्ष. तिचे उशीरापर्यंत बाहेर थांबणे, तिचे मित्रांबरोबर पार्टीला जाणे, तिची मैत्री या सगळ्या गोष्टींवरून तिचे चारित्र्य ठरवले जाते. तिला गृहीत धरले जाते. आणि त्याविरुद्ध तिने आवाज उठवला तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. वेशभुषेने, राहणीने आधुनिक झालेली, मोठ्या शहरात उशीरापर्यंत काम करणारी, एकटी राहणारी स्त्री मनाने अजूनही कणखर झालेली नाही. तिच्या मॉडर्न शरीराच्या आत एक हळवे मन आहे. तिचे निर्णय घेण्याचा तिला अधिकार आहे. तिला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. हे समाजाला आजही मान्य नाही. शरीरापलिकडे तिच्यावर प्रेम करणारा, तिला समजून घेणारा मित्र तिला हवा आहे, दीपक सहगल या वकीलाच्या रुपाने पिंकमधल्या तिघींना एक ज्येष्ठ मित्र सापडतो. त्यांची लढाई लढणारा. कुठल्याही फायद्याची अपेक्षा न करता. शेवटपर्यंत त्यांना साथ देणारा सच्चा साथी.
मै हॉट हूँ, इसलिये पिक्‍चर का ऑफर दे रहे हो क्‍या? असा थेट प्रश्‍न आपल्या मित्राला विचारणारी डिअर जिंदगीमधली कायरा अशीच भिडते. मै सिर्फ साथ सोने के लिये मॅच्युअर्ड हूँ क्‍या? असेही ती सरळच विचारते. कायराचा हा प्रश्‍न सगळ्यांच्याच मनातला प्रश्‍न असतो. प्रेमभंगानंतर तिचे कोलमडणे, स्वत:शीच भांडणे, पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करणे आणि त्या दरम्यान मानसोपचारतज्ज्ञ जहागिर खानचे तिच्या आयुष्यात येणे, त्या दोघांच्या संवादातून उलगडत जाणारी जिंदगी प्रेक्षकांनाही डिअर वाटायला लागते. genious is about knowing when to stop असे सांगत त्याच्यात गुंतत गेलेल्या कायराला योग्य मार्गावर नेत अलगदपणे सोडून देणारा जग हुरहुर लाऊन जातो. रघुची मैत्री आणि सिनेमाची ऑफर नाकारणारी कायरा चक दे इंडियामधील शाहरुखच्या हॉकीच्या टीममधील आत्मसन्मानासाठी सुप्रसिद्ध क्रिकेटपटूचे प्रेम नाकारणाऱ्या प्रीती सबरवालची आठवण करून देते. खूप अपेक्षा घेऊन आलेला कहानी 2 स्त्रीत्वाचाच प्रश्‍न मांडणारा, सो कॉल्ड उच्चभ्रू घरातही न कळत्या वयात मुलींचे होणारे शोषण या सामाजिक प्रश्‍नाला वाचा फोडणारा हा सिनेमा आणि त्या शोषणाविरुद्ध एकाकी झुंज देणारी विद्या सिन्हा मनाला चटका लाऊन जाते.
महिलांचे स्वस्त्व, त्यांचा आतमसन्मान, त्यांची घुसमट या सगळ्यांचे चित्र अलिकडे सिनेमात उमटायला लागले आहे, त्यानिमित्ताने तरी महिलांच्या प्रश्‍नांवर समाज जागृत होईल, अशी अपेक्षा करूया...
पिंकमध्ये तिघींच्या आत्मसन्मानाची लढाई लढणारा दीपक सहगल आणि आयुष्याचे तुकडे जोडण्यासाठी कायराला मदत करणारा जहागिर खान कुठल्यातरी रुपात प्रत्येकीच्याच आयुष्यात असावा, या शुभेच्छांसह.

Saturday, 19 November 2016

नभं उतरू आलं
पाऊस बेधुंद बरसत होता. मी अंतर्बाह्य बरसत होते. या पावसाशी सूर कधी जुळले नेमकं आठवत नाही. आठवतं तेव्हापासून हा हवाहवासाच वाटला. सखा वाटला. लहानपणी हा आला की नाचऱ्या पावलांनी अंगणभर हुंदडायचे. शाळेसाठी घैतलेल्या कोऱ्या करकरीत वह्यांची पानं फाडून त्याच्या नावा तयार व्हायच्या. पावसाच्या पाण्यात नावा सोडून त्यांचं दूर दूर जाणं बघत राहायचं. प्रवाहाबरोबर हेलकावत जाणारी नाव बघत टाळ्या पिटायच्या. मनसोक्‍त भिजल्यानंतर आईच्या उबदार पदरानं खसखसून केस पुसायचे. थंडी वाजते म्हणून बोलणी खात तिच्याच कुशीत शिरायचं.
बालपण सरलं. पावसाचे नवे संदर्भ आकळले. बरसणाऱ्या बेधुंद सरींमध्ये मित्रमैत्रिणींच्या घोळक्‍यात घेतलेल्या कट चहाची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय. पुढे सख्याच्या हातातहात गुंफून अनुभवलेल्या पाऊसधारा, त्या क्षणापासून तर पाऊस जीवलग झाला, तो कायमचाच. सख्याबरोबर पावसाची आठवण आणि पाऊस आला की सख्याची आठवण, ह त्रैराशिकच तयार झालं. पुढे लग्न झाल्यानंतरची पहिली आषाढी पौर्णिमा. माहेरी होते. पाठवणी करताना आईनी ओटी भरली. भरलेल्या आटीतले चार दाणे आईच्या पदरात परत टाकताना तिच्या तृप्त डोळ्यात वात्सल्याचं आभाळं दाटून आलं आणि बाहेर बरसणारा पाऊस माझ्या डोळ्यातूनही पाझरू लागला. आईनी भरलेल्या ओटीनं माझ घर आणि मन दोन्हीही समृद्ध झालं.
या पावसाची रुपं तरी किती? कधी धुवॉंधार, कधी रिमझिम. धुवॉंधार बरसतो, तेव्हा तेव्हा एखाद्या सराईत वादकानं मृदंगावर थाप मारावी असा नादमधुर ध्वनी उत्पन्न होतो. रिमझिम बरसतो, तेव्हा वाटते की कान्ह्यानं जणू बासरीवर हळवी सुरावट छेडली आहे, मग मी "मी' उरतच नाही. माझी राधा होते आणि सभोवतालची सगळी सृष्टी गोकुळ होते. सघन आभाळ आपलं सगळं प्रेम पाऊससरींच्या रुपानं वसुंधरेच्या ओटीत टाकतं आणि सुरू होतो धरतीचा सृजनसोहळा. तृप्तीचं समाधानाचं हिरवकंच तेज धरतीच्या अंगांगावर विलसू लागतं. सारी सृष्टी सुगंधानं न्हाऊन निघते, पाऊसथेंब अंगावर झेलत जाईच्या मांडवाखाली कळ्या खुडताना तो धुंद सुगंध तनामनात भरून राहतो. त्या सुगंधानं अवघं जगणं सुगंधीत होतं. घर जवळ करण्याची ओढ लावणारी संध्याकाळ आणि नेमकी ती वेळ साधून कोसळणारा पाऊस यांची कायम युती असते. दिवे लागणीची वेळ, ओढाळ मन, बरसणारा पाऊस आणि सजणाची वाट बघत डोह्यांची झालेली निरांजन, हे सगळं म्हणजे एक अनोख भारलेपण. ढळत्या तिन्हीसांजेला पावसाच्या रिपरिपीत गोधनालाही घररी परतण्याची घाई असते. अशावेळी एखादे चुकार वासरू णकटेच मागे पडते. वृक्षाच्या अश्रयाला जाते. थंडीने थरथरणारी त्याची काया, व्याकुळ डोळे हळवा हंबर काळीज पिळवटून टाकतो. त्यावेळी मात्र म्हणावसं वाटतं, जरा उसंत घे रे बाबा! फक्‍त ते वासरू त्याच्या आईपाशी पोहोचेपर्यंत थांब, मग हवा तेवढा बरस.
काहीजणांसाठी पाऊस म्हणजे खोळंबा, पाऊस म्हणजे चिखल, पाऊस म्हणजे चिकचिक, पाऊस म्हणजे किचकिच
माझ्यासाठी मात्र पाऊस म्हणजे अलवार, पाऊस म्हणजे हळुवार, पाऊस म्हणजे हळवा, पाऊस म्हणजे बावळा, पाऊस म्हणजे संगीत आणि पाऊस म्हणजे मनमित सुद्धा.
पावसानं यावं, धुंद बरसावं, मस्तीत कोसळावं, वसुंधरेवर चितारावी सुंदर नक्षी... आणि त्याचं बरसणं ओसरल्यानंतर मी व्हावं, त्या दूरच्या तारेवर भिजलेले ओले पंख वाळवत पंखात चोच खूपसलेला एक पक्षी
स्वाती हुद्दार

मनमीत
पाऊस...
सृष्टीची आरास
धुंद मधुमास
पाऊस...
भिजलेलं अंगण
भावनांची गुंफण
पाऊस...
कृष्णवेडी राधा
शुभ्र जलधारा
पाऊस...
हळवा मृद्‌गंध
मन बेधुंद
पाऊस...
पक्ष्यांचं कुजन
धरतीच सृजन
पाऊस...
शहारली प्रीत
पाऊस मनमीत

स्वाती हुद्दार

भेदाची अभेद्य भिंत
स्वाती हुद्दार
इंट्रो
जपानमधील प्रायव्हेट रेल्वे कंपनीने महिलांवर निर्बंध लादणारी एक जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आणि जपानी माध्यमांमध्ये गदारोळ उठला. या जाहिरातीच्या निमित्ताने स्त्री स्वातंत्र्याच्या संकल्पनांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महिलांना सल्ले देणे किंवा त्यांच्यावर निर्बंध लादणे, पर्यायाने सोपे असते. त्यामुळे त्यांनी किती वाजता बाहेर पडू नये, किती वाजेपर्यंत परत यावे, कोणते कपडे परीधान करावे, नोकरी करावी की करू नये, शिकावे की शिकू नये, हे सगळे त्यांना सांगितले जाते, हे केवळ भारतातच होते असे नाही, तर संपूर्ण जगातच कमीअधिक प्रमाणात महिलांना सल्ले दिले जातात. महिलांची नटण्या-मुरडण्याची आवड, साड्या-कपड्यांची आवड, दागिन्यांची आवड, त्यांच्या गप्पा हे तर नेहमीच टवाळीचे विषय असतात. महिलांच्या नटण्यामुरडण्यावर समाजाचा किती आक्षेप असावा, हे सिद्ध करणारी घटना नुकतीच घडली, तीही जपानसारख्या देशात.
टोकीयोतील टोकीयो कार्पोरेशन या प्रायव्हेट रेल्वे कंपनीने महिलांनी ट्रेनमध्ये मेकअप करू नये, असे सुचविले आहे. आणि त्यासाठी चक्‍क जपानमधील सावा निरुमा या अभिनेत्रीला घेऊन एक जाहिरात तयार करण्यात आली आहे, त्यामध्ये ती म्हणते, जपानी महिला मुळात सुंदर आहेत, मात्र ट्रेनमध्ये मेकअप करून त्या कुरुप दिसायला लागतात. तीस सेकंदाच्या या जाहीरातीत शेवटी निरुमा म्हणते, प्लिज डु नॉट पुट ऑन मेकअप ऑन द ट्रेन.
प्रायव्हेट रेल्वे कंपनीच्या या जाहरातीवर अपेक्षेप्रमाणेच जपानी महिलांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडिया आणि ट्‌वीटरवर कंपनीच्या या जाहीरातीवर आक्षेप नोंदवले गेले. महिलांनी ट्रेनमध्ये मेकअप करू नये, हे सांगणे एकवेळ ठिक आहे, मात्र मी सुंदर दिसते की कुरुप, हे सांगण्याचा रेल्वे कंपनीला अधिकार नाही, अशी तिखट प्रतिक्रिया एका महिलेने ट्‌विटरवर नोंदवली असून याला एक दोन नव्हे तर तब्बल पाच हजार आठशे वेळा रिट्‌विट करण्यात आले आहे.
एवढेच नव्हे तर महिलांच्या मेकअपवर आक्षेप घेणाऱ्या कंपनीला काही ट्‌विटमधून रेल्वेत पुरुष मंडळी करीत असलेल्या स्मोकिंग आणि व्यसनांची आठवण करून देण्यात आली आहे. जपानी माध्यमांमध्येही हा विषय खूप गाजतो आहे. त्यावर टीकाही होते आहे. मात्र तरीसुद्धा रेल्वे कंपनी ही जाहीरात मागे घेण्यास तयार नाही.
एकीकडे ऍब सरकार लैंगिक भेदभाव संपविण्यासंदर्भात पुढाकार घेत असताना रेल्वे कंपनीच्या अशा प्रकारच्या जाहीराती काही वेगळाच संदेश देत आहेत, एवढेच नव्हे जपानी न्यायालयाने महिला लग्नानंतर माहेरचे आडनाव वापरू शकणार नाही, असा निर्णय नुकताच देऊन महिला अधिकार आणि हक्‍कांवर प्रश्‍नचिन्हच लावले आहे. लेट वुमन शाईन हे घोषवाक्‍य घेऊन जपान सरकार कॅपेनिंग करीत असतानाच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारा नुकत्याच झालेल्या ग्लोबल जेंडर गॅप अहवालात जपानचे स्थान 144 देशांमध्ये 111 वे आहे आणि ते याआधीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत 10 स्थानांनी मागे गेले आहे.
जपानमधील या घटना तर केवळ दाखले आहेत, महिलांसंदर्भातील पुरुषी मानसिकतेचे. वैज्ञानिक प्रगतीने अवकाश भेदण्याचे तंत्र अवगत केलेल्या मानवाला स्त्री-पुरुष भेदाच्या भिंदी भेदण्यात मात्र अजूनही यश आलेले नाही, असेच खेदाने म्हणावे लागेल.

Saturday, 5 November 2016

लढा खरेच यशस्वी?
स्वाती हुद्दार
इंट्रो
हाजी अली दर्ग्याच्या व्यवस्थापनाने महिलांच्या दर्गा प्रवेशाला परवानगी देत अनपेक्षितपणे षट्‌कारच ठोकला आहे. मंदिर, मशीद प्रवेशासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांचा हा वरकरणी विजय ठरत असला तरी स्त्री स्वातंत्र्याच्या लढ्याने अखेरचा टप्पा गाठला आहे, असा याचा अर्थ होतो का? महिलांचे मूलभूत प्रश्‍न या लढ्याने सुटणार आहेत का? आणि विशेष म्हणजे या विजयाने महिला आता पूर्णपणे सबल व अधिकारसंपन्न झाल्यात, असे समजता येऊ शकते काय? तर याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. अर्थात, म्हणून या संघर्षाचे आणि यशाचे महत्त्व नाकारता येणार नाही. स्त्री सन्मानाच्या, अस्मितेच्या लढ्याची ही नांदी निश्‍चितच आहे.
हक्‍क, अधिकार आणि कर्तव्य या विषयीचा स्त्री-पुरुष संघर्ष हा सनातन आहे. कधीतरी समाजात रुजलेली मातृसत्ताक पद्धती काळाच्या ओघात पुरुषसत्ताक पद्धतीत परावर्तित झाली आणि स्त्री-पुरुष शारीरिक भेदाचा किंबहुना स्त्रीच्या अबलत्वाचा परिणाम पुरुषी मक्‍तेदारीत आणि पुरुषी एकाधिकारशाहीत झाला. पुढे धर्म, रीतिरिवाज यांचे निमित्त करून स्त्रीवर निर्बंध लादले गेले. काळ बदलला. सावित्रीच्या कृपेने स्त्री शिक्षणाची पहाट झाली. परिणामी आपल्या अधिकार-हक्‍कांविषयी स्त्री जागरूक झाली आणि सुरू झाला सत्याग्रह. अनेक उदारमतवादी पुरुषांनीही या लढाईत स्त्रीची साथ दिली. नव्हे अनेकदा त्यांनीच पुढाकार घेतला आणि बालविवाह, सतीप्रथा, केशवपन अशा रानटी प्रथांना तिलांजली मिळाली. स्त्रीने पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षितिजे पादाक्रांत केली तरीही बरेच हीन उरलेच आहे. त्यासाठी सुरू आहे अव्याहत संघर्ष. गेल्या वर्षी शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर एका महिलेने चुकून पाऊल ठेवले आणि एका नव्या संघर्षाची ठिणगी पडली. धर्माच्या ठेकेदारांनी हलकल्लोळ केला. शनी चौथऱ्याचे शुद्धीकरण करण्यात आले. त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकालाही व्यवस्थापनाने नोकरीवरून कमी केले. आजच्या काळातही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिलांना दिली जाणारी हीन वागणूक पाहून तृप्ती देसाई आणि त्यांची भूमाता ब्रिगेड या अन्यायाविरुद्ध उभी ठाकली. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आणि न्यायालयाने महिलांना मंदिर प्रवेशाची अनुमती दिली. पुढचा टप्पा होता कोल्हापूरच्या मंदिराचा. तोही यशस्वी झाला. त्यानंतर त्र्यंबकेश्‍वराचे शिवमंदिर. तृप्ती देसाईंच्या संघर्षानंतर तोही तिढा सुटला. त्यानंतर सुरू झाली हाजी अली दर्ग्याच्या प्रवेशाची चळवळ. एप्रिल 2016 ला मुस्लिम समुदायाच्या प्रचंड जनक्षोभामुळे तृप्ती देसाई आणि मंडळींचा पहिला दर्गा प्रवेश अयशस्वी ठरला. त्यानंतर 12 मे 2016 रोजी दुसऱ्या प्रयत्नात पोलिस संरक्षणात त्यांना दर्ग्यात प्रवेश मिळाला; पण मजारपर्यंत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. मात्र दर्गाप्रवेशाच्या संघर्षाला एकदम कलाटणी मिळाली आणि प्रत्यक्ष हाजी अली ट्रस्टनेच दर्ग्यात महिलांना प्रवेशास हरकत नसल्याचे सांगून अनपेक्षित धक्‍का दिला. देशात एकीकडे समान नागरी कायद्याची चर्चा सुरू असताना एका धर्मपीठाने घेतलेली माघार अचंबित करणारी पण आशादायक आहे. शनी चौथऱ्यापासून सुरू झालेल्या एका अस्मितेच्या लढाईत केवळ एका वर्षातच महिला शक्‍तीचा विजय झाल्याचे वरकरणी दिसत असले तरी हा केवळ पुरुषसत्ताक मानसिकतेवर आणि व्यवस्थेवर भारतीय धर्मनिरपेक्ष कायद्याच्या माध्यमातून मिळविलेला तांत्रिक विजय आहे. याचा अर्थ पुरुषी मानसिकता बदलविण्यात आणि खऱ्या अर्थाने आधुनिक समाज निर्माण करण्यात यश मिळाले आहे, असे मुळीच नाही. अर्थात, ही जीत प्रतीकात्मक असली तरी महत्त्वाची आहेच, कारण वर्षानुवर्षांची समाज मानसिकता बदलण्याची प्रक्रिया यामुळे निश्‍चितच सुरू झाली आहे. पण तृप्ती देसाई, त्यांची भूमाता ब्रिगेड आणि भारतीय मुस्लिम महिलांची चिकाटी आणि संघर्ष निश्‍चितच कौतुकास्पद आहे. मात्र, केवळ मंदिर किंवा दर्गा प्रवेशाने मूलभूत प्रश्‍न संपणार नाहीत. ज्या दिवशी हुंड्यासाठी एखादी स्त्री बळी जाणार नाही, ज्या दिवशी स्त्री अत्याचाराच्या घटनांची संख्या शून्य होईल. रात्री उशिरा घराबाहेर असलेल्या स्त्रीचे कुटुंबीय घरी निश्‍चिंत झोपू शकतील. तिच्या कपड्यांवरून तिचे चारित्र्य ठरवले जाणार नाही. तिचे काही अवयव पुरुषांपेक्षा निराळे आहेत म्हणून तिला दुय्यम समजले जाणार नाही. तिच्या भावनांचा, विचारांचा व शरीराचाही आदर केला जाईल. तिची छेड काढली जाणार नाही. तिला नकोसे स्पर्श केले जाणार नाहीत. तिला नकोशा नजरांचा सामना करावा लागणार नाही आणि तिचा नकार हा नकारच समजला जाईल, त्या दिवशी हा लढा पूर्णत्वास जाईल. यानिमित्तानेच मुस्लिम महिलांच्या "तीन तलाक'चाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याला धार्मिक आयाम असेलही. पण कोणताही धर्म वा धार्मिक कायदा कुणावरही अन्याय करणारा असू शकत नाही. भविष्यात अशा अन्यायाची चिन्हे दिसत असतील, संकेत मिळत असतील तर त्यात योग्य त्या सुधारणा करण्याची परिपक्‍वताही सर्व समाजधुरिणांना दाखवावी लागणार आहे. तोपर्यंत मंदिर, दर्गा प्रवेशाच्या सोपस्कारांना आणि स्त्री हक्‍काची लढाई न्यायालयात किंवा वाटाघाटीच्या टेबलावर जिंकण्याला तसा फारसा अर्थ नाही. स्त्रीविषयीच्या आदराचा विचार जेव्हा प्रत्येक पुरुषाच्या मनात प्रकाशमान होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा लढा यशस्वी होईल.


Saturday, 22 October 2016

चार ‘चाँद’
 स्त्री हक्‍कां च्या संघर्षाला शतकभराचा काळ नक्‍कीच लोटला आहे. मात्र,
शतकाच्या संघर्षानंतरही भारतीय स्त्री दोन धृवांवर वि भाजित झाली आहे.
एकीकडे नकोशीचा जन्मा ला येण्या साठीचा संघर्ष, तोंडी तलाकवि रुद्ध
मुस्लिम महि ला देत असलेला लढा, एक-दोन दिवसांआड ऐकायला येणाऱ्या
स्त्री अत्या चाराच्या अगणि त घटना, तर दुसरीकडे संपूर्ण जगाने अभि मानाने
कुर्नि सात करावा, असा फोर्ब्ज च्या यादीतील भारतीय महि लांचा समावेश.
यंदा तब्बल चार भारतीय महि लांचा
समावेश फोर्ब्ज ने जाहीर केलेल्या
शंभर प्रभावशाली महि लांच्या
या दीत करण्यात आला आहे.
त्यात अव्वल स्था नावर आहेत,
एसबीआयच्या व्यवस्था पकीय
संचालक अरुंधती भट्टाचार्य , आयसीआयसीआय
बॅंकेच्या व्यवस्था पकीय संचालक चंदा कोचर,
बाय ोकॉनच्या संस्था पक कि रण मुझुमदार शॉ आणि
एचटी मीडिया च्या प्रमुख शोभना भारतीय.
या चौघींनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
करून जागतिक परि घावर नाममुद्रा उमटवली आहे.
आणि या निमित्ता ने महि लांच्या जागतिक इतिहासात
भारतीय महि लांच्या नावाने एक सोनेरी पान लिहि ले
गेले आहे.
२०१६ च्या फोर्ब्ज च्या या दीत एसबीआयच्या
व्यवस्था पकीय संचालक अरुंधती भट्टाचार्य
पंचवि साव्या स्था नावर आहेत. चंदा कोचर
चाळि साव्या स्था नावर आहेत, कि रण मुझुमदार
शॉ सत्त्याहत्तराव्या स्था नावर आहेत आणि शोभना
भारतीय ९३ व्या स्था नावर आहेत. भट्टाचार्य आणि
कोचर या ंनी कर्ज परताव्याच्या दृष्टीने योग्य पावले
उचलत भारतीय अर्थ व्यवस्था रुळावर आणण्यात
महत्त्वा ची कामगि री बजावली आहे. आणि पुरुषी
मक्‍ते दारीच्या अर्थ कारण क्षेत्रातही आपल्या यशस्वी
पाऊलखुणा उमटवल्या आहेत. चंदा कोचर एवढेच
करून थांबल्या नाहीत, त्यांनी त्यांच्या संस्थे तील
महि ला कर्म चाऱ्यांसाठी वर्षभर घरून काम करण्याचा
निय म अंमलात आणून महि लांना दिलासा दिला आहे.
कि रण मुझुमदार शॉ या ंनी वैद्यकीय क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या संस्थे चा
समावेश जगातील २० प्रमुख संस्थां मध्ये झाला आहे.
वि ज्ञान पत्रिकेने नि वडलेल्या या २० संस्थां मध्ये
मुझुमदार शॉ या ंची एकमेव आशीया ई संस्था आहे.
शोभना भारतीय संपादकीय संचालक असलेली एचटी
मीडिया संस्था ही भारतातील अग्रगण्य माध्यमांपैकी
एक आहे. जागतिक कीर्ती संपादन करणाऱ्या या
भारतीय महि लांची जडणघडण मात्र पुरती भारतीयच
आहे. व्यवसाया तली यशस्वि तेची बि रुद दूर सारली
तर त्याही घर संसारावर प्रेम करणाऱ्या भारतीय
स्त्री आहेत. यंदाच्या फोर्ब्ज च्या या दीत समाविष्ट
असलेल्या पेप्सी को कंपनीच्या सीईओ मूळ भारतीय
वंशाच्या असलेल्या इंद्रा नुयी म्हणतात, घरी परतताना
मी माझा व्यावसायि क मुकुट उंबरठ्या बाहेर ठेऊनच
घरात प्रवेश करते. माझ्या घरी मी असते एक प्रेमळ
आई, कर्त व्यदक्ष पत्नी , आदर्श मुलगी, अशी विवि ध
नाती अभि मानाने मि रवणारी एक स्त्री. खूप बोलकी
प्रतिक् रिया आहे ही इंद्रा नुयींची.
फोर्ब्ज च्या या दीत यंदा ४० व्या स्था नावर
असलेल्या चंदा कोचर या ंनी त्यांच्या लेकीला
आरतीला खूप सुंदर पत्र लिहि ले आहे. त्यांच्या
जीवनातला संघर्ष, व्यावसायि क जबाबदाऱ्या आणि
कौटुंबि क जबाबदाऱ्यांचा त्यांनी साधलेला समतोल,
मुलीच आणि त्यांचं घट्ट वीणीचं नातं या सगळ्याचे
पदर या पत्रात अलगद उलगडले आहेत. त्या म्हणतात,
जीवनात मोठे होताना तत्त्वां शी फारकत घेऊ नकोस,
सहवासातल्या प्रत्येक व्यक्‍ती च्या भावनांचा आदर
कर आणि चि ंतांना कधी स्वत:पेक्षा मोठे होऊ देऊ
नकोस. अत्युच्च पदावर पोहोचलेल्या या स्त्रिया ंच्या
जीवनाचे हे हळवे पैलू पाहि ले की, जाणवतं मातृत्व ही
बेडी नाही, तर बळ आहे, उभं राहण्याचं. आवश्‍य कता
आहे, केवळ व्यवसाय आणि संसार या तील समतोल
साधण्याची. तुमच्या माझ्या मनात काय म जागे
असलेली आईपणाची चि रंतन भावना
‘उडता पंजाब’ चित्र पट प्रचंड वादानंतर एकदाचा प्रदर्शि त
झाला. पण, त्यामुळे उठलेला धुरळा खाली बसायला
काही अवधी जावा लागेल. या निमि त्ताने सेन्सॉर,
त्याचे अधि कार हे विषय पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
स्वा भाविकच सि ने अभि नेते-अभि नेत्रींनी या वादात
उडी घेतली. ‘क्‍वी न’ चित्र पटासाठी राष्ट्रीय पुरस्का र
मि ळविणाऱ्या कंगना राणावतनेही यानिमि त्ताने स्त्रियांची
अंतर्व स्त्रे समाजासाठी धोकादायक कशी? असा ति खट
प्रश्‍न उपस्थित केला आणि नैति क-अनैति कतेच्या
संकल्पना पुन्हा एकदा चर्चे त आल्या
कंगनाच्या ‘क्‍वी न’ चित्र पटातील एका
दृश्‍यात हस्तक्षे प करीत सेन्सॉ रने
ते दृश्‍य ब्लर करायला लावले
होते. उडता पंजाबच्या निमि त्ताने
उद्भवलेल्या वादात कंगनाने पुन्हा
हा मुद्दा उपस् थित केला. तो बरोबर की चूक हा
वेगळा वि षय. पण, केवळ फॅशन सि ंबॉल समजल्या
जाणाऱ्या अभि नेत्रीह ी आता सामाजि क वि षयांवर
मत नोंदवायला लागल्या आहेत, हा सुखद बदल
आहे. या आघाडीच्या अभि नेत्री केवळ सामाजि क
वि षयांवर मत नोंदवत नाह ीत, तर अनेक सामाजि क
कार्य ांशी नि गडि तही आहेत.
जया बच्चन, हेमा मालि नी या तर खासदार
या नात्याने सामाजि क वि षय मांडून राजकीय
आखाडा गाजवत आहेतच. मात्र, अलीकडच्या
पि ढीतील अभि नेत्रीह ी यात मागे नाह ीत, हे
महत्त्वा चे. पूर्वा श्रमीच्या टीव्ही कलाकार आणि मोदी
सरकारमधील मानव संसाधन वि कासमंत्री स्मृ ती
इराणी यांनी नुकताच बिहा रच्या शिक्ष णमंत्र्याने त्यां ना
ट्विटरवर डि अर संबोधले, म्हणून गहजब केला होता.
तो कदाचि त राजकीय प्रसिद्धी चा भाग असेल. पण,
एखाद्या स्त्रीला गृहीत धरून सार्व जनि करीत्या ति ला
एखादे संबोधन वापरणाऱ्यां ना यानिमि त्ताने चपराक
नक्‍की च बसली असेल.
अत्यं त ताकदीने नीरजा साकारणारी अभि नेत्री
सोनम कपूर एलीजि बीटी (लेस्बि यन, गे)
कम्युनि टीसाठी कार्य रत आहे. या कम्युनि टीच्या
कशि श क्‍वि र फि ल्म फेस्टि व्हलच्या उद् घाटनाच्या
वेळी सोनमने समलैंगि कता हा मूलभूत मानवी
अधि कार आहे, असे ठामपणे सांगि तले. आणि
समाजातील अलीकडच्या एका ज्वलंत वि षयाचे
निर्भी डपणे समर्थन केले.
काह ी दिवसांपूर्वी करि ना कपूर-खान या
आघाडीच्या अभि नेत्रीने युनि सेफच्या लखनौ येथील
कार्यक्र मात चक्‍क मासि क पाळीचा वि षय छेडला.
महिलांच्या आरोग्याशी नि गडि त असलेली मासि क
पाळी हा वि षय नेहमी बंद दारा आडच बोलला
जातो, परि णामी महिलांना आरोग्याच्या अनेक
समस्यां चा सामना करावा लागतो, असे सांगत
मासि क पाळीवि षयी खुलेपणाने बोला आणि या
काळात स्वच्छतेकडे वि शेष लक्ष द्या, असे ति ने
कळकळीने सांगि तले. करि ना एवढ्यावरच थांबली
नाह ी, या वि षयासंबंधाने ग्रामीण महिलांमध्ये जागृती
करण्यासाठी करि ना रत्नागि री, जालंधर आणि मथुरा
या शहरांचाह ी दौरा करणार आहे.
कान्स फि ल्म फेस्टि व्हलकडे साऱ्या फॅशन
जगताचे लक्ष असते. माजी विश्‍व सुंदरी आणि
आघाडीची अभि नेत्री ऐश् वर्या राय-बच्चन
ही गेल्या पंधरा वर्ष ांपासून कानची वारी करते
आहे. लॉरि एल पॅरि सची ब्रॅण्ड ॲम्बे सॅडर
असलेल्या ऐश् वर्या यंदा रेड कार्पेटवर पर्पल
लि पस्टिक लाऊन अवतरली आणि सोशल
मीडिय ावर बऱ्या-वाईट प्रतिक् रियांचा पाऊस
पडला. काहींनी बोल्ड फॅशन स्टे टमेंट म्ह णून
ऐश् वर्या ला नावाजले तर काहींनी फॅशन
डि झॉस्टर म्ह णून ति ला नावेही ठेवली. या
सगळ्या टीकांना शांतपणे उत्तर देताना ऐश् वर्या
म्ह णते मी कधीही फॅशन टरेण् ्डला बांधील
राहि ले नाही. लॉरि एल पॅरि सची ॲम्बे सॅडर या
नात्याने त्यांची अपेक्षा पूर्ण करणे, ही माझी
व्यावसायिक जबाबदारी आहे. समाजमान्य
रूढ फॅशन संकल्पनांवि रोधात ठाम उभे राहणे,
हा एल्गा रच आहे.
कान्स महोत्सवाच्या वेळी आराध्या
रडायला लागल्यानंतर तिथ ली आंतरराष्ट्रीय
पत्रक ार परि षद सोडून आपले आईपणाचे
कर्त व्य नि भावण्यासाठी तिथ ून नि घून जाणाऱ्या
या भारतीय अभि नेत्रीने एक आगळा आदर्श
जगासमोर ठेवला होता.
चित्र पट अभि नेत्रींचे वि शेष स्थान
समाजमानसामध्ये निश्‍चि त असते. आपले
व्यावसायिक आयुष्य सांभाळतानाच
सामाजिक बांधीलकीची जाण ठेवत या
अभि नेत्री आपल्या परीने सामाजिक कार्या तही
सहभागी होत आहेत, हे चित्र अत्यंत
आशादायी आहे.
swati huddar
सांगा कसं जगायचं?
समृद्ध सांस्कृतिक पार्श् भूमी लाभलेल्या
मध्य-पूर्व आशियातील शांतत ा काही
माथेफिरूंच्या आक्रस्ता ळेपणाने भंग झाली
आहे. इथल्या उद् ध्वस्त वर्त मानाच्या सर्वाध िक
बळी ठरताहेत इथल्या महि ला. बलात्कार,
जबरदस्ती ने लादलेले बालवि वाह, प्राथमिक
सुविध ांचाही अभाव, प्रचंड मारझोड, दुसऱ्या
देशात आश्रयाला जाण्याच्या प्रय त्नात होणारी
ससेहोलपट हेच यांचे प्राक् तन आहे. ही कहाणी
आहे मरणापेक्षाही भयंकर जगण्याची.
मध्य-पूर्व आशिया. गेल्या पाच वर्ष ांपासून युद्धाच्या
ज्वा लामुखीत होरपळणारा दुर्दैवी प्रदेश. इसि ससारख्या
कट्टरवादी संघटनांनी दावणीला बांधलेली इथली जनता. पाच
वर्ष ांपूर्वी कि लबि लणाऱ्या शाळा आता ओस पडल्या आहेत.
घराघरांव र गोळीबाराच्या , बॉम्बह ल्ल्या च्या खुणा दिसताहेत. वस्त्या
उजाड झाल्या आहेत. आपली हक्‍का ची घरे, हक्‍का चा प्रदेश, संपत्ती सगळे
त्या गून, इराक-सीरि या सोडून जो-तो मि ळेल त्या मार्गान े युरोपात कि ंवा
आजूबाजूच्या देशांमध्ये पळून जाण्या च्या प्रयत्ना त आहे. आतापर्यं त ४.५
मिलि यन जनतेने सीरि यातून पळ काढला आहे. त्या पैकी ८० टक्‍के महिला
आणि मुले आहेत. १० टक्‍के जनता युरोपमध्ये गेली असून बाकीच्य ांनी
शेजारच्या लेबनॉन, जॉर्डन आणि टर्कीसारख्या देशांमध्ये आसरा घेतला
आहे. शरणार्थी शिबि रे ओसंडून वाहत आहेत.
युद्धग्रस्त इराक-सीरि याच्या भकास आणि उदास खुणा सर्वाधि क
दिसतात इथल्या महिला आणि मुलांच्या चेहऱ्याव र. युद्ध पुरुष करतात
आणि भरडली जातात बायका-मुले. याला इतिह ास साक्षी आहे. मग
ते जागति क महायुद्ध असो, हिटलरने केलेला ज्यूं चा नृशं स छळ असो,
अमेरि केने जपानव र केलेला बॉम्बह ल्ला असो की भारत-पाकि स्तान
विभ ाजनादरम्यान झालेली महिलांची वि टंबना असो.
इराक आणि सीरि यातील महिलांची स्थि ती यापेक्षा वेगळी नाही .
शरणार्थी शिबि रांमध्ये दररोज होणाऱ्या छळापेक्षा मरण सोपं वाटावं ,
ही परि स्थि ती. इराकमधील सुलेमनिआहमधील शरणार्थी शिबि रात
वास्तव्या ला असलेल्या २० वर् षीय झैनेबने असाच आत्मह त्ये चा प्रयत्न
केला होता. कुटुंबाबरोबर शरणार्थी शिबि रात राहत असताना वडील
जबरदस्तीन े लग्न लावून देणार होते. त्या छळाला कंटाळून झैनेब पळाली
आणि तिन े आत्मह त्या करण्या चा असफल प्रयत्न केला. अशा अडीच
लाखांच्याव र झैनेब शरणार्थी शिबि रांमध्ये आजही आहेत. इथल्या तरुण
मुलींचे सख्खे नातेवाईक पैशांसाठी त्य ांना वि कत आहेत. पैशांसाठी त्य ांना
वेश्‍या व्यव साय करण्या स भाग पाडत आहेत. शिबि रांत होणाऱ्या बलात्का र
आणि मारझोडीला तर सीमाच नाही .या महि लांच्या अन्न, पाणी, कपडे या प्राथमि क
गरजाही पूर्ण होत नाहीत. शरणार्थी शिबि रांत इतकी
गर्दी आहे की, ६० टक्‍के महि ला उघड्यावरच
राहतात. लाजकाज गुंडाळून या महि लांना सगळी
नि त्यकर्मे बाहेरच उरकावी लागतात. परि णामी या
महि लांच्या आरोग्याचा प्रश् न आवासून उभा राहि ला
आहे. सततच्या दहशतीने यांच्यातील अनेक जणींचे
मानसि क संतुलनही ढासळले आहे.
सगळ्यात मोठ्ठा प्रश् न आहे गर्भ वती महि लांचा.
या महि लांच्या बाळंतपणाची कुठलीही काळजी घेणे
शक्‍य नसल्याने, अनेकदा त्यांचा गर्भ पात होतो.
अनेक महि लांचा बाळंतपणादरम्यान मृत्यूही होतो.
आजघडीला सीरिय न शरणार्थी महि लांमध्ये
तरुणींची संख्या ३ लाखांच्या जवळपास आहे. २१
हजारांच्या जवळपास गर्भ वती महि लाही आहेत.
अनेकदा हे गर्भा रपण जबरदस्ती ने लादलेलेच असते.
हा छळ, ही अवस्था अत्यंत वेदनादायी आहे.
अलीकडे युरोपमधील अनेक स्वय ंसेवी संस्था या
महि लांच्या संरक्षणासाठी पुढे आल्या आहेत; परंतु
वेदनांच्या तुलनेत उपचार अत्यंत तोकडा आहे.
जिथ े आभाळच फाटले आहे, तिथ े ठिगळे तरी कि ती
जोडणार?
मध्य-पूर्व आशिय ातील ही अस्थि र राजकीय
स्थि ती कधीतरी संपुष्टात येईल, नि दान या नि ष्पा प
महि लांसाठी तरी तो दि वस यावा, शरणार्थी
शिबि रातील कुबट, कुजट जगण्यापासून त्यांची
सुटका व्हा वी, त्यांच्या गोऱ्या गुलाबी चेहऱ्यावर
पुन्हा हास्य उमलावे, त्यांचे हक्‍का चे उबदार घरटे
त्यांना पुन्हा लाभावे, या आशेसह...
swati huddar
त्या तिघी
भावी जीवनाची स्वप्नं डोळ्या त उमललेली मात्र
दहशतवादी हल्ल्या त उमलण्या आधीच भूतकाळ
ठरलेली एक. दुसरी या लाजि रवाण्या हल्ल्या नंतर ही
दहशतवादी कृत्ये करणारी माणसे इस्लाम ला बदनाम
करीत आहेत, दहशतवाद समूळ नष्ट करणार, अशी
प्रतिक् रिया देणारी बांगलादेशची पंतप्रधान शेख हसीना
आणि ति सरी गेली अडीच दशके आपल्या च देशातून
परागंदा असलेली जागति क ख्या तीची लेखि का
डॉ. तस्लिम ा नसरीन. बांगलादेशातील या भ्या ड
हल्ल्या नंतर इस्लाम ला शांततेचा धर्म म्हणणे आता
बंद करा, अशी तीव्र प्रतिक् रिया देणारी. त्या ति घी
खरेतर अगदी वेगळ्या , मात्र या घटनेने एका सूत्रात
बांधल्या गेलेल्या .
दहश तवादाने अवघे जगच वेठीस धरले आहे.
ऐन रमजानच्या महि न्या त बांगलादेशस ारखा
छोटासा देशह ी दहश तवादी कृत्या ने होरपळून
नि घाला. कट्टर माथेफिर ूंनी २० परदेशी
नागरिक या हल्ल्या त नि वडून मारले.
त्या तीलच एक तारुषी जैन. १९ वर्षांची कोवळी भारतीय
तरुणी. कॅलि फोर्नि यातील वि द्यापीठात शिकत असलेली. मूळचे
भारतातील उत्तर प्रदेशातील फि रोजाबादचे असलेले जैन कुटुंब.
व्यवसायानिमि त्त बांगलादेशात स्थायिक झालेले.
तारुषी कुटुंबीयांना भेटायला बांगलादेशात आली
होती. इफ्ता र पार्टीस ाठी मित्रां बरोबर हॉटेलमध्ये गेली आणि
दहश तवाद्यां च्या अमानुषतेची बळी ठरली. ति चा दोष हा कीति थली स्थानिक भाषा ति ला बोलता येत
नव्हती, ति ला कुराणातले आयते म्हणता येत
नव्हते आणि ती परदेशी नागरिक होती.
तारुषीच्या मृत्यू ने जगाचे रहाटगाडगे
निश्‍चि तच थांबणार नाही; मात्र ति च्या
कुटुंबीयांचे जग मात्र उद् ध्वस्त झाले आहे. अशा
अमानुष हल्ल्यां मध्ये आजवर जगभरातल्या
अशा अगणि त तारुषींचे आयुष्य संपले आहे.
घटनेनंतर दोन दिवस बातम्यां मध्ये स्था न, काळी
फीत लावलेले मूक मोर्चे , आणि मेणबत्ती, पुढे
काय, केवळ पुढच्या हल्ल्या ची वाट...
दुसरी स्त्री मात्र बांगलादेशची सरगाना.
सत्ता आणि अधिक ार हातात असलेली.
राजकारण आणि समाजकारणावर प्रभाव
असलेली. या भ्या ड हल्ल्या नंतर त्यां नी केलेले
हे वि धान केवळ भावनिक वक् तव्य ठरू नये.
दहश तवादावि रुद्ध कठोर पावले उचलून तो
संपवि ण्या च्या दृष्टीने त्यां च्या सरकारने जागतिक
प्रक्रियेचा एक भाग बनणे अपेक्षि त आहे.
राजकारणाचा अनेक दशक ांचा अनुभव गाठीशी
असलेल्या आणि दोन वेळा बांगलादेशाचे
पंतप्रधानपद भूषवि लेल्या शेख हस ीना ही अपेक्षा
नक्‍की च पूर्ण करतील, अशी अपेक्षा करू या.
तिस रीही कट्टरवादाची बळी. बांगलादेशात
जन्मलेल्या तस्लि मा नसरीन यांनी वयाच्या
१३ व्या वर्षी लेखणी हातात घेऊन सीमापार
लोकप्रियता मि ळवली. अनेक पुरस्का रांच्या
मानकरी ठरलेल्या तस्लि मांनी चुकीच्या रूढी
परंपरांवर प्रहार केले आणि त्या कट्टरवाद्यां च्या
हि टलि स्टवर गेल्या . त्यां ना जि वे मारण्यास ाठी
अनेक फतवे जारी करण्या त आले.त्यां च्या साहि त्या वर बांगलादेशात बंदी घालण्या त आली.
आपल्या च देशातून परागंदा होण्या ची वेळ तस्लि मांवर आली. १९९४
पासून बांगलादेशातून आणि २००७ पासून पश्‍चि म बंगालमधूनही
तस्लि मांना हद्दपार करण्या त आले आहे. अभि व्यक्‍ती स्वा तंत्र्या ची
गळचेपी करण्या चा हा प्रकार सलमान रश् दींच्या ही वाट्याला आला
आहे. अनेक जागति क सन्मा न प्राप्त केलेल्या तस्लि मांना एक महि ला
पंतप्रधान असलेल्या त्यां च्या च देशाची दारे मात्र बंद आहेत. तरीही
मृत्यू ची भीती त्यां चे विचार आणि लेखणी थांबवू शकली नाही. मातीची
नाळ तुटत नसते. बांगलादेशातील घटना तस्लि मांना अस्वस्थ करतात
त्या लिहि ताहेत अव्या हत. ट् विटरसारख्या माध्यमांमधूनही व्यक्‍त
होताहेत. तस्लि मांसारख्यां चे विचार कधीतरी कट्टरवाद्यां च्या मनात
स्पंद ने निर्मा ण करू शकतील? माणसाने माणसाला अमानुषपणे मारून
टाकण्या चा हा सि लसि ला वैश्‍वि क प्रयत्नां नी कधीतरी संपुष्टात येईल
आणि तस्लि मांनासाठीही त्यां च्या देशाची दारे उघडली जातील,
swati huddar
श्‍यामरंग
आज कि ती
दि वसांनी
अशी नि वांत
संध्याकाळ पसरली आहे घरादारावर.
मावळत्या सूर्याची प्रकाशतिरीप
दारातून थेट आत आली. ते प्रकाशात
परावर्तित झालेले धूलि कण थेट
३५-४० वर्षे मागे घेऊन गेले आणि
संध्याकाळचे केरवारे करणा री आईची
ओणवी प्रति मा डोळ्यासमोर उभी
राहि ली. झाडताना आईच्या वेणीचा
लांब शेपटा पाठीवर रुळाय चा,
तेव्हा आई कि ती सुंदर दि साय ची!
ति च्या हालचालीसह ती प्रकाशति रीप
मागेपुढे व्हाय ची, त्यामध्ये चमकणा रे
धूलि कण चि मुकल्या हातात
पकडण्यासाठी मीही आईच्या
अवतीभोवती फि राय चे. एव्हा ना
खि डकीतून दि सणा रं सूर्यबि ंब
लालकेशरी झालेलं असाय चं.
पडवीतल्या झोपाळ्यावर झोके घेत
दारावरच्या चमेलीच्या अर्धोन्मीलि त
कळ्यांचा गजरा गुंफण्यात आजीचे
हात गुंतलेले असाय चे. त्याचवेळी
ती उजव्या पाया चा रेटा देत झोका
घ्यायची तेव्हा झोपाळ्याच्या पि तळी
कड्यांचा मधुर आवाज व्हाय चा.
तख्तपोसावर आजोबा पंचांगात
काहीतरी वाचत बसलेले असाय चे.
अधून-मधून आजीच्या बोलण्याला
ते त्यांच्या खास लकबीत हुंकार
भराय चे. एव्हा ना बाहेर अंधा रून
याय ला लागलेलं असाय चं आणि
अंगणा त बाबांच्या साय कलची घंटी
वाजाय ची. त्या आवाजाबरोबर
आई हातातलं काम टा कून
स्वय ंपाकघराकडे चहा ठेवाय ला
धा वाय ची, तेव्हा ति च्या बोटा तल्या
जोडव्यांचा लयबद्ध आवाज व्हाय चा.
आईची आतली चहाची लगबग
ति च्या बांगड्यांच्या मंगलमय
किणकिण ीतून जाण वत राहाय ची.
गोठ्यातल्या वासरांचा हंबर
आणि रानातून परतणा ऱ्या गाय ींचा
हंबर एकमेकांत मि सळले जाय चे.या गोधनाच्या गळ्यातील घुंगरांचा आवा ज वा ताव रण अधि कच करुण
कराय चा. वाड् याच्या अंगणात हुंदडणारे लहा नग्यांचे आवा ज हळूहळू अंधारात
बुडत जाय चे. मध्येच अंगणातल्या मोठ्या विह िरीच्या खि राडीचा आवा ज अंधार
भेदत जाय चा. हा तातला गजरा पूर्ण करून आजी दुखऱ्या गुडघ्यांनी देवघराकडे
चालू लागाय ची, तेव्हा ति न्ही सांज अंगणात उतरलेली असाय ची. नंदादीपा ची
वा त आजी थरथरत्या हा तानं स्थिर कराय ची आणि शि सवी देवघरातला देवीचा
मुखवटा त्या मंद प्रकाशात उजळून नि घाय चा. त्या देवीपुढे हा त जोडून उभ्या
असलेल्या आजीचा गोरापा न सात्त्विक, समाधानी चेहरा अधि कच तेजस्वी
दि साय चा. एव्हा ना ओसरीवर आजोबांची रामरक्षा सुरू झालेली असाय ची.
माता रामो मत्पि ता रामचंद्र:
स्वाम ी रामो मत्सखा रामचंद्र:
सर्व स्वंम े रामचंद्रो दयालूर
नान्यं जाने नैव जाने न जाने
या ओळी म्हणताना आजोबांच्या आवा जातला कंप वा ढलेला जाणवाय चा.
तुळशी वृंदाव नात लाव लेली पणती अंगणातल्या अंधाराचा ठाव घ्यायची. शेणानं
सारवलेल्या तुळशी वृंदाव नासमोर आजीनं सकाळी रांगोळीनं रेखलेलं स्व स्तिक
आता पुसट झालेलं असाय चं. घराघरांतून चुलीवर रटरटणाऱ्या भाताचा सुगंध
तनामनात भरून उराय चा. काव ळ्या-चि मण्यांची गोष्ट ऐकवत आईचे मऊसूत
हा त तूप-भाताचे घास भरवाय चे, तेव्हा पाप ण्या जडाव लेल्या असाय च्या.
अंगाचं मुटकुळं करून आजीच्या पा तळाची ऊबदार गोधडी अंगाव र घेत
आजीच्या कातर स्व रातलं ‘रवी गेला रे सोडूनी आकाशाला, नीज नीज माझ्या
बाळा’ ऐकताना डोळे मि टले जाय चे, तेव्हा गडद होत जाणाऱ्या काळ्याशार
आकाशातून रात्र घरांच्या लाल कौलांवरून अलगद उतरत असाय ची. आताह ी
रोज संध्याकाळ दाराशी येते, मात्र नवीन संदर्भ घेऊन. जुने संदर्भ , जुनी माणसं
काळाच्या ओघात मागे राहिली असली तर मन अजूनही ति थंच घुटमळतेय.
त्यामुळेच असेल कदाचि त ही अलीकडची सांज परकी वा टते. बस इतकंच
swati huddar
एक उत्तुंग माघार
मानवी हक् क कार्य कर्त्या इरोम चानू शर्मि ला यांनी गेली
१६ वर्षे ‘अफ्स्पा ’वि रोधात सुरू असलेला अन्न सत्या ग्रह
सरकारचा सकारात्मक प्रतिसाद नसल्या मुळे मागे घेण्या चा
निर्ण य घेतला आहे. आज या क्षणी जरी शर्मि लांचे आंदोलन
यशस्वी ठरले नसले, तरी त्यां ची अन्या यावि रुद्ध लढण्या ची
जिद्द अनेकांसाठी मार्ग दर्श क ठरणार आहे. कधीतरी
मणि पूरमधली बंडखोरी आणि त्यां ना दडपणारा अफ्स्पा या
दोन्हींना मणि पूरमध्ये स्था न राहणार नाही. इरोम शर्मि लांचा
त्या ग मात्र तेव्हा ही तेजाळत राहील, दीपस्तं भासारखा...
मणि पूर- सेव्हन सि स्टर्स पैकी भारतातील अति पूर्वेकडील छोटेसे
राज्य. केवळ नऊ जि ल्ह्यांचे. नि सर्गाने सौंदर्या ची भरभरून
लयलूट केलेला प्रदेश; मात्र गेल्या अर्ध्या शतकापासून अशांत.
सोयीसुविधांपासून, सुधारणांपासून कोसोदूर. काही माथेफ िरूंच्या
बंडखोरीने १९५०च्या दशकात हा प्रदेश, इथली व्यव स्था आणि नागरिकांना
वे ठीस धरले. परिणामी परिस्थि ती निय ंत्रणात ठेव ण्या साठी भारत सरकारने इथे
१९५८मध्ये सशस्त्र दल विशेषाधि कार कायदा (अफ्स्पा ) लागू केला.
सैन्या च्या विशेषाधि कारांमुळे परिस्थि ती निय ंत्रणात असली, तरी गालबोट
लावणाऱ्या काही घटनाही घडल्या . गेल्या २० वर्ष ांत लष्करी कारवायांमध्ये
१५२८ नागरिकांचा मृत्यू झाला. त्या मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्का रप्राप्त तरुणाचा
आणि अवघ्या १२ वर्ष ांच्या मुलाचाही समावे श आहे.
सैन्याच्या या कारवाईमुळे हळूहळू जनमत सरकार
आणि सैन्याच्या वि रोधात जाऊ लागले. मानवी हक्‍कांच ी
पायमल्ली केल्याबद्दल भारत सरकारवर टीका होऊ लागली.
२००० साली आसाम रायफल्स या नि मलष्करी दलाने
चक मकीत अति रेकी म्हणून १० नागरिक ांना ठार केले.
त्यामध्ये एका ६२ वर्षीय महि लेचाही समावेश होता. यामुळे
जनक्षो भ उसळला. ही चक मक बनावट असल्याच ा सर्रास
आरोप होऊ लागला. मानवाधिक ारासाठी मणि पूरमध्ये
आंदोलन उभे राहि ले आणि यातूनच उदयाला आले इरोम
चानू शर्मि ला यांचे नेतृत्व. त्या वेळी इरोम यांचे वय होते
केवळ २८ वर्षांच े. अफ्स्पावि रोधात त्यांनी प्राणांतिक अन्न
सत्याग्रह सुरू केला. तो गेली १६ वर्षे सुरू आहे. इरोम
शर्मि लांना पोलि सांनी आत्महत्येच्या प्रयत्ना च्या गुन्ह्याखाली
अटक केली आणि इम्फा ळच्या एका रुग्णा लयात नजरकैदेत
ठेवले. गेली १६ वर्षे इरोम यांना नळीद्वारे अन्न देण्यात
प्रशासन यश स्वी ठरले आहे.
इरोम यांच्या या सत्याग्रहाची दखल अनेक समाजसेवी
संघटनांनी घेतली. जागतिक पातळीवरही याची नोंद घेतली
गेली आणि मानवी हक्‍कांच ी पायमल्ली केल्याबद्दल भारत
सरकारवर टीकाही होऊ लागली.
१४ मार्च १९७२ रोजी कोंगपाल इम्फा ळ इथे
जन्मलेल्या इरोम शर्मि ला या नऊ भावंडांमधली एक.
बारावीपर्यंत शिक्ष ण घेतलेल्या इरोम यांनी अन्न सत्याग्रह
सुरू केल्यापासून आईची भेट घेतलेली नाही. अफ्स्पा रद्द
झाल्यानंतर उपोषण सोडताना आईच्या हाताने भात खाईन
तेव्हाच आईची भेट घेईन, अशी त्यांच ी जिद्द होती. मात्र,
इरोम यांचे १६ वर्षांच े उपोषण सरकारचा नि ग्रह मोडू शक ले
नाही. शेवटी इरोम यांनीच माघार घेत अन्न सत्याग्रह सोडून
आंदोलनाचा दुसरा मार्ग पत्करण्याच े ठरवले आहे आणि
तसे जाहीरही केले आहे.
९ ऑगस्ट रोजी १६ वर्षांच ा अन्न सत्याग्रह त्यागून
इरोम शर्मि ला पुढच्या वर्षी मणि पूरमध्ये होऊ घातलेली
वि धानसभेची नि वडणूक अपक्ष लढवणार आहेत आणि
सांसदीय मार्गा ने अफ्स्पावि रोधातला लढा सुरूच ठेवणार
आहेत.
इरोम शर्मि ला यांच्या अन्न सत्याग्रहाची सरकारने
दखलही घेतली नसली, तरी या १६ वर्षां त भारतातूनच
नव्हे , तर परदेशातूनही या आंदोलनाला पाठि ंबा मि ळाला.
शर्मि ला आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
महाराष्ट्रातून अण्णा हजारेंचा या सत्याग्रहाला पाठि ंबा
मि ळाला. मणि पूर प्रदेश ऑल इंडिय ा तृणमूल काँग्रेस
आणि सीपीआयएमएलनेही हे आंदोलन उचलून धरले.
उपोषणाच्या ११व्या वर्षी इरोम यांच्या सन्मा नार्थ शंभर
महि लांनी नवी दि ल्लीत मानवी शृंखला तयार केली होती.
शर्मि लांच्या ३९व्या वाढदि वसानिमि त्त पुणे वि द्यापीठाने
पदवीच्या ३९ मणि पुरी वि द्यार्थि नींसाठी शि ष्यवृत्तीच ी घोषणा
केली. २०१४ साली ८ मार्च या जागतिक महि लादि नी टॉप
वुमन आयक ॉन ऑफ इंडिय ा या सन्मा नाने इरोम यांना
सन्मानि त करण्यात आले.
१९ ऑगस्ट २०१४ रोजी आत्महत्येच्या आरोपातून
मुक्‍त करत सरकारने त्यांना तुरुंगातून सोडले होते. मात्र,
लगेच २२ ऑगस्ट रोजी त्यांना परत अटक करण्यात आली.
तरीही इरोम शर्मि ला हटल्या नाहीत. त्यांच ा अन्न सत्याग्रह
सुरूच राहि ला. आता मात्र सरकारकडून सकारात्मक
प्रति साद मि ळत नसल्याने त्यांनी आंदोलनाची दिश ा
बदलण्याच े जाहीर केले आहे, ते योग्यही आहे. त्यानिमित्ता ने
मिझ ोराममधील परिस्थि ती, ति थली बंडखोरी, आंदोलनकर्ते
आणि सरकार यांच्यातील चर्चेच ी दारे खुली होतील.
इरोम शर्मि ला यांचे आंदोलन या क्षणी जरी यश स्वी
झाले नसले, तरी त्यासाठी आपले आयुष्य दावणीला
लावण्याच्या त्यांच्या जि द्दीला आणि चिकाटीला सलाम
swati huddar
मेळघाटातील
मेळघाट! वि दर्भा तील अति दुर्गम प्रदेश. कुपोषण, अनारोग्य, नि रक्षरता,
नापि की अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला प्रां त. २४ वर्षांपूर्वी गांधी-
वि नोबांच्या वि चारांनी प्रेरि त होऊन आणि ‘व्हे अर देअर इज नो डॉक् टर’ या
स्कॉटि श मि शनऱ्याच्या पुस्त काने प्रभावि त होऊन एमबीबीएस झालेल्या
रवी कोल्हे या तरुण डॉक् टरची पावले मेळघाटाकडे वळली. आदिवासींची
सेवा हे जीवनव्रत स्वी कारलेल्या रवी कोल्हेंना साथ दिली त्यांच्या अर्ध ांगि नी
डॉ. स्मिता कोल्हेंनी. या दोघांच्या अवि रत आणि अथक प्रय त्नां नी
आदिवासींच्या जीवनात सोनेरी पहाट उगवली आहे. कोल्हे दाम्पत्याच्या या
कार्या चा प्रवास उलगडणारी डॉ. स्मिता कोल्हेंची मुलाखत...
जीवनातील सगळी सुखे त्यागून
अति दुर्गम आदिवासी क्षेत्रात कार्य
करण्यामागची प्रेरणा काय होती?
डॉ. स्मिता : माझी प्रेरणा आहेत
डॉ. रवी कोल्हे. डॉक् रांशी लग्न करण्याचा
निर्णय घेतला तोच त्यांच्या पाच अटी मान्य
करून आणि त्याचवेळी ऐहि क सुखाला
ति लांजली दिली. अखि ल भारतीय वि द्यार्थी
परि षदेसारख्या संघटने च्या माध्यमातून
समाजसेवा आणि राष्ट्रसेवा सुरूच होती.
मात्र, ती नागपुरात माझा वैद्यकीय व्यवसाय
सांभाळून. सर्व संग परि त्याग करून
आदिवासी क्षेत्रात कार्य करण्यामागे केवळ
डॉ. रवी कोल्हे आहेत. महत्त्वा चे म्हणजे
हे सगळे आम्ही सुख त्यागून करीत नाही,
केवळ सुखाच्या संकल्पन ा वेगळ्या आहेत.
हातातोंडाची गाठ पडण्याची भ्रांत असलेल्या
आदिवासींसोबत राहताना बंगला, गाडी,
ऐशआराम यातील वैयर्थ्य अधिकाधिक
जाणवत गेले.
अत्यंत प्रतिकूलतेतून कार्य आकाराला
आले, असे कळते...
डॉ. स्मिता : अर्था तच. सर्वप्रथ म
तिथ ल्या आदिवासींचा वि श्‍वा स संपादन
करावा लागला. तिथ ल्या समस्या समजून
घ्याव्या लागल्या. साधन ांची कमतरता
तर पाचवीलाच पुजली होती. सगळ्या
अभावातूनच कार्य सुरू केले. समस्यांच्या
मुळाशी जाऊन त्या सोडवि ण्याचा प्रय त्न सुरू
केला. कुपोषणाचे मूळ नापि कीत होते, जिथे
पि कतच नव्हते, तिथे खाणार काय, त्यावर
उपाय म्हणून डॉक् रांनी आधुनिक पद्धतीने
शेती सुरू केली. आदिवासींना नवी नवी
पि के घ्याय ला उद्युक् त केले. परि णामी पुरेसे
अन्नधान्य उपलब्ध झाले आणि कुपोषणाचा
प्रश्‍न बराचसा मार्गी लागला आहे. आधुनिक
शेतीचा परि णाम असा की मेळघाटात शेतकरी
आत्महत्या नाही.
आरोग्यसमस्या सोडवि ताना अडचणी
आल्या का?
डॉ. स्मिता : अडचणी नाही,
अडचणींचा डोंगर होता. आजार आणि
रोगराई औषधोपचाराने दुरुस्त करता ये ते,
हे त्यांच्या पचनी पडायलाच वेळ लागला.
छोटे-मोठे आजार औषधे देऊन बरे करता ये त
होते; मात्र शस्त्रक्रिया करताना कि ंवा जंगली
श्‍वा पदांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांन ा
टाके घालताना खरी कसोटी असायची. भूल
न देता पुरेशा साधन ांअभावीच शस्त्रक्रिया
कराव्या लागायच्या. सर्वाध िक समस्या होती
अडलेल्या बाळंति णींची. अनेक अडलेल्या
बाळंति णींची सुखरूप सुटका केली आणि
त्यान ंतर ही मंडळी मला डॉक् र समजायला
लागली. आदिवासींचा वि श्‍वा स संपादन
करण्यासाठी माझेही बाळंतपण धारणीलाच
तेवढ्याच अभावात केले. मुलेही याच
वातावरणात मोठी झाली. साप-वि ंचवांशी
खेळतच त्यांचे बालपण गेले.
समाजसेवेची ही धारा पुढच्या पि ढीकडे
प्रवाहि त होते आहे का?
डॉ. स्मिता : नक्‍की च. तरुण पि ढी
समाजकार्या त अग्रेसर आहे. कि तीतरी
तरुणांनी या कार्या साठी झोकून दिले आहे.
हा वि चार नवीन पि ढीपर्यंत पोहोचावा,
यासाठी आम्ही ही शिबि रांचे आयोजन करीत
असतो, त्यालाही युवकांकडून उत्स्फूर्त
प्रति साद मि ळतो. आमची दोन्ही मुलेही याच
कार्या त आहेत. अलीकडे मेळघाटातील
स्थि ती बरीच सुधारली आहे. शेती, आरोग्य,
शिक्ष ण यावि षयी जागरूकता आली आहे.
दुर्ग म भागात रस्ते ही झाले आहेत; मात्र
वि जेची समस्या अजून कायम आहे, ती
लवकरात लवकर सुटावी, जेणेकरून शेतीला
पाणीपुरवठा व्यवस्थि त होईल.
आदिवासी महि लांचे जीवन कसे आहे?
डॉ. स्मिता : आदिवासी संस्कृतीत
स्त्रीला अत्यंत सन्मान ाचे स्थान आहे. तिथे
बलात्का र होत नाहीत. कुमारी मातांचा
प्रश्‍न नाही. आरोग्य, शिक्ष ण यावि षयीची
उदासीनता मात्र आहे, त्यासाठी आम्ही
कार्य रत आहोत.
कार्या मागून अनेक पुरस्का र आणि
सन्मा न आलेत.
डॉ. स्मिता : धारणीच्या
आमच्या चंद्रमौळी घरी पुरस्का र आणि
सन्मानचि न्हां साठी जागाच नाही. आणि
आदिवासींचा उत्कर्ष हाच आमचा खरा
सन्मान आहे. धारणीतल्या निसर्ग संपन्न
प्रदे शात इतकी वर्षे घालवल्यान ंतर कागदी
पुरस्का र आणि सन्मान ापेक्षा तिथ ल्या
आदिवासींचे प्रेमच खरा पुरस्का र वाटतो
swati huddar
जिणे स्वाभिमानाचे
अमेरिकेची फर्स्ट डॉटर साशा ओबामा आपल्या च देशात एका रेस्टॉ रेंटमध्ये उन्हा ळी नोकरी
करू शकते. अध्यक्षां ची लेक ही ओळख त्या नोकरीच्या आड येत नाही. कारण स्वा वलंबी
आणि स्वाभि मानी माणूसपण इतर बिरुदावलीपेक्षा मोठे आहे, हे अवघ्या पंधरा वर्ष ांच्या
साशाला कळले आहे.
तंत्रज्ञानाने जग खूप जव ळ
आले आहे. युरोप अमेरिका
या सातासमुद्रापल ीकडील
जगा त आपला ही
वावर वाढला आहे.
पर्याया ने संस्कृती आणि वि चारांची
आवक-जाव कही वाढली आहे.
काही वाईट आणि अनेक चांगल्या
घटनांची देवाणघेवाणही होते आहे.
माध्यमे आणि सोशल साईट् समुळे
बातम्या आणि त्यावरील बऱ्यावाईट
प्रतिक् रिया ंची उला ढाल ही वाढली
आहे. जगा च्या या व्यापारात काही
व्यक्‍ति मत्त्व समाज मानसावर आपल ी
छाप सोडतात आणि काय म चर्चे त
राहतात.अमेरिकेची फर्स्ट फॅमिल ी ही
त्यापैकीच एक. सतत बातम्यांमध्ये
राहणारी. कधी ओबामांची भाष णे,
कधी मिश ेलची प्रतिक् रिया . अलीकडे
अशीच एक बातमी जग भरातल्या
माध्यमांमध्ये चर्चिल ी गेली आणि
मोठी माणसे का मोठी असतात, हे
लक्षात आले. बराक आणि मिश ेलचे
धाकटे कन्यारत्न साशा ओबामा. वय
अवघे १५ वर्षांचे. उन्हा ळी सुट्ट्यांमध्ये
साशा ने अमेरिकी अध्यक्षां ची मुलग ी ही
ओळख बाज ूला ठेवत मॅसचुएट् सच्या
सीफूड रेस्टॉरेंटमध्ये नोकरी पत्करली.
आपल ी ओळख लपवि ण्यासाठी
ति ने तिथ े काम करताना नताशा हे
नाव पत्करले. नताशा ऊर्फ साशा
तिथ े चार तासांचा पार्ट टाईम जॉ ब
करते. रेस्टॉरेंट ओपन होण्याआधीची
देखभाल , कॅश काउंटि ंग आणि
बि झनेस टेबलसची देखभाल असे
नताशा च्या कामाचे स्वरूप आहे.
हे सगळे नताशा रेस्टॉरेंटचा ब्ल ्यू टी
शर्ट , पॅन्ट आणि कॅप घाल ून करते.
त्यासाठी तिला अध्यक्षां ची मुलग ी हा अंगरखा उतरवून ठेवावा लागला आहे
आणि ति ने ते सहज स्वी कारले आहे.
व्हा ईट हाउसमध्ये आलिशा न
आयुष्य जग ताना समर जॉ ब करण्याची
प्रेरणा कुठून मि ळाल ी असेल? हे
केवळ थ्रिल असेल की स्वत:ला
ओळखण्याची प्रक्रिया असेल.
अमेरिकेत साशा च्या वया च्या
मुला ंनी कमावते होणे, हे अप्रूप नाही.
बहुतेक तरुण मुले-मुली स्वत:च्या
पैशा तून स्वत:चे शिक्ष ण करतात.
स्वावल ंबी जग तात. अप्रूप आहे ते
राष्ट्राध्यक्षां च्या मुलीने सामान्य नोकरी
स्वी कारण्याचे. या चे मूळ बराक
आणि मिश ेल ओबामांनी त्यांच्यावर
केलेल्या संस्का रात आहे. आपल्या
मुलींना विश ेष वाग णूक न देता
त्यांना सामान्यांसारखे वाढवि ण्याचा
दोघांचाही प्रयत्न होता. सध्या
साशा करीत असलेली नोकरी आणि
त्याआधी ति ची मोठी बहीण मालिआने
फि ल्म सेटवर केलेली नोकरी हा त्या
संस्का रांचा परिपा क आहे. हा प्रसिद्धी
स्टं ट म्ह णावा, तर ओबामांना आता
राष्ट्राध्यक्षप दाची निव डणूक लढवाय ची
नाही. त्यामुळे हा नक्‍की च मुलींना
परिप ूर्ण बनवण्याच्या प्रक्रियेचा एक
भाग आहे. यानिमि त्ताने स्वावल ंबी
आयुष्य जग णारी अनेक मोठ्यांची
मुले आठवल ी.
त्या त प्रामुख्या ने उल्लेख करावा लागले बि ल
गेट् सची १९ वर्ष ांची मुलगी जेनि फरचा. डेव्हिड आणि
व्हिक्‍ओरि आ बेकहॅमचा मुलगा ब्रु कलि न आणि अमेरि केच्या
राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्य तीत असलेले डोनाल्ड ट्रॅम्पचा मुलगा.
भारतात अशी उदाहरणे अपवादानेच आढळतात.
बहुतेकदा गल्ली नेत्यां च्या मुलांचा वावरही यहाँ के हम है
राजकुमार अशा थाटातच असतो. सत्ताधाऱ्यां च्या मुलांच्या
मस्ती तून होणारी समाज विघातक कृत्ये , अपघात, मगरुरी
ही आपल्या कडे सवयीची आहे. पाश्‍चात्त्य संस्कृ तीतील
चमकधमक स्वी कारताना त्या सोबतच त्यां ची ही जमि नीवर
पाय रोवून उभे राहण्या ची वृत्तीह ी आपण आत्मसात
केली पाहि जे. हे बाळकडू मुलांमध्ये उतरविण्या ची
जबाबदारी आईवडि लांचीच असते. आजच्या पालकांनी
कुठल्याह ी बि रुदावलीशिव ाय आपल्या मुलांना माणूस
म्हणून घडवायचे ठरवले, तर समाजातले अनेक प्रश्‍न मार्गीा
swati huddar
सावध ऐका, पुढल्या हाका!
‘इसिस’संबंधी तीन घटना
एकाच आठवड्यात कानावर
आल्या. पहिली घटना
ब्रिटनमधून इसिसमध्ये सह भागी
होण्यास ाठी गेलेल्या तीन
तरुणींपैकी एक ठार झाल्याची.
दुसरी घटना अमेरिकेत दोन
बुरखाधारी महिलांना इसिसच्या
दहशतवादी समजून अमेरिकेत
मारहाण झाल्याची आणि तिस री
घटना सीरिय ातील मनबीज
शहरातील महिलांनी इसिसच्या
ताब्यातून मुक् त झाल्यावर
आपला आनंद बुरखे जाळून
व्यक् त केल्याची. पहिली घटना
अंतर् मुख करणारी दुसरी चि ंता
करायला भाग पाडणारी आणि
तिस री घटना इसिसवि षयीचा
जनमानसांतील द्वेष दर्श वणारी.
एकूणच इसिस ही संघटना
आणि त्याची अंगावर शहारा
आणणारी कृत्ये जागति क
समाजमन व्यापून उरली आहेत.
सि सचा अजगर हळूहळू अवघे विश्‍व गि ळंकृत
करू पाहत आहे. मध्यपूर्व आशिय ाला घट्ट वि ळखा
घातलेल्या या अजगराने एकीकडे भारतासारख्या
देशांमध्ये धुडगूस घालत असतानाच युरोपमध्येही
आपली दहशत निर्मा ण केली आहे. आतापर्यं त
युवकांचे ‘ब्रेन वॉशि ंग’ करून त्यांना इस्ला मचा वास्ता देत
त्यांच्याकडून दहशतवादी कृत्ये करवून घेणाऱ्या संघटनेने
आता आपला मोर्चा तरुणींकडे वळवि ला आहे. नुकत्याच
प्रसि द्ध झालेल्या एका अहवालानुसार अलीकडे किमान
डझनभर मुली तरी इसि समध्ये सहभागी होण्यासाठी
ब्रि टनमधून पळून गेल्या आहेत. आणि थोड्याथोडक्‍या नव्हे ,
तब्बल ५६ मुली २०१५ मध्ये ब्रि टनमधून पळून इसि समध्ये
सहभागी झाल्याचे ही आकडेवारी सांगते.
केवळ १७ वर्षांची कदि जा ब्रिटनमधून पळून जाऊन
इसिसमध्ये सहभागी होते काय आणि हवाईहल्ल्यात
मारली जाते काय? ति च्याबरोबरच नि घून गेलेल्या
अमि रा आणि शबि बांचा कुठलाही ठावठि काणा कळत
नाहीए. त्या जि वंत असण्याची शक्‍य ता धूसर आहे. पूर्व
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या ति घीजणी इस्टरच्या काळात
घरातून नि घून गेल्या. कुटुंबीयांनी आणि पोलिस ांनी
अनेकवेळा आवाहन करूनही परत आल्या नाहीत.
त्यांनी रक्‍का मध्ये जाऊन दहशतवाद्यां शी लग्न केले.
आणि त्यांना जि वंतपणी जहन्नुमची प्रचि ती आली; पण
तोपर्यंत परतीचे दोर कापले गेले होते.
कदि जाला तिथ ून पळून यायचे होते. त्यास ंबंधी ती
ति च्या बहिण ीशी फोनवर बोललीही होती. बहिण ीशी
झालेल्या शेवटच्या संभाषण ात कदि जा सांगते, मला इथे
अजि बात चांगले वाटत नाही. मला इथून बाहेर पडायचे
आहे. दुर्दैवाने कदि जा बाहेर पडण्यात अयशस्वी ठरली
आणि तिथ ेच ति चा शेवट झाला.
एकदा तुम्ही इसिसच्या जाळ्यात अडकले की,
महि लांसाठी तिथ ून पळून जाणे केवळ अशक्‍य आहे.
कारण इसिस शरया कायदा मानते. या कायद्यानुसार
कुठल्याही महि लेला पुरुष सोबत असल्याशि वाय
घराबाहेर पडणे शक्‍य नाही. तुर्कस्ता नने सीमा बंद
केल्यानंतर या दहशतवादी संघटनेने विश्‍वास घातींना
सार्व जनि करीत्या मृत्युदंडाची शि क्षा देणे सुरू केले
आहे. त्यामुळे तिथ ले वास्तव अनुभवल्यानंतर होणाऱ्या
पश्‍चा त्तापाला काहीही अर्थ नाही.
ब्रिटनमधील सुखवस्तू जीवन त्यागून सुरक्षि त
कौटुंबि क चौकट मोडून इसिसची राजधानी रक्‍कास ारख्या
अनोळखी प्रदेशात पळून जाण्याएवढे मनोबल या
अवघ्या पंधरा-सोळाव्या वर्षी या मुलींमध्ये कोठून
येते? कोणते आमिष या तरुणींना दाखवि ण्यात येते.
ते आमिष असते प्रेमळ पती आणि जन्नतचे. कोवळ्या
वयात लग्न, पती याचे आकर्षण निश्‍चि तच असते. मात्र,
अवघ्या पंधरा-सोळाव्या वर्षी जन्नतचे आकर्षण वाटून
घरदार आणि सुरक्षि त आयुष्य त्यागून नि घून जाणे, खरेच
अचंबि त करणारे.
याचा अर्थ इसिसचे जाळे सर्वत्र पसरले आहे.
इसिसचा हा राक्षस तुमच्या-आमच्या घरातही येऊन
पोहोचला आहे. तो आमच्या घरातील कोवळ्या
मेंदूंवर, घरातल्या संगणकाच्या स्क्री नवर, तरुणांच्या
हातातील माउसच्या एका क्‍लिकवर राज्य गाजवतोय.
कोणाला कोणते आमिष दाखवून आपल्या जाळ्यात
ओढायचे, तुमच्याच घरात तुमचे शत्रू आणि आपले
जान की बाजी लावणारे सैन्य निर्माण करायचे, हे या
राक्षस ाला नीट कळले आहे. या राक्षस ाच्या दि मतीला
असलेली मनोवैज्ञानि कांची चमू तुमच्या-माझ्या घरातील
तरुणाईच्या मानसिकतेचा बारकाईने अभ्यास करत आहे.
हाच नि ष्कर्ष यामधून नि घतो. याचा अर्थ इसिस हे युद्ध
केवळ बंदुकीच्या भरवशावर लढत नसून तंत्रज्ञानाचाही
शस्त्र म्हण ून उपयोग करून घेत आहे. या तंत्रज्ञानाला
सीमांचे बंधन नाही. वेळ आणि काळाचेही बंधन नाही.
कदि जासारख्यांच्या घटना वाचून आणि ऐकून
प्रत्येक देशाने आणि पालकांनी सावध होणे गरजेचे आहे.
या भस्मास ुराला वेळीच आवर घालणे आवश् यक आहे.
यापुढे तरी इसिसकडे आकृष्ट होणारा प्रवाह थांबावा.
जगभरातील सामान्यांच्या जि वावर उठलेल्या इसिसचा
आणि तमाम दहशतवादी संघटनांच्या भस्मास ुराचा नाश
व्हा वा आणि सुखसमृद्धी, शांततेचे पसायदान अवघ्या
विश्‍वा ला लाभावे, या आशेसह...
swati huddar
‘मा’ यो जनेच्या निमित्ताने
स्तनपानाविषयी जनमानसात
जागृती निर्माण करण्यासाठी
केंद्र सरकारच्या आरोग्य
आणि कुटुंबकल्याण
मंत्रालयाने शुक्रवारी
(ता. १९ ऑगस्ट) मदर्स
ॲब्सो ल्यूट अफेक् शन
(मा) ही योजना सुरू केली
आहे. या मोहि मेअंतर्गत
वातावरणनिर्मित ी
करण्या साठी रेडिओ,
दूरचित्रव ाणी, वृत्तपत्र या
माध्यमांचा उपयोग करण्यात
येणार आहे. त्याच बरोबर
पथनाट्य, लोकगीत,
बाहुल्यांच ा खेळ, प्रदर्श न
या पारंपरिक कलांच्या
माध्यमातूनही जनजागृती
करण्यात येणार आहे.
काही राज्यांच ा अपवाद
वगळता महि लांचा साक्षरता
दर बऱ्या पैकी वाढलेला
असताना आणि आपल्या
कर्तृत्वा ने विविध क्षेत्र
गाजवित असलेल्या महि लांना
स्तनपानासारख्या मूलभूत
विषयासाठी जागरूक
करण्याच ी आवश् यकता का
भासावी, हा खरा प्रश् न आहे.
मातृत्व नि सर्गा ची स्त्रील ा मि ळालेली अनुपम देणगी.
एका जीवातून दुसऱ्या जीवाचा जन्म. आई आणि
बाळाचं जीवशास्त्रीय आणि त्या मुळेच भावनि क असं
जगातलं सगळ्या त चि रंतन नातं. केवळ मानवातच
नव्हे ; तर पशुपक्ष्यां मध्ये ही या नात्या तील घट्ट वीण बघायला मि ळते.
पिल ांसाठी चारा शोधून त्यां च्या मुखात भरवि णारी चि मणी आपण पाहतो.
ति न्ही सांजेला वासराच्या ओढीने हंबरत येणारी गाय हेदेखील मातृत्वा चं
सुंदर उदाहरण. ‘घार हि ंडते आकाशी चित्त ति चे पिल ापाशी’ असं उगाच
म्हणत नाहीत. पशुपक्ष्यां ना आपल्या पिल ांना स्तनपान देण्या चे आणि
पिल ांनाही आईच्या स्तनाला लुचण्या चे प्रशि क्षण द्यावे लागत नाही.
युगानुयुगे चालत आलेली ही नैसर्गि क प्रक्रिया आहे.मातृत्व नि सर्गा ची स्त्रील ा मि ळालेली अनुपम देणगी.
एका जीवातून दुसऱ्या जीवाचा जन्म. आई आणि
बाळाचं जीवशास्त्रीय आणि त्या मुळेच भावनि क असं
जगातलं सगळ्या त चि रंतन नातं. केवळ मानवातच
नव्हे ; तर पशुपक्ष्यां मध्ये ही या नात्या तील घट्ट वीण बघायला मि ळते.
पिल ांसाठी चारा शोधून त्यां च्या मुखात भरवि णारी चि मणी आपण पाहतो.
ति न्ही सांजेला वासराच्या ओढीने हंबरत येणारी गाय हेदेखील मातृत्वा चं
सुंदर उदाहरण. ‘घार हि ंडते आकाशी चित्त ति चे पिल ापाशी’ असं उगाच
म्हणत नाहीत. पशुपक्ष्यां ना आपल्या पिल ांना स्तनपान देण्या चे आणि
पिल ांनाही आईच्या स्तनाला लुचण्या चे प्रशि क्षण द्यावे लागत नाही.
युगानुयुगे चालत आलेली ही नैसर्गि क प्रक्रिया आहे.
मानवही याला अपवाद नाही, असे असताना सरकारला
स्तनपानाविष यी जागरूकता निर्मा ण करण्या ची योजना
राबवावी लागावी, हे एक आश् चर्य कारक सत्य आहे.
स्त्री सुशिक् षित झाली. करिअरच्या वाटा
चोखाळायला लागली. एकीकडे करिअर आणि
दुसरीकडे लग्न आणि त्या नंतर येणारे मातृत्व. दोन्ही
घटना सारख्या च महत्त्वा च्या . दोन्ही पैकी एकावर
पाणी सोडायचे कि ंवा स्वत:ची तारांबळ करीत दोन्ही
साधण्या चा प्रयत्न करायचा. परिणामी कुणालाच
न्या य मि ळत नाही. आठ तासांच्या नोकरीमुळे तान्ह्या
मुलांचे आईचे दूध तोडले जाते. जे त्या बाळाच्या संपूर्ण
वाढीसाठी अत्याव श् यक आहे. नाइलाजास्तव त्या
बाळाला वरचे दूध आणि पुढे अन्न भरवले जाऊ लागते.
आईच्या दुधाला पर्या य नाही, हे अनेक
संशोधनाअंती वारंवार सि द्ध झाले आहे, बाळाचा जन्म
झाल्या बरोबर एक तासाच्या आत त्या ला आईचे दूध
पाजले तर ते त्या च्या साठी रोगप्रति बंधक सि द्ध होते,
न्यू मोनि यासारख्या अनेक आजारांपासून बाळाचे संरक्षण
करते आणि २० टक्‍के शि शू मृत्यु दर कमी करता येतो.
स्तनपानामुळे १३ टक्‍के बालमृत्यू ही टाळता येतात. हे
सगळे सुशिक् षित स्त्रीला कळते; पण वळत नाही. प्रगत
शरीरविज्ञान शास्त्राने आईच्या दुधाचे महत्त्व अधोरेखीत
केल्या मुळे सरकारनेही यादृष्टीने अनेक पावले उचलली
आहेत. केंद्र सरकारने महि लांना दोन वर्षांची मातृत्व रजा
देऊ केली आहे. जेणेकरून आईच्या दुधावर बाळाचे
संपूर्ण पोषण व्हाव े. खासगी क्षे त्रातही २६ आठवड्यां ची
मातृत्व रजा देण्या संबंधीचे विधेयक संसदेने नुकतेच
मंजूर केले. अनेक क्षेत्रां त नोकरीच्या ठि काणी महि ला
कर्म चाऱ्यां च्या मुलांकरिता पाळणाघरांची व्यव स्था ही
करण्या त आली आहे आणि स्तनपानासाठी वेगळी
खोलीही राखून ठेवण्या त आली आहे. आठ तासांच्या
नोकरीत स्तनदा मातांना दोनवेळा स्तनपानासाठी सुटीही
देण्याचा कायदा आहे, याशिव ाय नोकरीवर येण्यापूर्वी
रेफ्रिजरेटरमध्ये दूध साठवून ठेवणेही सहज शक्‍य असते.
इतक्‍या सगळ्या सुविधा असूनही अनेकदा बाळांना
आईचे दूध मि ळत नाही आणि सरकारला त्या साठी
योजना राबविण्या ची गरज पडते, विशेष निधीची तरतूद
करावी लागते.
काही वेळा स्तनपान न करण्या मागे फि गर मेन्टे न
ठेवण्या विष यीचे गैरसमजही असतात. खरेतर बाळाला
स्तनपान देण्या इतके आईसाठी दुसरे महत्त्वा चे काहीच
नसावे. आईच्या पदराआड तृप्त होऊन निर्धा स्तपणे
निजलेल्या बाळाच्या चेहऱ्यावरचे समाधान निरखणे
आणि त्या च्या कुरळ्या जावळाचे अवघ्राण करणे,
यापेक्षा मोठे सुख एका आईसाठी जगात दुसरे कोणतेच
नाही. अर्था त, ही केवळ अनुभव ण्या ची गोष्ट आहे.
मैत्रि णींनो, नुकत्या च प्रसि द्ध झालेल्या अहवालानुसार
बालकांना स्तनपान करण्या त शहरी महि लांपेक्षा ग्रामीण
भागातील महि ला आघाडीवर आहेत. याचा अर्थ असा
नि घतो की सुशिक् षित आणि नोकरदार महि ला अपत्यां च्या
संगोपनामध्ये ग्रामीण महिलांपेक्षा मागासलेल्या आहेत.
स्तनपान कमी होण्या ला काही रूढीही कारणीभूत
आहेत, त्या विष यी जागृती खरेच गरजेची आहे, बाळाला
जन्मल्या बरोबर मधपाणी देण्या ची प्रथा काही ठि काणी
आहे, तसेच सि झेरियन झालेल्या आईचे दूध बाळाला
देऊ नये, असाही गैरसमज काही ठि काणी आढळतो,
अशा रूढींचा परिणाम स्तनपानावर होतो. सरकारच्या
या मोहि मेच्या माध्यमातून असे गैरसमज दूर होण्या स
मदतच होईल; मात्र अपत्याचे योग्य संगोपन ही आईची
प्राथमिक जबाबदारी आहे. ती पार पाडण्यास आपण
सक्षम असू, तरच अपत्य जन्माचा विचार करावा. एकदा
आई झाल्या नंतर बाळाच्या संपूर्ण वाढीसाठी आवश्यक
असलेले स्तनपान करण्या पासून मात्र मातांनी चुकू नये,
अन्यथा आईपणाच्या कर्तव्यात आपण कसूर केली,
असाच याचा अर्थ होईल.
swati huddar
...किनारा तुला पामराला
वय वर्षे तिशीच्या आसपास.
एका मल्टि नॅशनल कंपनीत
दक्षिण आशिय ासाठी
कम्युनिकशन डायरेक्टर सारख्या
महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेली
यशस्वी महिला. नोकरीनिमित्ताने
सतत देशवि देशात प्रवास. बोलणे
अत्यंत ऋजू मात्र अभ्यासपूर्ण आणि
आत्मविश्‍वा स दर्शविण ारे.
मृण्मय ीला लहानपणापासूनच
संगणक ाविषय ी प्रचंड आकर्षण .
संगणक ाच्याच क्षेत्रातले शिक्षण
घ्याय चे आणि त्यामध्येच कारकीर्द
करायची, असे ठरवून मृण्मय ीने
नागपूरच्या शि वाजी वि ज्ञान
महावि द्यालयातून एमसीए केले.
त्यानंतर एमबीए करून मुंबईला
एका कंपनीत दोन वर्षे जनसंपर्क
क्षेत्रात नोकरी केली. जनसंपर्क
आणि संवाद हा नोकरीचाच विषय
असलेल्या मृण्मय ीला माणसाची
भाषा, स्वभाव आणि त्याचबरोबर
निर्जी व संगणक ाची भाषाही
चांगलीच ज्ञात आहे. नोकरीतल्या
अनुभवाचा उपयोग मृण्मय ी आयुष्य
समृद्ध करण्यासाठीही करून घेते.
मुंबईतल्या नोकरीचा अनुभव
घेतल्यावर मृण्मय ी एका मल्टि नॅशनल
कंपनीत रुजू झाली आणि काही
कामाकरि ता नागपूरहून पुण्याला जात
असताना तिच्या गाडीला अपघात
झाला. या अपघातात मृण्मय ीचा
पुनर्ज न्म झाला. पाठीच्या मणक्‍या ला
गंभीर दुखापत झाली. परिण ामी,
खांद्याच्या खालचा भाग पूर्णपणे
निक ामी झाला. अपघातानंतरच्या
पहि ल्या सात दिवसांतच मृण्मय ीला
परि स्थि तीची जाणीव झाली; मात्र
खंबीर मृण्मय ीने त्यावर मात करून
जि द्दीने उभे राहण्याचे ठरवि ले.
तिचा आत्मविश्‍वा स कायम
ठेवण्यात तिचे कुटुंबीय, तिच्यावर
उपचार करणारे डॉक् टर आणि
मानसोपचारतज्ज्ञ यांचा मोलाचा
वाटा आहे. प्रचंड आत्मविश्‍वा स,
आधुनिक उपचारपद्धती, आधुनिक
तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने मृण्मय ीने
अपघातानंतर दोनच महि न्यांत पुन्हा
नोकरी आणि काम सुरू केले.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात
काम करण्याची इच्छा असलेल्या
व्यक्‍ती ला काम करणे कठीण
नाही. "इंटरनेट, सेलफोन्स, सोशल
साइट् स, संगणक या सगळ्यांच्या
माध्यमातून मी घरी राहूनही उत्तम
काम करते आणि वेळ पडल्यास
देश-वि देशात दौरेही करते. गेल्या
पाच वर्षांत माझी शारीरिक दुर्ब लता
कध ीही माझ्या कामाच्या आड आली
नाही,' असे मृण्मय ी सांगते.
आयुष्यात आलेल्या अडचणी
आणि समस्यांवर यशस्वी मात
करून पुन्हा त्याच उमेदीने उभी
राहि लेली मृण्मय ी स्वत:च्या नोकरी
व्यवसायासोबतच अपघाताने
कोलमडलेल्या अशा व्यक् तींना पुन्हा
उभे करण्याचे कार्य करते.
स्पाय नल कॉर्ड ला दुखापत
झाल्यामुळे मनाने खचलेल्या अनेक
व्यक् तींना उभारी देत पुन्हा उभे
करण्याचे कार्य मृण्मय ी एका संस्थे च्या
माध्यमातून करते आहे. "जीवनातला
एखादा अपघात म्हण जे आयुष्य
थांबणे नाही, एक दार बंद झाले की
दुसरे आपोआप उघडत असते, गरज
असते ती इच्छा शक्‍ती ची,' असे
मृण्मय ी सांगते. जीवनाविषय ी तिची
कुठलीच तक्रार नाही. आयुष्यातल्या
प्रत्येक क्षण ाचा आनंद लुटण ाऱ्या
मृण्मय ीच्या जि द्दीला मन:पूर्वक
swati huddar
बदलाची नांदी
कुठलाही फॅशन समारोह आणि सौंदर्य स्पर्धा म्हणजे केवळ आणि केवळ
महि लांच्या सौंदर्याच, त्यांच्या देहाचे प्रदर्शन. अधिकाधिक सुंदर दिसण्याची
चढाओढ. आपल्या असण्यापेक्षा, गुणांपेक्षा आपले दिसणे अधि क महत्त्वाच े.
हे महि लांनीच मान्य करण्याची जागा. आमच े अस्ति त्व आमच्या देहाच्या
मापांवर अवलंबून आहे आणि ती मापे ठरवि ण्याच ा अधि कार सर्व स्वी पुरुष
जातीच ा आहे, याची कबुली. गोरी कातडी आणि चवळीच्या शेंगेसारखा बांधा,
ही समाजमान्य सौंदर्य परिम ाणे. समाजातील लब्ध प्रतिष् ठित, सौंदर्य स्पर्धांम ध्ये
आपल्या सौंदर्याच े प्रदर्श न मांडणाऱ्या सौंदर्य वती, न्या याधीशाचा आव आणत
त्यां च्या सौंदर्याच े मोजमाप करणारे ज्यू री आणि टीव्ही वर या सोहळ्याच ा
आस्वा द घेणारे कोट्यवधी प्रेक्षक कुणालाच आतापर्यंत यात वावगे वाटले नाही.
या वेळचा न्यू यॉर्क फॅशन वीक मात्र अनेक कारणांनी वेगळा ठरला.
सि ड हल्ल्यात एक
डोळा गमावलेल्या
आणि चेहरा विद् रूप
झालेल्या रेश्‍मा ने
इथे रॅम्प वॉक केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी
‘मुलगी शिक वा’ हा संदेश देण्यासाठी
आणि हॅण्डलूमचा प्रसार करण्यासाठी
इथे रॅम्प वॉक केल्यामुळे मराठी
मंडळींसाठी हा अभि मानाचा विषय
ठरला आणि अव्वल टेनि सपटू सेरेना
वि ल्यम्सने सेरेना सि ग्नेचर स्टे टमेंट
सादर करीत उपस्थि तांची मने जि ंकली.
ती नि राशेला वि जयात परावर्ति त
करू शकते
दु:खाला आनंदात
स्वत:ला डावलल्याच ेही
स्वी कारण्या त
कुणी ति च्या वर अवि श्‍वा स
दाखवीत असेल
तरी ति ला काहीच फरक पडत नाही
तिच ा स्वत:वर वि श्‍वा स आहे
कुणी ति ला अडवू शकत नाही
कुणी ति ला हात लावू शकत नाही
कारण ती स्त्री आहे...
विश्‍ववि ख्यात अव्वल टेनि सपटू
एका फॅशन समारोहात आपल्या
स्त्रीत्वा चे गीत गाते आणि समस्त
जनसमुदाय श्‍वा स रोखून ते ऐकत
राहतो. असे दृश्‍य वि रळेच. जिथ े
केवळ सौंदर्य आणि सौंदर्या चीच चर्चा
होते, अशा व्यासपीठावर आपल्या
कर्तृ त्वा ने मैदान गाजवि णारी सेरेना
आपल्या कवि तेने सगळ्यांना मंत्रमुग्ध
करते, हे यंदाच्या फॅशन वीकचे
वैशि ष्ट्य आणि वेगळेपणही. या
सादरीकरणानंतर झालेल्या पत्रक ार
परिष देत सेरेनाने या कवि तेमागील हेतू
स्पष्ट केला. ही कवि ता स्त्रीशक्‍ती ला
सक्षम बनवि ण्यासाठी लिहि ल्याचे ती
सांगते. एक महान महि ला खेळाडू
म्हणून आपणास काय वाटते, असा
प्रश्‍न मला नेहमीच वि चारला गेला.
एखाद्या पुरुषाला असा प्रश्‍न कधी
वि चारला जात नाही. त्यामुळे ही
कवि ता सादर करण्याची आवश्‍यक ता
मला वाटली, असेही सेरेनाने सांगि तलेया वेळी सेरेनाची मोठी बहीण व्हि नसही
उपस्थि त होती. दोघींनीही निरनिराळ्या फॅशन
ब्रॅण्डसाठी कॅटवॉक केला. सेरेनाची ही कवि ता
हेच अधोरेखि त करते की, स्त्रीत्व हे तुमचे इतर
कुठलेही श्रेष्ठत्व झाकोळून टाकण्यास पुरेसे आहे.
स्त्रीत्व ही अभिम ानाने मि रवण्याची गोष्ट आहे.
मात्र, सुसंस्कृ त समाजही जेव्हा स्त्रीत्वा कडे
न्यूनत्वा च्या भावनेने पाहतो, तेव्हा सेरेनासारख्या
जगद् विख्यात महि लेलाही आपली व्यथ ा कवि तेमधून
मांडावीशी वाटली आणि ति ने सेरेना सि ग्नेचर
स्टे टमेंट सादर केले. यं दाचा न्यूय ॉर्क फॅशन वीक
मराठी माणसासाठी जि वाभावाचा ठरला. कारण,
चक् क महाराष्ट्राची प्रथम महि ला, मुख्यमं त्री देवेंद्र
फडणवीस यांच्या पत्नी ने इथे रॅम्प वॉक केला.
पतीच्या यशाने झाकोळून न जाता स्वत:ची
वेगळी ओळख अमृता यांनी त्यांच्या नोकरीच्या
माध्यम ातून निर्मा ण केली आहे. उच्च पदावर
कार्य रत असूनही अत्यंत साधेपणा ही अमृताची
आणखी एक ओळख. अशातच यं दा पुण्यातल्या
चासा इन्स्टि ट्यूट ऑफ फॅशन डि झायनिंग च्या खास
हॅण्डलूम कलेक् शनच्या प्रमोशनसाठी अमृताने रॅम्प
वॉक केला. मुलींच्या साक्षरतेचा संदेश देणे हा माझा
या समारोहात सहभागी होण्याचा उद्देश होता. एक
मुलगी जेव्हा सुशिक्षि त होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब
सुशिक्षि त होते. परि णामी देशाची प्रगती होते, असे
फॅशन समारोहाच्या व्यासपीठावरून मि सेस सीएम
सांगतात. ही अत्यंत महत्त्वा ची आणि अभिम ानाची
गोष्ट आहे. या फॅशन समारोहात अमृता यांनी
वापरलेली वस्त्र प्रावरणे ही गरीब शेतकरी मुलींनी
तयार केली होती, हे वि शेष.
यं दाच्या न्यूय ॉर्क फॅशन वीकचे सगळ्यात मोठे
यश म्हणजे ॲसि ड हल्ल्यात एक डोळा गम ावलेली
आणि चेहराही विद्रू प झालेली अल्पवयीन रेश्‍माकुरेशीने केलेला रॅम्प वॉक. अर्च ना कोचरने डि झाईन
केलेल्या गाऊनमध्ये रेश्‍मा ने अत्यंत आत्मविश्‍वा साने
रॅम्प वॉक केला आणि महि लांचा शारीरि क
आणि मानसि क छळ करून त्यांचे खच्चीकरण
करण्याच्या पुरुषी मानसि कतेला सणसणीत चपराक
लगावली. काहीही दोष नसताना केवळ एखाद्याच्या
वि कृतीचे शि कार ठरलेल्या आणि आत्मविश्‍वा स
गम ावलेल्या अनेकींसाठी रेश्‍मा चा हा सहभाग
आशादायी आणि प्रेरणा देणारा ठरला. रेश्‍मा साठीही
अशा पद्धतीने जगासमोर ठामपणे उभे राहणे इतके
सहज नक्‍की च नसेल. शरीराबरोबरच इतस्तत:
वि खुरलेल्या मनाला महत्प्रयासाने सांभाळूनच ती
उभी राहि ली असेल. रेश्‍मा ने शालेय जीवन संपवून
महावि द्यालयीन जीवनात प्रवेश केला. आम्ही
आमचे आयुष्य का आनंदाने जगायचे नाही?
आमचा काहीही दोष नसताना आमच्या वाट्याला
आलेली ही अवहेलना ओलांडून आम्ही पुढे जाणार
आहोत, असा संदेश रेश्‍मा ने दिला आणि खरोखर
दाही दिशा उजळून निघाल्या. रेश्‍मा ला रॅम्पवर उभ्या
करणाऱ्या एफटीएल मोडा या फॅशन प्रोडक् शन
कंपनीने गेल्या समारोहात डाऊन सिं ड्रोम असलेल्या
एका मॉडेलला रॅम्पवर उभे केले होते. प्रस्थापि त
सौंदर्या च्या संकल्पनांना धक्‍का देण्याचा या
कंपनीचा प्रयत्न आहे. रेश्‍मा , सेरेना आणि अमृता
युगानुयुगे पुरुषी वर्च स्वा खाली पि चलेल्या महि ला
विश्‍वा त होऊ घातलेल्या बदलाचे प्रति निधित्व
करतात. स्त्रीत्वा च्या पलीकडेही आमची माणूस
म्हणून ओळख आहे आणि पुरुषी मानसि कतेला
ती स्वी कारावी लागेल, आमचे शरीर छि न्नविच्छि न्न
करूनही आमच्यातला अमर्या द आत्मविश्‍वा स
कुणीही संपवू शकणार नाही. आम्ही परत उभारी
घेणार फि निक् स पक्ष्या प्रमाणे, हा संदेश देणारा
यं दाचा न्यूय ॉर्क फॅशन वीक म्हणूनच बदलाची नांदी
ठरला.
swati huddar
मातृत्वाचाही व्‍यापार
मोदी सरकार महिलांवर वि शेषत: स्त्रीमधील आईपणावर
अधि कच मेहेरबान असल्या चे लागोपाठ घेतलेल्या
निर्ण यांवरून जाणवते. पहिला निर्णय होता मातृत्व रजेचा.
खासगी क्षेत्रातही २६ आठवड्यांची मातृत्व रजा देणारे
वि धेयक संसदेच्या पावसाळी अधि वेशनात मंजूर झाले.
अलीकडेच स्तनपानाविषयी जागरूकता निर्मा ण करणारी
‘मा’ योजनाही सरकारने सुरू केली आणि आता तर
मातृत्वाचे व्यापारीकरण थांबविण्या साठी केंद्रीय मंत्रिमंडळाने
सरोगसी विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देत महिलांच्या
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
स्टट्यूब बेबी आणि त्यानंतरची सरोगसी या वैद्यकीय क्षेत्रातील
क्रांतिकारक घटना. मानवाचा निसर्गावर विजय. मातृत्व ही
स्त्रीजीवनाला पूर्णत्व देणारी घटना. वैद्यकीयशास्त्रातील या
संशोधनामुळे अनेक वांझ कुशींना मातृत्वाचे वरदान मिळाले.
सरोगसीने देवकी आणि यशोदा दोघींनाही मातृत्व देऊ केले. मात्र या जीवशास्त्रीय
घडामोडीने अनेक भावनिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांची जंत्रीही
समाजासमोर उभी केली. कारण मातृत्व ही केवळ शारीरिक घटना नाही. आई
आणि बाळाचे नाते हे जगातील सर्वाधिक पवित्र आणि चिरंतन नाते आहे.
सरोगसी हे शारीरिक असमर्थतेमुळे मातृत्वापासून वंचित असलेल्या स्त्रीसाठी
वरदान आहे. अलीकडे मात्र मातृत्वासाठी भाड्याने कूस घेणे आणि देणे याला
व्यापारी स्वरूप आले. पैसा कमविण्याचे ते हुकमी साधन बनले.
मातृत्व तर हवे, मात्र त्यासाठी सोसावे लागणारे शारीरिक आणि मानसिक कष्ट नकोत, गर्भावस्था आणि
बाळंतपण यामध्ये जाणारा
वर्ष-दीड वर्षाचा काळही नको
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे
बाळंतपणानंतर होणारा सौंदर्याचा
ऱ्हास नको. या सगळ्या गोष्टी
टाळून केवळ पैसे फेकले की मातृत्व
प्राप्त होते, हे लक्षात आल्यावर
भारतातील अनेक श्रीमंत जोडपी
आणि विदेशी जोडपी सरोगसीला
प्राधान्य देऊ लागली. परिणामी
सुरू झाला मातृत्वाचा व्यापार.
नाइलाजास्तव सरकारला या
व्यवहारात हस्तक्षेप करावा लागला.
भारतात असलेली सरोगसी
क्‍लिनिक्‍स , भाड्याने कूस देणाऱ्या
गरीब महिला आणि गुंतागुंत नसलेले
कायदे यामुळे सरोगसीसाठी विदेशी
जोडप्यांचा भारताकडे कल वाढला.
मातृत्वापासून वंचित असलेल्या
महिलांसाठी वरदान ठरणारी सरोगसी
भाड्याने कूस देणाऱ्या गरीब
महिलांसाठी श्राप ठरू लागली.
अनेक विदेशी जोडपी भारतातील
गरीब महिलांना पैशाचे आमिष
दाखवून सरोगसीसाठी बाध्य करू
लागली.
भारतातील सरोगसी क्‍लिनिक गरीब
महि लांची पैशाची गरज लक्षात घेऊन
अत्यंत कमी मोबदल्यात त्यांच्यावर हे
भाड्याचे मातृत्व लादू लागले. बाळाच्या
जन्मा नंतर अनेकदा वि देशी जोडपी
त्यांचे पालकत्व स्वीक ारणे
नाकारू लागली आणि
थोड्याशा मोबदल्यासाठी
शारीरिक हानीबरोबरच
गरीब महि लांना उधारीचे
मातृत्वही नि भवावे लागू
लागले. या प्रकारांना धरबंध
राहि ला नाही आणि शेवटी
सरकारला सरोगसी विध ेयक २०१६च्या
माध्यमातून अंकुश लावावा लागला.
या निय मनानुसार केवळ गरजू नि :संतान
दाम्पत्यांनाच सरोगसीचा पर्याय उपलब्ध
राहणार आहे आणि या कायद्याचा भंग
करणाऱ्यांना दहा लाख रुपयांचा दंड आणिदहा वर्ष ांच्या कारावासाची शि क्षा होणार
आहे. वि देशी किंवा अनि वासी भारतीय
जोडप्यांना यासाठी परवानगी मि ळणार नाही
आणि सरोगसीसाठी जवळच्या नात्यातील
स्त्रीलाच परवानगी मि ळेल. विध ेयक ातील या
काही अटींमुळे नक्‍की च मातृत्वा च्या या
व्यापाराला पायबंद बसणार आहे;
मात्र भावनिक कंगोरे असलेले
असे प्रश् न केवळ कायदे
करून संपणारे नसतात. कारण
पैशांसाठी गर्भा शय भाड्याने
देणाऱ्यांची संख्या भारतात
सर्वाधिक आहे आणि याला कारण
इथली गरिबी आहे. या गरजू महि लांचा
रोजीरोटीचा प्रश् न सुटला तर त्यांना कूस
भाड्याने देण्याची गरज कदाचि त उरणार
नाही, तसेच कायद्यासोबतच समुपदेशन
आणि जागृती करण्याच्याही दृष्टीने सरकारने
पावले उचलणे अपेक्षि त आहे
swati huddar
publish in sakal

Friday, 21 October 2016

प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुखांची अप्रतिम कविता
ती दशमीची रात्र चांदणी, मावळतीला चंद्र ढळे
देवघरातील वात उजळता, डोळ्यामधले जळ न खळे
दीनदयाळा पतितपावना, नाव लागली धारेला
कर्णधार हो पंखाखाली घेशील का रे बाळाला
कुंकुमाक्षता वाहून आलो, ओसरीवरी हळुचसे
चार वासरे तृणांकुराच्या, सुख शयनावर पडलीसे
निढळावरती रुळत चांदणे, गालावरती हसे खळी
दुजा पहुडला, कुशीत घेऊन, मुक्‍ताईची दीपकळी
सोपानाला पाहून उघडा, चित्त बावरे भडभडले
खांद्यावरच्या उपवस्त्राने, चौघांनाही झाकीयले
गाढ झोपल्या हरीण पाडसा सोडूनी देशांतरी आलो
वणवण झाली असतील बाळे, मनी येऊनी तळमळलो
कसा करंटा किती अदय मी, करुण रसाने घर भरले
अर्धांगीवरी अविश्‍वसुनी मी, यतीमार्गा अनुसरले
अंजन पडले डोळ्यामधी जई, प्रेमपंथ मी आचरिला
संन्याशाच्या चोख निवृत्तीस, मांडीवरी मी खेळविला
ज्ञान पाठीशी रांगत आले, तळगाभा लखलखला
बोबडकांद्या वचनांनीही, जीवाधीरा शांतविला
एका हाती निवृत्तीसह, दुसऱ्या हाती ज्ञानाला
घेऊन चढलो ऐन चढणीचा, सुगमपणे सोपान भला
कडकडुनी मग भेटे मुक्‍ता, लेक लाडकी उद्धरिणी
असे वाटते मरून यावे, तिच्या पोटचे होऊनी
पंढरीनाथा कशास ही रे, दिलीस गुणसुंदर बाळे
मुके न घेता, उरी न धरता, तसेच आलो परभारे
ती दशमीची रात्र चांदणी, मावळतीला चंद्र ढळे
देवघरातील वात उजळता, डोळ्यामधले जळ न खळे
अबोला
काही मंडळी अबोल्याचा आपल्या विरोधकांविरोधात शस्त्रासारखा उपयोग करतात. ज्या व्यक्‍तीशी आपले मतभेद आहेत किंवा काही कारणाने वादविवाद झाला आहे, अशा व्यक्‍तीशी बोलणे बंद करणे, अबोला धरणे ही बाब समाजात सर्रास आढळते. या अबोल्यांना वयाचे, पदाचे, परिस्थितीचे, प्रांताचे, देशाचे कशाचेही बंधन नसते. विशेषत: नवराबायकोच्या नात्यात या अबोल्याला विशेष स्थान आहे.
लहानपणीे खेळता-खेळता मित्रमैत्रिणींशी भांडण झाले की, कट्टी त कट्टी, बालं बट्टी लिंबाचा पाला तोडू नको, बारा महिने बोलू नको, असे अगदी रितसर सांगून अबोला धरला जायचा, 12 महिन्यांची कालमर्यादाही घालून दिली जायची, एकप्रकारे 12 महिन्यांनंतर बोलण्याचे आश्‍वासन दिले जायचे. अर्थात हा अबोला अनेकदा 12 मिनटातच संपायचा, हा भाग वेगळा. (आताच्या लहान मुलांची अबोला धरण्याची काय पद्धत आहे, माहिती नाही.) मोठ्यांचा अबोला मात्र अनेकदा कुठलीही कल्पना न देता सुरू होतो. बरेचदा तर निर्णय एकतर्फी घेतलेला असतो. समोरच्याने आपल्याशी अबोला धरला आहे, त्या माध्यमातून तो आपल्याला शिक्षा देतो आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला अनेकदा माहिती नसते. कधी कधी तर ही अबोल्याची शिक्षा आपल्याला कशासाठी देण्यात आली आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला कळतच नाही. हे प्रगल्भतेचे लक्षण नक्‍कीच नाही. अबोल्याने कुठलेही प्रश्‍न सुटू शकत नाहीत. उलट गैरसमज वाढतात आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्यातले किती सुंदर सोनेरी क्षण या अबोल्यात आपण कायमचे हरवून बसतो. त्यापेक्षा एखाद्या व्यक्‍तीविषयी आपल्याला काही तक्रार असेल, किंवा त्याच्याशी काही विषयात मतभेद असतील, तर ते चर्चेतून सुटू शकतात. दोघांनीही एकमेकांविषयीच्या तक्रारी शांतपणे, समजूतदारपणे एकमेकांना सांगाव्यात गरज असल्यास दोघेही ज्या व्यक्‍तीला मानत असतील, अशा मध्यस्थाला सोबत ठेवावे. त्यातून काही मध्यम मार्ग निघू शकतो का, ते पाहावे. मतभेद अगदीच टोकाचे असतील आणि मार्ग निघण्याची शक्‍यता संपलेली असेल, तर तेवढा मतभेदाचा विषय बाजूला ठेऊन बाकी संबंध कायम ठेवले जाऊ शकतात. अर्थात यासाठी दोन्ही बाजूच्या व्यक्‍ती तेवढ्या प्रगल्भ असणे आवश्‍यक आहे. कारण बोलणे म्हणजे एकमेकांना त्यानिमित्ताने टोचणे किंवा कलगीतुरा नव्हे, तर संभाषण होय. अशा प्रकारे मतभेद विसरून संबंध कायम ठेवणारी माणसे हे समृद्ध मानसिकतेचे लक्षण आहे. अशा पद्धतीने वागणारी माणसेच मोठी होतात. त्यांच्या लोकसंग्रहात दिवसेंदिवस वाढच होते.
एरवी अशा बालिश अबोल्याने अनेक वर्षांचे चांगले संबंध संपुष्टात येतात. पुढे कधीतरी कळते. ज्या कारणासाठी आपण अबोला धरला होता, तो कोणीतरी तिसऱ्याने निर्माण केलेला गैरसमज होता. किंवा आपलाच अहंकार होता की मीच का बोलावे, मीच का पुढाकार घ्यावा, पण हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. चांगले नाते कोमजलेले असते.
जिथे बोलून किंवा मन मोकळे करूनही दुसरी व्यक्‍ती समजण्यापलिकडची असेल, किंवा आपल्या समजुतदारपणाला आपली कमजोरी समजली जात असेल, अशावेळी अबोल्याला पर्याय नसतो, अर्थात तरीही तुझ्या अशा वागण्यामुळे मी आता तुझ्याशी बोलणे बंद करणार आहे, हे त्या व्यक्‍तीला निश्‍चित सांगावे.
आयुष्य किती आहे, कोणाला माहिती आहे, मित्रांनो. कधीतरी छोट्याशा अहंकारामुळे किंवा गैरसमजामुळे आपण कोणाला तरी अबोल्याची शिक्षा देतो आणि कदाचित मग हळहळण्यापलिकडे आपल्या हातात काहीही उरत नाही.
अलिकडे हा अबोला मोबाईल, फोन, सोशल साईट्‌सलाही घेरून बसला आहे. अनेकदा एखाद्या व्यक्‍तीचा फोनच उचलला जात नाही. त्याच्या संदेशांना उत्तरही दिले जात नाही. कधी महत्त्वाचा निरोप असतो किंवा त्या व्यक्तीला तुमच्या मानसिक आधाराची नितांत गरज असते. अशावेळी त्या व्यक्‍तीची केलेली अडवणूक हा निव्वळ क्रुरपणा आहे.
नवे वर्ष येऊ घातले आहे, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग, अशा काही व्यक्‍ती असतातच. आपण स्वत:हून एक पाऊल पुढे टाकून बघुया का? आयुष्यातला कडू रस कमी होतोय का ते?
अशा अबोला धरलेल्या पण हवाश्‍या वाटणाऱ्या व्यक्‍तीला मनापासून हळुवार हाक देऊन तर बघा, मनावरचे मणामणांचे ओझे क्षणात उतरेल आणि मनातल्या सुकलेल्या झाडाला कोवळी लुसलुशीत पालवी फुटेल.
स्वाती
बाजीराव मस्तानीच्या निमित्ताने
"बाजीराव मस्तानी' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच त्यातल्या "पिंगा' या गाण्याविषयी वाद सुरू झाला. अलीकडे चित्रपट आणि वाद हे समीकरणच झाले आहे. कदाचित तो प्रसिद्धीचा फंडा असावा. माध्यमांची भाऊगर्दी, त्यातून मिळणारी प्रसिद्धी आणि दर आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या शेकडो चित्रपटांची स्पर्धा. कोटींच्या क्‍लबमध्ये सामील होण्यासाठी निर्मात्यांची सुरू असलेली धडपड. या सगळ्यामुळे असेल कदाचित, पण चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यापासूनच त्याविषयीची प्रसिद्धी पद्धतशीरपणे केली जाते आणि हळूहळू वादही उत्पन्न केले जातात. "बाजीराव मस्तानी'त नायक-नायिका असलेले रणवीर सिंग आणि दीपिका यांच्याच भूमिका असलेला "रामलीला' हा चित्रपटही त्याच्या नावावरून असाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता हा योगायोग की आणखी काही... हे प्रेक्षकांनीच ठरवावे.
"बाजीराव मस्तानी' हा चित्रपट त्यातले पात्र सोडले तर संजय लीला भन्सालीच्याच "देवदास' चित्रपटाची कॉपी आहे. भव्यदिव्य सेट्‌स, ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, एकाच व्यक्‍तीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या दोन प्रेमिकांची कहाणी, एवढेच नव्हे तर देवदासमध्ये "डोला रे डोला'वर नाचणाऱ्या बंगाली पेहरावातल्या पारो आणि चंद्रमुखी आणि बाजीराव-मस्तानीमध्ये पिंगावर नाचणाऱ्या मराठी पेहरावातल्या काशी आणि मस्तानी. इथपर्यंत सगळे सारखे. मात्र देवदास मनात रुततो. बाजीराव साधी मनाची पकडही घेत नाही. "बाजीराव-मस्तानी'ने फिल्मफेअर पुरस्कारांवर मोहोर उमटविली असताना हे विधान धाडसाचे ठरेल.
देवदास शरद्‌चंद्र चटोपाध्यायांच्या कादंबरीवर आधारलेला आहे. याआधी दिलीपकुमारने त्याच्या अभिनयाने देवदास खुलवलाच. वैजयंती माला आणि सुचित्रा सेनने त्याला पूरक साथ दिली. दिलीपकुमारच्या देवदासने सिनेरसिकांच्या मनावर राज्य केले. त्याची छाप असतानाही शाहरुखचा देवदासही रसिकांनी उचलून धरला. त्याचे श्रेय शरद्‌चंद्रांच्या प्रतिभेला जाते. त्यातल्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या संवादांना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शाहरुखच्या अभिनयाला जाते. शाहरुख देवदास जगला. शाहरुखने देवदास मनात ठसवला. पारोला सतावणारा देवदास, वहिनीला चिडवणारा देवदास, वडिलांच्या प्रेमाला आसुसलेला देवदास, आईवर प्रेम करणारा देवदास, मित्राच्या शपथेसाठी दारू पिणारा देवदास, चंद्रमुखीचे जीवन व्यापून उरलेला देवदास आणि पारोला दिलेल्या शब्दासाठी अंतिम क्षणी तिच्या दारी आलेला देवदास. शाहरुखने साकारलेला देवदास हाच शरद्‌चंद्राचा खराखुरा देवदास वाटतो.
बाजीरावची भट्टी मात्र जमलीच नाही. संजयला मराठी मनात रुजलेला शूर योद्धा बाजीराव दाखवायचाच नव्हता. त्याला बाजीराव-मस्तानीची प्रेमकथाच रंगवायची होती. त्यामुळे योद्धा बाजीराव संजयच्या चित्रपटात दिसला नाही, त्याबद्दल तक्रार नाही, पण मस्तानीवर जिवापाड प्रेम करणारा बाजीरावही रणवीरला नीट रंगवता आला नाही. बाजीराव पेशवे हे एक ऐतिहासिक व्यक्‍तिमत्त्व आहे. मराठी साम्राज्याला वैभव प्राप्त करून देण्याचे श्रेय बाजीरावाला जाते. असा शूरवीर, लोकमान्य पुरुष तेवढ्याच गंभीरपणे साकारला गेला पाहिजे, भलेही त्याची प्रेमकहाणी रंगवायची असो. मराठी मनांमध्ये बाजीरावाची विशिष्ट प्रतिमा आहे. ऐतिहासिक पात्र रंगवताना ते खूप जबाबदारीने साकारायचे असते. जनसामान्यांच्या मनातील प्रतिमेला तडा देऊन ती भूमिका कधीच अजरामर करता येत नाही. केवळ रूपरंग त्या व्यक्‍तिमत्त्वाच्या जवळ जाणारे असणे पुरेसे नाही. ती भूमिका जगावी लागते. त्यात पुरेपूर उतरावे लागते. ती भूमिका जिवंत करावी लागते. रणवीर सिंग या प्रयत्नांत सपशेल अपयशी ठरला आहे. रणवीर या चित्रपटात बाजीराव न वाटता विदूषक वाटला, बाजीरावाचा बहुरूपी वाटला. रणवीरवर चित्रित झालेले "दुष्मन की कैसे वाट लवली' हे गाणे, त्यातील रणवीरचा बालिश अभिनय, त्यातील निरर्थक शब्द म्हणजे तर रणवीरच्या विदूषकीपणाचा कळस आहे. पिंगा गाण्यावर आक्षेप घेण्यापेक्षा मराठी माणसांनी या गाण्यावर आक्षेप घ्यायला पाहिजे होता.
मस्तानीच्या आरसपानी दैवी सौंदर्याशिवाय तिच्याविषयी इतिहासात फारशी नोंद आढळत नाही. कदाचित त्यावेळच्या समाज आणि राज्य व्यवस्थेने तशी नोंद होऊ नये, याची पुरेशी काळजी घेतली असेल. ती शूर होती, स्वाभिमानी होती आणि बाजीरावावर नितांत प्रेम करत होती, या सगळ्या पैलूंवर या चित्रपटानेच प्रकाश टाकला आहे; मात्र दीपिकाचीही भट्टी नेहमीसारखी जमली नाही, असेच तिने साकारलेल्या मस्तानीविषयी म्हणावे लागेल. समाजाने अव्हेरलेली देवदासची चंद्रमुखी आपले अव्हेरलेपण, समाजातले आपले नगण्य स्थान स्वीकारूनही अलगद मनात रुजते, तसे मस्तानीच्या बाबतीत होत नाही. तुलनात्मक उदाहरणच द्यायचे तर देवदासमधल्या पारो आणि चंद्रमुखीचे संवाद आणि "बाजीराव मस्तानी'मधल्या काशी आणि मस्तानीच्या संवादांचे देता येईल, पारोच्या अभिमानाला चंद्रमुखीची नम्रता पुरून उरली आहे. पारोच्या खानदानी बाण्याला चंद्रमुखी देवदासवरच्या निरपेक्ष प्रेमाने जिंकून घेते. तशी प्रचिती मस्तानी आणि काशीच्या संवादांतून येत नाही. उलट आपण या पेशवीणबाईचे अपराधी आहोत, असाच काहीसा भाव मस्तानीच्या संवादांतून आणि अभिनयातून व्यक्‍त होत राहतो.
हा संपूर्ण चित्रपट व्यापून उरणारे एकच पात्र आहे, ते म्हणजे प्रियांकाने रंगवलेली काशीबाई. सपोर्टिंग रोल असूनही प्रियांकाने या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. विशेषत: राघोबाच्या जन्मानंतर शनिवारवाड्यात प्रवेश करताना बाजीरावाला केवळ नजरेतून दुर्लक्षित करणारा प्रियांकाचा अभिनय, बाजीराव-मस्तानीला मस्तानी महालाच्या दारावर ओवाळणारी आणि "ये स्वागत केवल इस चौखट पर है, दिलके चौखट पर नहीं', असे सांगणारी प्रियांका, बाजीराव शेवटच्या मोहिमेवर निघाला असताना त्याला राधाकृष्णाची कथा ऐकवणारी आणि आपल्या महालात येण्यास मज्जाव करणारी प्रियांका, मनात ठसते. प्रियांकाने शनिवार वाड्यात राहणाऱ्या, भारी वस्त्र आणि अलंकारांनी नटलेल्या घरंदाज स्त्रीच्या मनातले अव्हेरलेपणाचे दु:ख प्रियांकाने तिच्या अभिनयाद्वारे नेमके पकडले आहे. प्रियांकाने रंगवलेली काशीबाई पाहून का कोण जाणे, "साहिब, बीवी और गुलाम'मधली छोटी बहू आठवून जाते. प्रियांका काशीबाईची भूमिका जगली आहे. कदाचित प्रियांकाच्या कसदार अभिनयापुढे दीपिकाचा अभिनय फिका भासतो.
"बाजीराव मस्तानी' चित्रपट लक्षात राहतो केवळ प्रियांकाच्या जीव ओतून केलेल्या अभिनयामुळे.
-स्वाती हुद्दार

बाजीराव मस्तानीच्या निमित्ताने
"बाजीराव मस्तानी' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच त्यातल्या "पिंगा' या गाण्याविषयी वाद सुरू झाला. अलीकडे चित्रपट आणि वाद हे समीकरणच झाले आहे. कदाचित तो प्रसिद्धीचा फंडा असावा. माध्यमांची भाऊगर्दी, त्यातून मिळणारी प्रसिद्धी आणि दर आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या शेकडो चित्रपटांची स्पर्धा. कोटींच्या क्‍लबमध्ये सामील होण्यासाठी निर्मात्यांची सुरू असलेली धडपड. या सगळ्यामुळे असेल कदाचित, पण चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यापासूनच त्याविषयीची प्रसिद्धी पद्धतशीरपणे केली जाते आणि हळूहळू वादही उत्पन्न केले जातात. "बाजीराव मस्तानी'त नायक-नायिका असलेले रणवीर सिंग आणि दीपिका यांच्याच भूमिका असलेला "रामलीला' हा चित्रपटही त्याच्या नावावरून असाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता हा योगायोग की आणखी काही... हे प्रेक्षकांनीच ठरवावे.
"बाजीराव मस्तानी' हा चित्रपट त्यातले पात्र सोडले तर संजय लीला भन्सालीच्याच "देवदास' चित्रपटाची कॉपी आहे. भव्यदिव्य सेट्‌स, ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, एकाच व्यक्‍तीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या दोन प्रेमिकांची कहाणी, एवढेच नव्हे तर देवदासमध्ये "डोला रे डोला'वर नाचणाऱ्या बंगाली पेहरावातल्या पारो आणि चंद्रमुखी आणि बाजीराव-मस्तानीमध्ये पिंगावर नाचणाऱ्या मराठी पेहरावातल्या काशी आणि मस्तानी. इथपर्यंत सगळे सारखे. मात्र देवदास मनात रुततो. बाजीराव साधी मनाची पकडही घेत नाही. "बाजीराव-मस्तानी'ने फिल्मफेअर पुरस्कारांवर मोहोर उमटविली असताना हे विधान धाडसाचे ठरेल.
देवदास शरद्‌चंद्र चटोपाध्यायांच्या कादंबरीवर आधारलेला आहे. याआधी दिलीपकुमारने त्याच्या अभिनयाने देवदास खुलवलाच. वैजयंती माला आणि सुचित्रा सेनने त्याला पूरक साथ दिली. दिलीपकुमारच्या देवदासने सिनेरसिकांच्या मनावर राज्य केले. त्याची छाप असतानाही शाहरुखचा देवदासही रसिकांनी उचलून धरला. त्याचे श्रेय शरद्‌चंद्रांच्या प्रतिभेला जाते. त्यातल्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या संवादांना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शाहरुखच्या अभिनयाला जाते. शाहरुख देवदास जगला. शाहरुखने देवदास मनात ठसवला. पारोला सतावणारा देवदास, वहिनीला चिडवणारा देवदास, वडिलांच्या प्रेमाला आसुसलेला देवदास, आईवर प्रेम करणारा देवदास, मित्राच्या शपथेसाठी दारू पिणारा देवदास, चंद्रमुखीचे जीवन व्यापून उरलेला देवदास आणि पारोला दिलेल्या शब्दासाठी अंतिम क्षणी तिच्या दारी आलेला देवदास. शाहरुखने साकारलेला देवदास हाच शरद्‌चंद्राचा खराखुरा देवदास वाटतो.
बाजीरावची भट्टी मात्र जमलीच नाही. संजयला मराठी मनात रुजलेला शूर योद्धा बाजीराव दाखवायचाच नव्हता. त्याला बाजीराव-मस्तानीची प्रेमकथाच रंगवायची होती. त्यामुळे योद्धा बाजीराव संजयच्या चित्रपटात दिसला नाही, त्याबद्दल तक्रार नाही, पण मस्तानीवर जिवापाड प्रेम करणारा बाजीरावही रणवीरला नीट रंगवता आला नाही. बाजीराव पेशवे हे एक ऐतिहासिक व्यक्‍तिमत्त्व आहे. मराठी साम्राज्याला वैभव प्राप्त करून देण्याचे श्रेय बाजीरावाला जाते. असा शूरवीर, लोकमान्य पुरुष तेवढ्याच गंभीरपणे साकारला गेला पाहिजे, भलेही त्याची प्रेमकहाणी रंगवायची असो. मराठी मनांमध्ये बाजीरावाची विशिष्ट प्रतिमा आहे. ऐतिहासिक पात्र रंगवताना ते खूप जबाबदारीने साकारायचे असते. जनसामान्यांच्या मनातील प्रतिमेला तडा देऊन ती भूमिका कधीच अजरामर करता येत नाही. केवळ रूपरंग त्या व्यक्‍तिमत्त्वाच्या जवळ जाणारे असणे पुरेसे नाही. ती भूमिका जगावी लागते. त्यात पुरेपूर उतरावे लागते. ती भूमिका जिवंत करावी लागते. रणवीर सिंग या प्रयत्नांत सपशेल अपयशी ठरला आहे. रणवीर या चित्रपटात बाजीराव न वाटता विदूषक वाटला, बाजीरावाचा बहुरूपी वाटला. रणवीरवर चित्रित झालेले "दुष्मन की कैसे वाट लवली' हे गाणे, त्यातील रणवीरचा बालिश अभिनय, त्यातील निरर्थक शब्द म्हणजे तर रणवीरच्या विदूषकीपणाचा कळस आहे. पिंगा गाण्यावर आक्षेप घेण्यापेक्षा मराठी माणसांनी या गाण्यावर आक्षेप घ्यायला पाहिजे होता.
मस्तानीच्या आरसपानी दैवी सौंदर्याशिवाय तिच्याविषयी इतिहासात फारशी नोंद आढळत नाही. कदाचित त्यावेळच्या समाज आणि राज्य व्यवस्थेने तशी नोंद होऊ नये, याची पुरेशी काळजी घेतली असेल. ती शूर होती, स्वाभिमानी होती आणि बाजीरावावर नितांत प्रेम करत होती, या सगळ्या पैलूंवर या चित्रपटानेच प्रकाश टाकला आहे; मात्र दीपिकाचीही भट्टी नेहमीसारखी जमली नाही, असेच तिने साकारलेल्या मस्तानीविषयी म्हणावे लागेल. समाजाने अव्हेरलेली देवदासची चंद्रमुखी आपले अव्हेरलेपण, समाजातले आपले नगण्य स्थान स्वीकारूनही अलगद मनात रुजते, तसे मस्तानीच्या बाबतीत होत नाही. तुलनात्मक उदाहरणच द्यायचे तर देवदासमधल्या पारो आणि चंद्रमुखीचे संवाद आणि "बाजीराव मस्तानी'मधल्या काशी आणि मस्तानीच्या संवादांचे देता येईल, पारोच्या अभिमानाला चंद्रमुखीची नम्रता पुरून उरली आहे. पारोच्या खानदानी बाण्याला चंद्रमुखी देवदासवरच्या निरपेक्ष प्रेमाने जिंकून घेते. तशी प्रचिती मस्तानी आणि काशीच्या संवादांतून येत नाही. उलट आपण या पेशवीणबाईचे अपराधी आहोत, असाच काहीसा भाव मस्तानीच्या संवादांतून आणि अभिनयातून व्यक्‍त होत राहतो.
हा संपूर्ण चित्रपट व्यापून उरणारे एकच पात्र आहे, ते म्हणजे प्रियांकाने रंगवलेली काशीबाई. सपोर्टिंग रोल असूनही प्रियांकाने या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. विशेषत: राघोबाच्या जन्मानंतर शनिवारवाड्यात प्रवेश करताना बाजीरावाला केवळ नजरेतून दुर्लक्षित करणारा प्रियांकाचा अभिनय, बाजीराव-मस्तानीला मस्तानी महालाच्या दारावर ओवाळणारी आणि "ये स्वागत केवल इस चौखट पर है, दिलके चौखट पर नहीं', असे सांगणारी प्रियांका, बाजीराव शेवटच्या मोहिमेवर निघाला असताना त्याला राधाकृष्णाची कथा ऐकवणारी आणि आपल्या महालात येण्यास मज्जाव करणारी प्रियांका, मनात ठसते. प्रियांकाने शनिवार वाड्यात राहणाऱ्या, भारी वस्त्र आणि अलंकारांनी नटलेल्या घरंदाज स्त्रीच्या मनातले अव्हेरलेपणाचे दु:ख प्रियांकाने तिच्या अभिनयाद्वारे नेमके पकडले आहे. प्रियांकाने रंगवलेली काशीबाई पाहून का कोण जाणे, "साहिब, बीवी और गुलाम'मधली छोटी बहू आठवून जाते. प्रियांका काशीबाईची भूमिका जगली आहे. कदाचित प्रियांकाच्या कसदार अभिनयापुढे दीपिकाचा अभिनय फिका भासतो.
"बाजीराव मस्तानी' चित्रपट लक्षात राहतो केवळ प्रियांकाच्या जीव ओतून केलेल्या अभिनयामुळे.
-स्वाती हुद्दार
बाळू
आज अचानक बाळू आठवला. खूप वर्षांआधी मी शाळेत शिकत असताना माझ्या माहेरच्या घरी बाळू यायचा. कधीही अवचित. वळिवातल्या पावसासारखा. कधीकधी आठवड्यातून दोनदा. तर कधी दोन-तीन महिन्यांनी एकदा. बाळू आला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्याच्याभोवती गोळा व्हायचे. बाळूची वेळ बहुदा दुपारची. मायमाऊल्यांची धावपळ आटोपलेली असायची. घरची पुरुषमंडळी नोकरीधंद्याला गेलेली असायची. मोठी मुलं शाळा-कॉलेजला गेलेली असायची. मायमाऊल्या जरा निवांत झालेल्या असायच्या. बारकी पोर उगाचच इकडेतिकडे मिरवित असायची आणि अशावेळी बाळूची हाळी यायची. काय काकू काय करून राहिल्या. बाप्पा अजून झालचं नाही का जेवणखाणं. बाळूचा खणखणीत आवाज चाळीतल्या सगळ्या घरात पोहोचायचा आणि सगळ्या बायाबापड्या हातातली काम दूर सारून बाळूभोवती जमा व्हायच्या. कित्ती दिवसांनी आला रे बाळू, कुठं दडून बसला व्हता इतके दिवस? अशा चौकशा सुरू व्हायच्या. बाळूही प्रत्येकच बाईच्या प्रश्‍नाला समर्पक उत्तर द्यायचा. एव्हाना बाळूभोवती पोराटोरांचा गलका सुरू झालेला असायचा. नुकतच बोलायला लालेल्या कार्ट्यापासून जख्ख म्हाताऱ्यांपर्यंत सर्वेजण बाळूला अरे बाळूच म्हणायचे. कुणीही त्याच्या नावापुढे कधी काका, मामा, दादा जोडले नाही. आणि बाळूलाही कधी त्यात वावगे वाटले नाही. पाहता पाहता सगळी चाळ बाळूभोवती गोळा व्हायची. बाळूचा वेषही कायम एकच. कधीतरी पांढरा असावा,असा ढगळ, विटलेला पायजामा. त्यावर दोन तीन ठिकाणी फाटलेला शर्ट, खांद्यावर मळका पंचा. डोक्‍यावरचे केस कायम भादरलेले. मध्यभागी एक काळीपांढऱ्या केसांची शेंडी. दाढीचे खुंट वाढलेले. पायात कधी तुटकी चप्पल, तर कधी ती पण नाही. आवाज मात्र कायम खणखणीत, उत्साही. सगळ्या आयाबाया जमल्या, इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या की कुणीतरी काकू बाळूला गाणं म्हणायचा आग्रह करायची, आणि जणू त्याचीच वाट पाहात असलेला बाळू तारस्वरात आपलं गायन सुरू करायचा. चाळीतल्या एखाद्या घरात सबकुछ बाळू असलेला विविध मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू व्हायचा. मध्ये बाळू आणि त्याच्या भवताल चाळीतल्या सगळ्या आयाबाया आणि पोरंसोरं. एव्हाना बाळूचा खांद्यावरचा पंचा कमरेला बांधला जायचा. आणि खड्या आवाजात बाळू गाऊ लागायचा. डॉक्‍टर होणा...र. लहान मुलांना इंजेक्‍शन मी कधी न दे...णार. इथून सुरू झालेला बाळूच्या गाण्याचा प्रवास अनेक मराठी कविता पार करीत करीत भातुकलीच्या खेळामधली, वगैरे गाण्यांपर्यंत येऊन पोहोचायचा. सोबतीला उड्या मारीत केलेला नाच. त्यानंतर मुद्दाम फर्माईश केलेली एक दोन गाणी आणि नंतर बाळूचे खड्या आवाजातील उखाणे. महादेवच्या पिंडीवर उदबत्तीचा वास, रावांना देते मी जिलबीचा घास. अशा उखाण्यांची अहमहमिका लागायची. गाणे आणि उखाण्यांची मेजवानी संपली की, कोणीतरी मावशी, काकु बाळूला म्हणायच्या, दळण आणून देतोस का बाळू? बाळू लगेच तयार व्हायचा. मग डोक्‍यावर काकुंचा, हातात मावशींचा डबा घेऊन बाळूचे ध्यान चक्‍कीवर जायचे. चक्‍कीवरून आल्यावर कोणीतरी विहीरीचे पाणी काढून मागायचे. कोणीतरी आंगण झाडून मागायचे, अशी प्रत्येक घरची कामाची जंत्री संपली की सगळ्या घरातून बाळूसाठी जेवण यायचे, काकू म्हणायच्या बाळू ही लोणचाची डबी घेऊन जा, नवीन घातले आहे. मावशी म्हणायच्या, बाळू फणसाची भाजी खाऊन बघ. कोणी भात वरण, कोणी काही गोडधोड बाळूसाठी आणून द्यायचे. बाळू यथेच्छ जेवायचा. वरून एखाद्या घरातून आलेला फक्‍कड चहा बशीत ओतून मन लाऊन प्यायचा. जेवणाची, चहाची मन भरून स्तुती करायचा. तेवढ्यात एखाद्या म्हाताऱ्या आजी कपड्यांचे बोचके घेऊन यायच्या. बाळू हे आमच्या मन्याचे शर्ट आहेत, चांगलेच आहेत हो, तुला होतील आणि या धडक्‍या चादरी आहेत, मुद्दाम तुझ्यासाठी काढून ठेवल्या होत्या, घेऊन जा, असे म्हणत प्रेमाने ते बोचकं बाळूच्या स्वाधीन केलं जायचं. येतो वं काकू, असा मोठ्ठ्याने निरोप घेऊन बाळू उड्या मारत निघुन जायचा.
बाळू आमच्या चाळीव्यतिरिक्‍त कधी एखाद्या खानावळीत पाणी भरताना दिसायचा, कधी धान्याच्या दुकानात पोते उचलताना दिसायचा. तेव्हाही त्याचा उत्साह तेवढाच असायचा. बाळूला कधी चिंता करताना, विचार करताना, निराश झालेलं कुणी पाहिलंच नाही. असा सर्वत्र संचार असलेला बाळू कधीतरी अचानक यायचा बंद झाला. सुरुवातीला वर्ष दोन वर्ष त्याची सगळ्यांना आठवण यायची. हळुहळु जीवनाच्या रामरगाड्यात बाळू विस्मरणात गेला. तो कुठून आला, कोणाचा कोण होता, कुठे राहायचा, हे कुणालाच कधी कळलं नाही. तसंचं तो अचानक कुठे गेला, त्याचं काय झालं, हे देखील कुणाला कळलं नाही. पुढे चाळीतल्या सगळ्यांचीच पांगापांग झाली. मुली लग्न होऊन सासरी गेल्या, मुलं नोकरी व्यवसायासाठी बाहेर पडले, कुणी ब्लॉकमध्ये राहायला गेले, मात्र आमच्या मुलांना बडबडगीत शिकवताना हटकून आजही बाळू आठवतो, आणि नकळत डोळ्याच्या पापण्या ओलावतात. दोन घास अन्नासाठी आणि कुणाच्या तरी उतरलेल्या कपड्यांसाठी बाळू राबत राहिला, दोन घटका मनोरंजन करत राहिला. वस्तीनही बाळूला आपलं मानलं. आपल्या घासातला घास त्याच्यासाठी काढून ठेवला. सणासुदीला गोडाधोडात बाळूचा वाटा पक्‍का असायचा. वस्तीतल्या प्रत्येक घरात स्वयंपाकघरापर्यंत वावर असलेला बाळू कोणालाच परका वाटला नाही. आजच्या काळात असा बाळू एखाद्या वस्तीत सापडणं कठीणच आहे. कारण बाळूसारख्यांना सामावून घेणारी समाजव्यवस्थाच आता उसवली आहे.
स्वाती हुद्दार
6 एप्रिल 2016
महालक्ष्मीच्या निमित्ताने...
शनी चौथरा सर करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. त्याची भरपूर प्रसिद्धीही झाली. सोशल मीडियावर त्याचे बरेवाइट पडसादही उमटले. त्यात शासन, प्रशासन, न्यायालय, सामान्य माणसे सगळी ओढली गेली. कायदा सुव्यवस्था पणाला लागली. शेवटी तृप्ती देसाई आणि समस्त महिला मंडळाने शनी चौथरा सर केला. दुसरे मीशन होते कोल्हापुरचे महालक्ष्मी मंदीर. तृप्ती देसाई त्यांच्या बाणेदार, तडफदार, लढाऊ साथीदारांसह तिथे पोहोचल्या. आम्हाला पाहिजे त्या वेषात महालक्ष्मी गाभाऱ्यात प्रवेश मिळावा, हा त्यांचा अट्टाहास तिथेही पूर्ण झाला. हाणामारी झाली. पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. पुरेशी प्रसिद्धी झाली आणि हे मीशन देखील पूर्ण झाले. त्यानंतर त्र्यंबकेश्‍वरचे गर्भगृह. तिसरे पाऊलही यशस्वी. आता मीशन हाजी अली दर्गा. तृप्ती देसाईंचा आतापर्यंतचा आवाका पाहता हे मीशनही पूर्ण होईल. त्याचीही प्रसिद्धी होईल. वाद-प्रतिवाद होतील. पुन्हा पुढचे श्रद्धास्थान. पुन्हा तेच. पण पुढे काय?
महिलांना मंदीर, मशीद प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला तर त्यांचे मुलभुत प्रश्‍न सुटणार आहेत का? जवळपास दररोज घडणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या घटना थांबणार आहेत का? कुणाला तरी पोटाची आग विझवण्यासाठी करावा लागणारा देहव्यापार संपणार आहे का? काही गलिच्छ नजरांमध्ये त्याजागी सन्मान दिसणार आहे का? आईच्या गर्भातच होणाऱ्या स्त्री भ्रुणहत्या रोकल्या जाणार आहेत का? प्रत्येक स्त्री साक्षर होणार आहे का? जर या प्रश्‍नांची उत्तरे नाही असतील तर हा व्यापार कशासाठी? केवळ प्रसिद्धीसाठी. कारण हा प्रसिद्धीचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. देहव्यापारात पिचलेल्या महिलांना त्यातून बाहेर काढण्याने एवढी प्रसिद्धी मिळत नसते. दारूबंदीसाठी लढा देऊन इतकी प्रसिद्धी मिळत नाही. सुदूर आदिवासी भागात सगळी सुख त्यागून आदिवासींसाठी रात्रंदिन राबण्याने एवढी प्रसिद्धी मिळत नाही. कुष्ठरोग्यांच्या जखमा धुऊन नवऱ्याच्या खांद्याला खांदा लाऊन रात्रंदिन कष्टल्याने एवढी प्रसिद्धी मिळत नाही. अनाथांची आई होण्याने एवढी प्रसिद्धी मिळत नाही. सिंधुताई सपकाळ, राणी बंग, साधना आमटे, मंदा आमटे, स्मिता कोल्हे होण्यापेक्षा तृप्ती देसाई होणे सोपे आहे. भलेही मुळ प्रश्‍न कायम राहिले तरी चालतील. इंस्टंट प्रसिद्धी नक्‍कीच मिळेल.
उरला प्रश्‍न रुढी-परंपरा तोडण्याचा. प्रत्येक धर्म-पंथाच्या, प्रांताच्या आपापल्या रुढी-प्रथा आहेत. गुरूद्वारामध्ये मथ्था झाकल्याशिवाय कुणालाही प्रवेश नाही, तो पुरुष असो की महिला. दक्षिणेतील पद्मनाभ मंदीरात पुरुषांना विशिष्ट वेषातच प्रवेश आहे. या परंपरांमागे कदाचित काही घटनांचे संदर्भ असतील, जे कालौघात पुसले गेले. या परंपरा बरोबरच असतील, असे नाही. पण त्या परंपरा तोडण्याचा अट्टाहास कशासाठी? आम्ही विरोधासाठी विरोध करू शकतो, यापेक्षा जास्त काही यातून साध्य होणे नाही.
वैदेही
ताईराणी...
खूप खूप आशीर्वाद बेटा
येत्या 8 मे ला तू 21 वर्षांची होते आहेस. एक सुजाण, समंजस आणि खूप शहाणी मुलगी. आतापर्यंतचे तुझे वाढदिवस साजरे करताना न जाणवलेली एक अनामिक हुरहुर यावेळी जाणवते आहे. एकीकडे तुला सर्वच दृष्टीनं मोठं झालेलं पाहून उर अभिमानाने भरून येतो आहे, दुसरीकडे मात्र काहीतरी हातातून निसटून जात असल्याची अस्वस्थ जाणीव. खरंतर तू जशी मोठी होत गेली, तसं आपलं नातं अधिक बहरत गेलं. आधी केवळ आई-मुलीचं असलेलं आपलं नातं नंतर मैत्रिणींचंही झालं. माझ्या जीवनातली बहिणीची रिकामी जागाही तू सहज घेतली आणि आजी गेल्यानंतरच्या एका भावूक क्षणी तर तुच माझी आई झालीस. मात्र या सगळ्यात तुझं बालपण दूर दूर गेलं. ही हुरहुर कदाचित त्याची आहे. तुझं लहानपण घट्ट पकडून ठेवावसं वाटतं आहे. तू टाकलेलं पहिलं पाऊल, तू मला पहिल्यांदा आई म्हणून हाक मारलीस, तो क्षण. तुझ्या कुरळ्या जावळाचा सुगंध, तुझे मनगट्या घातलेले गोरेगोबरे हात आणि वाळे घातलेली गुलाबी पावलं. जीवाला लगडलेल्या या आठवणींची यादी खूप मोठ्ठी होईल. त्या सगळ्या सुखावणाऱ्या आठवणी मी तुझ्या आंगड्या टोपड्यांमध्ये गुंडाळून मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत. तुला मोठं होताना पाहणं हा देखील सुखाचा सोहळा आहे.
हे तुझ्या आयुष्यातलं संक्रमणाचं वर्ष. आता उबदार घरट्यातून विस्तीर्ण मोकळ्या अवकाशात उड्डाण घेणं अपरिहार्य आहे. त्यासाठी पंखांमध्ये पुरेसं बळ तू गोळा केलं आहेस. मात्र यावेळी मला आठवते, ती श्रावण बाळाची गोष्ट ऐकताना स्फुंदणारी तू. काबुलीवाला पाहताना हमसाहमशी रडणारी हळवी वैदेही. मात्र बेटा जगात वावरताना हळवेपण आणि कणखरपणा यातील अदृष्य सीमारेषा जपावी लागते. आपला हळवेपणा आपला दुबळेपणा ठरू नये. अनेक निर्णय मनानं नव्हे डोक्‍यानं घ्यावे लागतात. संवेदना आणि कर्तव्य यांची सरमिसळ करून चालत नाही. हे मनावर कायम कोरून घे. एकदा सुरक्षित चार भिंतींच्या बाहेर पडलीस की, सगळ्या प्रवृत्तीची माणसं भेटतील. तेव्हा नीरक्षीर विवेक आकळलाच पाहिजे. आयुष्यात धनाची जोड नाही मिळाली तरी चालेल, पण माणसांच वैभव असलंच पाहिजे. त्यासाठी दोन्ही आबांचा आदर्श ठेव. सोशिकपणासाठी अनघाआजीचा आदर्श असू दे आणि कुठल्याही परिस्थितीला हिंमतीनं सामोरं जाण्यासाठी लताआजीचा आदर्श असू दे.
आता तुझे निर्णय तुलाच घ्यायचे आहेत, कधीतरी ते चुकतीलही. मात्र कोणत्याही परिस्थितीत तू एकटी नाहीस. मी आणि बाबा सदैव तुझ्या पाठीशी आहोत, याची जाणिव असू दे.
मल्लिकार्जून मन्सूर यांनी गायलेली सुंदर बंदीश आहे, जेव्हा समुद्राला ओहोटी लागते, तेव्हा चंद्र हतबल असतो आणि जेव्हा चंद्राला ग्रहण लागतं, तेव्हा समुद्रही हतबल असतो, मात्र या दोन्ही स्थिती कायम नसतात. समुद्राला पुन्हा भरती येते आणि चंद्राचं ग्रहणही सरतं. आयुष्याचही असचं आहे. सुख आणि दु:ख कधीच कायम नसते. मात्र दोन्ही परिस्थितीत आपला संयम ढळू द्यायचा नसतो.
प्रामाणिकपणानं आणि मेहनतीनं यशोशिखर गाठ, आकाशाला गवसणी घाल. पण पाय जमिनीवरच असू देत. कितीही वादळ आलीत तरी मूळं जमिनीत घट्ट रुजलेली असली ना की झाड उन्मळत नाही. आयुष्यात यश, ऐश्‍वर्य मिळवताना माणूस म्हणूनही मोठ्ठी मोठ्ठी होत राहा, बाबांसारखी.
तुझ्या नावामागे असलेल्या बाबांच्या नावाला आणि पूर्वजांच्या आडनावाला अभिमानं वाटेल, असचं नेहमी वाग. आणि गार्गीवर खूप खूप माया कर बेटा. मला आईपण दिल्याच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही. मी तुमच्यासाठीच आहे बेटा. फक्‍त तुमच्याचसाठी.

तुझीच आई
swati
 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह