घर दोघांचेअत्याधुनिक बांधणीचे प्रशस्त घर. घरासभोवती मोकळी जागा. घरात भरून राहिलेला नवीन बांधकामाचा थंडावा. नुकत्याच केलेल्या रंगरंगोटीचा कोंदून राहिलेला सुगंध. वास्तुपुजा असल्याने घरावर केलेली रोषणाई. प्रवेशद्वारावर बांधलेले केळीचे खांब. दारासमोर रेखलेली सुंदर रांगोळी. सगळे काही आखीव रेखीव. दारातच त्याने जंगी स्वागत केले. नव्या घराचा, वास्तुपुजनाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता. हस्तांदोलन केल्यावर त्याने घर दाखवायला सुरुवात केली. ही ड्रॉईंगरुम. तो म्हणाला. उंची सोफासेट, खिडक्यांवर सोडलेले सुरेख रंगसंगती साधणारे पडदे, कोपऱ्यातील महागडी फुलदाणी, टीव्ही, म्युझिक सिस्टम, प्रकाश परावर्तित करणारे झुंबर आणि समाजातले त्याचे स्थान दर्शविणारे मोठ्या मंडळींबरोबरचे निवडक फोटो, त्याला मिळालेल्या पुरस्कारांनी भरलेली शोकेस आणि छोटासा बारही. सगळीकडे त्याच्या अस्तित्वाच्या खुणा ठासून भरलेल्या. बारकडे अंगुली निर्देश करून तो म्हणाला, दिवसभर घरासाठी राबल्यानंतर श्रमपरिहार हवाच ना! त्यानंतर त्याचे गडगडाट करणारे सातमजली हास्य. तेवढ्यात ती झळकली. कोणाशी तरी बोलत होती.घर बघणाऱ्या आमची मिरवणुक त्याच्यासकट स्टडी रुमकडे. उच्च अभिरुचीची दाद देणारी प्रत्येक गोष्ट. छोटासा राऊंड टेबल, त्याच्यासमोर आरामदायी खुर्ची, वाचताना सुलभ होईल अशी प्रकाशयोजना. त्याच्या आवडीच्या पुस्तकांनी भरलेली कपाटे. कपाट उघडून दाखवत अनेक पुस्तकांविषयी तो भरभरून बोलला. ही सगळी पुस्तके मी विशेष आवडीने जमवली आहेत. माझा वाचनाचा व्यासंग दांडगा आहे, वगैरे वगैरे. कोपऱ्यात जुना ग्रामोफोन आणि एक सीडी प्लेयरही. बाजुला छोट्या कपाटात त्याच्या आवडत्या गाण्यांच्या सीडीज आणि एलपीजही. गझल मला खूप आवडतात. वाचताना सोबतीला जगजित लागतोच. काय दर्द आहे हो त्याच्या आवाजात. तो म्हणाला. याची बायको फार सुंदर गाते, असे ऐकल्याचे काहीतरी पुसटसे आठवले, एवढेच. आणि हो, स्टडी रुममधल्या आरामदायी खुर्चीच्या बाजूला छोटासा स्टुल आणि त्यावर एक ऍश ट्रे आणि बाजुला खुण घालून ठेवलेले कमला दासचे माय स्टोरी. माझी नजर त्यावर रोखलेली पाहून तो म्हणाला, हे माझे विशेष आवडीचे पुस्तक बरं का? काय संघर्ष आहे हो बाईचा. आजुबाजुला शोधक नजर फिरवली. त्याची बायको कुठेच नव्हती. आम्ही सगळे कीचनमध्ये. हे कीचन. त्याने मोघम सांगितले. देवघर, इतर खोल्या असे करीत करीत आमची मिरवणुक वरच्या मजल्यावरच्या बेडरुममध्ये. अद्ययावत सुखसोयींनी नटलेली बेडरुम, आरामदायी बेड, सुरेख रंगसंगतीने नटलेल्या भिंती, त्याच्याशी मेळ खाणारे झिरमिरीत पडदे, भिंतीवर एक अबोल ऍब्स्ट्रॅक्ट पेंटींग. ते कोणत्या प्रदर्शनातून किती कष्टाने आणि किती प्रयासाने खास बेडरुममध्ये लावण्यासाठी भरपूर किंमत देऊन त्याने खरेदी केले, याचे रसभरीत वर्णन त्याने ऐकवले. त्याच्या बायकोने जे जे स्कुल ऑफ आर्टसमधून पदवी घेतल्याचे आणि लग्नाआधी तिच्या चित्रांचे प्रदर्शन लागल्याचे कधीतरी ऐकले होते. इतकेच. बेडरुमला बाहेर प्रशस्त बाल्कनी. नारळाच्या झावळ्यांआडून आकाशातील चंद्रबिंब सहज दृष्टीपथात यावे अशा पद्धतीने केलेली झुलत्या पाळण्याची रचना, लाजवाबच. तो म्हणाला, मी रोज रात्री या पाळण्यावर बसून रात्रीच्या नीरव शांततेचा आनंद घ्यायला मला खूप आवडते. साग्रसंगीत आणि मनसोक्त घर बघून झाल्यावर आमची यात्रा बुफेकडे. तिथेही हा उत्साहाने ओसंडलेला. म्हणाला, सगळा मेनु माझ्या विशेष आवडीचा. खूप विचारपूर्वक ठरवला आहे. कॅटररला सांगितले, नो कॉम्प्रमाईज. आज माझे मोठमोठे क्लायंट्स येणार आहेत ना, शिवाय राजकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती क्षेत्रातील मोठ्या असामींनाही मी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मेनु आणि टेस्ट मी सांगेन, तशीच असली पाहिजे. हळुच विचारले, एवढा सुंदर बंगला बांधलात, बराच खर्च... बॅंक बॅलन्स की...! छे छे, अहो बायको सरकारी नोकरीत आहे ना, तिने कर्ज काढले. पगारातून परस्पर पैसे कापले जातात. चिंता नाही. अहो घर दोघांचे आहे ना! त्याचे निरागस उत्तर! गेल्या दोन तासात त्याने तिचा केलेला हा एकमेव उल्लेख. हो! घर तिचेही होतेच न! घरासाठी घेतलेल्या कर्जाच्या कागदपत्रांवर तिचेच नाव आहे. घर तिचेही असल्याची एकमेव खूण. त्याने विचारपूर्वक ठरवलेल्या मेनुचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. घराच्या प्रवेशदारावर मोठ्या ग्रेनाईटवर सोनेरी अक्षरांत त्याचे नाव कोरले होते. आणि झुलत्या झावळ्यांआडचा आकाशातला चंद्र उदास हसत होता. | |||
Monday, 11 December 2017
Tuesday, 24 October 2017
सरती दिवाळीस्वाती हुद्दारदिवाळी म्हणजे काय उत्सव आणि उत्साहाची रेलचेल. माणसांचे संमेलन, मनोमीलन, आठवणींना उजाळा, नातेसंबंधांची उजळणी. काही हव्याशा नात्यांचा ओलावा आणि दुखावलेल्या नातेबंधांना मलमपट्टी आणि कधीतरी नकोशा पण जपाव्या लागणारी नात्यांची ओढगस्तीही.दिवाळी सरली आणि निवांतपण घरादारावर विसावले. गेले पाच दिवस घरदार, अंगण, भांडीकुंडी आणि माणसांमागेही कमालीची लगबग होती. साऱ्या विश्वावर चैतन्याच्या खाणाखुणा होत्या. अंगणं रांगोळ्यांनी सजली होती. घराघरांत फराळाचे तिखट-गोड सुगंध कोंदले होते. गप्पाष्टक रंगत होती. हास्याच्या लकेरी घुमत होत्या. पणत्या लुकलुकत होत्या. आकाशदिवे दिमाखाने मिरवत होते. फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. आता मात्र सरत्या दीपोत्सवाच्या खाणाखुणांचे रंग घरादारावर पसरू लागले आहेत. परवा घरच्या लेकीबाळींनी कौशल्याने रेखलेली सुंदर रांगोळी जराशी पुसटली आहे. दारावर लावलेल्या झेंडूच्या केशरी माळाही कोमेजल्या आहेत. हिरवेगार आंब्याचे मंगलदायी तोरणही सुकले आहे. फराळाचे जिन्नस ठेवलेल्या पदार्थांनी तळ गाठला आहे. उरलेल्या रांगोळ्यांच्या डब्यांनी कपाटात आपली जागा पटकावली आहे. देवघरासमोरचे औक्षवणाचे तबक कालच्या ओवाळणीच्या सुखद आठवणीत रमले आहे. काही आकाशदिवे आणि दीपमाळा अजूनही तेवताहेत. पाच दिवस घर प्रकाशमान करणाऱ्या पणत्या आता कोनाड्यात जाऊन बसल्या आहेत. काल मिळालेल्या ओवाळणीच्या साडीने कपाटातल्या साड्यांच्या ढिगावर शीग ठेवली आहे. घरदार दिवाळीचे सुख अंगाखांद्यावर मिरवते आहे. दिवाळी म्हणजे काय उत्सव आणि उत्साहाची रेलचेल. माणसांचे संमेलन, मनोमीलन, आठवणींना उजाळा, नातेसंबंधांची उजळणी. काही हव्याशा नात्यांचा ओलावा, आणि दुखावलेल्या नातेबंधांना मलमपट्टी आणि कधीतरी नकोशा पण जपाव्या लागणारी नात्यांची ओढगस्तीही. दिवाळी झाली की रिकामपण भरून राहते मनामनात. श्रावणापासूनची सणउत्सवांची धावपळ समेवर आलेली असते. सणउत्सवाच्या संकल्पना कदाचित बदलल्या असतीलही; मात्र माणसाला सणांचे अप्रूप आजही आहेच. पूर्वी चुलीच्या जाळाशी बसणाऱ्या बायका आज रेडीमेड फराळाने ताट सजवून दिवाळी पहाटला जात असतील. एकमेकांना सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा देत असतील. व्हर्च्युअल भाऊबीज साजरी करीत असतीलही. पण दिवाळीनिमित्त येणारी माहेरची सय तीच असते. डोळे आजही माहेरच्या वाटेकडे लागतात आणि बीजेच्या दिवशी चंद्राला ओवाळताना अलगद डोळ्यांच्या कडाही पाणावतात. दिवाळी संपली आणि आज अंगण पणत्यांनी झगमगले नाही. दीपमाळा लखलखल्या नाहीत. कालपर्यंत पाहुण्यांनी गजबजलेली बैठकीची खोली आज हिरमुसली आहे. अंगणातल्या भिंतीलगतच्या कोपऱ्यात चुकून राहून गेलेली पणती जळलेल्या वातीशी सुखदु:खाच्या गुजगोष्टी करते आहे आणि अंगणाबाहेरच्या कचऱ्याच्या ढिगामध्ये तो चौकापलीकडच्या वस्तीत राहणारा काटकुळा मुलगा एखादा जिवंत फटाका शोधतो आहे. कारण त्याच्या वस्तीत अजून दिवाळी पोहोचलेलीच नाही. | |||
Monday, 9 October 2017
मी मुलगी आहे म्हणून...स्वाती हुद्दार11 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला जागतिक मुलगी दिवस. संयुक्त राष्ट्रसंघाला का गरज भासली मुलगी दिवस साजरा करण्याची? कारण जगभरातील मुलींचे प्रश्न एकसारखेच आहेत. लैंगिक असमानतेचे चटके जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील मुलीला सहन करावे लागत आहेत. मुलगी असण्याच्या समस्यांचा सामना करण्याचे गांभीर्य संयुक्त राष्ट्रसंघातही नोंदले गेले आणि 2012 पासून 11 ऑक्टोबर हा जागतिक मुलगी दिन म्हणून साजरा होतो आहे.परवा एका प्रदर्शनात लागलेल्या छायाचित्राने लक्ष वेधून घेतले. एक पाच वर्षाची छोटीशी मुलगी डोक्यावर पाण्याचा हंडा, पोटाचा नगारा, केसांच्या जटा, हातापायाच्या काड्या, पोटातील भूक डोळ्यात उतरली होती. आणि प्रश्नही होता, मी मुलगी आहे म्हणून ? ते छायाचित्र खूप बोलके होते. 2017 सालीही मुलींची अवस्था समाजात काय आहे, हे त्या छायाचित्राने सांगितले. मुलींची ही अवस्था केवळ आपल्या आजुबाजुला आहे किंवा केवळ आपल्या देशात आहे, असे नाही. बालिकांच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या नाहीत, असा एकही दिवस जात नसेल. थोड्याफार फरकाने जगभर मुली अशाच समस्यांशी आजही लढताहेत. आजही जगभरातल्या 62 कोटी मुली शिक्षणापासून वंचित आहेत. 5 ते 14 वयादरम्यानच्या मुलींना घरकामासाठी राबवून घेतले जाते आहे. चार पैकी एका मुलीचा आजही 18 वर्षापेक्षा कमी वयात विवाह होतो आहे. जगभरातल्या अनेक बालिकांना लैंगिक छळ सोसावा लागतो आणि लाजिरवाणी गोष्ट ही की गुन्हेगार मोकाट सुटतात. बालविवाह, लैंगिक शोषण, कायदेशीर हक्क, आरोग्याचे प्रश्न आणि शैक्षणिक मागासलेपण या मुलींविषयीच्या जागतिक समस्या. या समस्या जागतिक व्यासपीठासमोर याव्यात आणि त्यांच्या निवारणासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न व्हावेत, या जाणिवेतून जागतिक मुलगी दिवसाची सुरुवात झाली. कॅनडाच्या तत्कालिन महिला व बाल कल्याण मंत्री रोना ऍम्ब्रोस यांनी सर्वप्रथम 19 डिसेंबर 2011 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या 55 व्या अधिवेशनात ही संकल्पना मांडली आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंम्बीलीने त्यासाठी मतदान करीत ती संकल्पना उचलून धरली. जागतिक मुलगी दिनाच्या माध्यमातून मुलींच्या कल्याणाच्या दृष्टीने भरीव कार्य करण्यासाठी जागतिक स्तरावरील एक अशासकीय संस्था स्थापन करण्यात आली. मी मुलगी आहे या कॅम्पेनच्या माध्यमातून जगभरातल्या विशेषत: मागास आणि विकसनशील देशातील मुलींच्या पालनपोषणाचे प्रश्न ऐरणीवर आलेत आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येऊ लागले. मुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी विविध देशात अनेक कार्यक्रम राबवले जाऊ लागले. नाटक, खेळ, सेमिनार अशा उपक्रमांमधून बालिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यात आली. 2016 मध्ये लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला महोत्सवात 250 शाळकरी मुलींनी सल्लागाराची भूमिका पार पाडली. अमेरिकेचे तत्कालिन राश्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2016 साली लैंगिक असमानता झुगारून देण्याचे आव्हान केले. Dayof the girl या हॅशटॅगच्या माध्यमातून याविषयीचे उपक्रम आणि बातम्या सोशल मीडियावर फिरू लागल्या आणि त्याद्वारे जनजागृती करण्यात येऊ लागली. जगाची अर्धी लोकसंख्या असलेल्या बालिकांचे मागासलेपण, त्यांचे आरोग्याचे प्रश्न, त्यांचे शैक्षणिक मागासलेपण हे जागतिक विकासाच्या आड येते आहे. हे गरीबीचे आणि मागासलेपणाचेही प्रमुख कारण आहे. जागतिक विकासात महिलांचा सहभाग आणि लैंगिक समानता हिंसेच्या घटना आणि गुन्हेगारी कमी करण्यास नक्कीच सहाय्यभुत ठरतील, या निर्णयावर संयुक्त राष्ट्रसंघ आले आहे. 21 व्या शतकात तरी बालिकांना त्यांचे मानवी हक्क मिळावेत, त्यांचे अनारोग्य दूर व्हावे, निर्णयप्रक्रीयेत त्यांचा सहभाग असावा, यादृष्टीने जागतिक मुलगी दिवसाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने दरवर्षी एक थिम राबवली जाते, आतापर्यंत बालविवाह बंदी, बालिका शिक्षणपद्धती सुधारणा, किशोरवयीन मुलींचा उत्कर्ष आणि हिंसेचे चक्र संपविणे, किशोरवयीन बालिकांची शक्ती : व्हिजन 2020 आणि गर्ल प्रोग्रेस :गोल प्रोग्रेस अशा विविध थिम राबविण्यात येत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जागतिक मुलगी दिवसाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे हे विविध उपक्रम हा बालिकांच्या सर्वांगिण विकासाचा केवळ एक भाग आहेत. बालिकांच्या समस्या या हिमनगासारख्या आहेत. जगासमोर आले आहे ते केवळ त्याचे एक टोक. जगभर चालणारे हे सगळे प्रयोग ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. खरोखर बालिकांना त्यांचे मुलभूत हक्क मिळायचे असतील, तर लैंगिक असमानतेच्या मनोवृत्तीवरच प्रहार केला पाहिजे. मनामनांमध्ये ठासून भरलेली महिलां आणि बालिकांविषयीची दुय्यम भावना ज्या दिवशी गळून पडेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता समाजात रुजेल. तो दिवस लवकरच येईल, या आशेसह. | |||
Tuesday, 29 August 2017
सावध ऐका पुढल्या हाका !स्वाती हुद्दारलेख लिहिता लिहिताच डेरा सच्चाच्या रामरहीमच्या खटल्याचा निकाल लागला बलात्काराच्या खटल्यात त्यांना दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. बड्या नेत्यांपासून अनेक प्रतिष्ठित मंडळींना खिशात ठेवून साम्राज्य प्रस्थापित केलेल्या एका व्यक्तीविरुद्ध दोन दुबळ्या महिलांनी दिलेल्या लढ्याला यशाची फळे आलीत. पुन्हा एकदा स्त्रीच्या ताकदीचा परिचय जगाला झाला आहे. तथाकथित बाबाला दोषी ठरविल्यानंतर तीन राज्यांमध्ये हिंसाचार उसळला आणि आमच्या सुसंस्कृततेवर प्रश्नचिन्ह उमटले. सोशल मीडियावर अनेक बोलक्या प्रतिक्रिया आल्यात. त्यातली एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रतिक्रिया when a rape accused is not arrested, we in India, burn candles and marchWhen a rape accused is arrested in India, we burn the city.जिन्हे नाझ है हिंदपर वो कहॉं है!गेल्या महिन्यात महिलांसंबंधीच्या तीन निरनिराळ्या घटना निरनिराळ्यासंदर्भात आणि निरनिराळ्या देशात घडल्या. आणि त्याचे पडसाद जगभर उमटले. अलीकडे ग्लोबलायझेशनमुळे जग खूप जवळ आले आहे. परिणामी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घडलेली घटना सगळीकडे पोहोचते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावर बरे-वाईट चर्वितचर्वणही होते. एक घटना कानावर आली ती सौदी अरबमधली. तिथल्या खुलुद या मॉडेलने शॉर्ट स्कर्ट, ब्लॅक क्रॉप टॉप आणि स्नीकर्स परिधान केलेला स्वत:चा फोटो स्नॅपचॅटवर अपलोड केला. सौदीच्या उत्तरेला नाजद या वाळवंटी प्रदेशात असलेल्या उशैगर येथील ऐतिहासिक किल्ल्यात चित्रीत केलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि ट्विटरच्या माध्यमातून खुलुदवर टीकेची झोड उठली. जी व्यक्ती देशातील नियमांचे पालन करीत नाही, त्या व्यक्तीला या देशात राहण्याचा अधिकार नाही. असे ट्विट एकाने केले. दुसरा लिहितो, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रचार करणारे तिचे वर्तन अराजक पसरविणारे आहे. तिला शासन झालेच पाहिजे. ट्विटरवर 41 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स असलेला सौदी लेखक अब्राहिम अल मुनाइफ लिहितो कायदा मोडण्याची परवानगी देणारे वर्तन देशात अराजक माजविण्यास पुरेसे आहे. काही प्रतिक्रिया मात्र खुलुदच्या बाजूच्या आहेत. एक जण लिहितो, अबायाशिवाय हिंडणाऱ्या स्त्री समस्येशिवाय दुसऱ्या कुठल्याही समस्या जगात उरल्या नाहीत का? तुम्ही त्या छायाचित्रांकडे बघू नका, असेही एका व्यक्तीने सुचविले आहे. दुसरी एक प्रतिक्रिया अशी, तिने कुणालाही स्नॅपचॅटवर फॉलो करण्याकरिता आग्रह केलेला नाही. तिचा अकाउंट केवळ महिलांसाठी आहे, मग तिच्या अटकेची मागणी कशासाठी? सोशल मीडिया बऱ्यापैकी लोकप्रिय असलेल्या सौदीमध्ये या व्हिडिओची शासनाकडून लगेच दखल घेतली गेली आणि उशैगरच्या प्रशासनाने आणि पोलिसांनी लगेच त्या महिलेविरोधात कारवाई केली. इस्लामविरोधी वर्तन केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत तिला अटक करण्यात आली. खुलुदला तिच्या कृतीचे जे शासन मिळायचे ते मिळेल, ते कठोरही असेल कारण पुन्हा कुठल्याही सौदी स्त्रीने अशी हिंमत करता कामा नये. हा संदेश त्या शिक्षेतून दिला जाईल. प्रश्न हा उरतो की सौदीमध्ये वाढलेल्या खुलुदला तिच्या या कृतीचे परिणाम माहिती नव्हते का? आणि माहिती असतानाही तिने हे बंड जाणीवपूर्वक केले का? अजूनतरी तिची यावरची प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. कदाचित पोलिस आणि प्रशासन तिचा आवाज दडपण्यात यशस्वी झाले असेल. मात्र, खुलुदने ही कृती जाणीवपूर्वक केली असेल, तर ही घटना नक्कीच क्रांतिकारक आहे, आणि नव्या पहाटेचा संकेत देणारी आहे. कारण अदाया, बुरखा किंवा हिजाबच्या आत घुसमटणाऱ्या श्वासाला आता मोकळे व्हायचे आहे, याचे हे निदर्शक आहे. दुसरी घटना किर्गीझिस्तान या छोट्याशा देशातली. जिथली 75 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. चक्क या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने आपल्या बाळाला स्तनपान करीत असतानाचे फोटो स्वत:च इन्स्ट्राग्रामवर टाकले आहेत. अपेक्षेप्रमाणे या फोटोंवरूनही बरेच वादळ उठले. राष्ट्राध्यक्ष अतलेवो यांची 20 वर्षांची विवाहित मुलगी आलिया हे करू धजते आणि आपल्या कृतीचे समर्थनही करते. आलियाने तिचे गर्भारपणाचे फोटोही इन्स्ट्राग्रामवर शेअर केले, कर्मठ व्यक्तींच्या त्यावर आलेल्या प्रतिक्रियांना उत्तर देताना आलिया म्हणते, सुसंस्कृततेच्या संकल्पना या व्यक्ती आणि कालसापेक्ष असतात. त्या कालपरत्वे बदलल्या पाहिजेत. स्तनपानाच्या छायाचित्रावर टीका करणाऱ्यांना आलियाने दिलेले उत्तर तथाकथित सुसंस्कृततेचा बुरखा फाडणारे आहे. समाज स्त्री स्तनांचा खरा उद्देशच विसरला आहे, केवळ पुरुषांच्या विकृत नजरांना सुखावणारा एक अवयव ही संकल्पना समाजात रूढ झाली आहे. स्त्रीच्या स्तनांकडे केवळ विकृत नजरेने पाहणाऱ्यांना स्तनपान ही पवित्र गोष्ट आहे, हे सांगण्यासाठी हा फोटो शेअर केला आहे. 20 वर्षांच्या वयात रूढ संकल्पनांविरुद्ध उभे ठाकण्याचे धैर्य आणि समाजाच्या तथाकथित सुसंस्कृत ठेकेदारांना तिने दिलेले उत्तर हे आशादायी चित्र आहे. स्त्रीच्या शरीरा पलीकडे जात एक माणूस म्हणून तिच्याकडे समाजाने पाहावे, ही अपेक्षा व्यक्त करताना आलिया म्हणते, जेंडर इक्वॅलिटीकडे टाकलेले हे एक पाऊल आहे. तिसरी घटना हरियानातील. मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना नेहमीच्याच. नकोशा नजरा, नकोसे स्पर्श सततचेच. एकटीदुकटी महिला दिसली की तिचा पाठलाग करणे, तिच्यावर घाणेरड्या कमेंट करणे हे रोजचेच. हरियानातील आयएएस अधिकाऱ्याची मुलगी वर्णिका रात्री घरी जात असताना एका नेत्याच्या मुलाने तिचा पाठलाग केला, ही घटना वेगळी नाही, मात्र त्यानंतर वर्णिकाने त्याच्याविरुद्ध केलेली तक्रार आणि न्यायासाठी लढलेली लढाई मात्र दाद द्यावी अशीच आहे. विशेषत: माझी काहीही चूक नसताना मी कशासाठी अपराधी वाटून घ्यावे आणि माझे नाव का गुप्त ठेवावे, हा वर्णिकाचा सवाल बदलत्या स्त्रीभानाचे द्योतक आहे. तिन्ही घटना निरनिराळ्या भौगोलिक क्षेत्रातील आहेत, मात्र यामध्ये समान साखळी आहे, आत्मभान जागृत झाल्याची. स्वत्व गवसल्याची. स्त्रीने कचकड्याची बाहुली बनणे नाकारले आहे. अन्यायाच्या, अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही, मात्र त्याविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची ताकद जगभरातल्या स्त्रीने मिळवली आहे. हे ही नसे थोडके! | |||
Wednesday, 26 July 2017
दिव्यत्वाची जेथ प्रचिती...स्वाती हुद्दारहिमालयाच्या पूर्वोत्तर रांगा, ब्रह्मपुत्रेचे विस्तीर्ण पात्र, खनीज संपत्तीने परिपूर्ण जंगल आणि सुंदर रिमझिमता पाऊस यामध्ये वसलेली सात राज्ये, उर्वरीत भारतापासून भावनिकदृष्ट्या काहीशी तुटलेली. आपली संस्कृती, आपल्या प्रथा-परंपरा जपणारी. प्रगती, भौतिक सुधारणांपासून दूरस्थ असे इथले जनजीवन. परिणामी उद्भवणाऱ्या अनेक समस्या आणि त्या समस्यांवर मात करण्यासाठी, इथल्या रहिवासींच्या उत्थानासाठी झटणारी मुठभर वेडी माणसं. त्यातीलच एक आकाशासारखं उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे गांधी विचारांनी प्रेरीत होऊन आसाममध्ये समाजसेवा करणाऱ्या डॉ. अल्का सरमा.साल 1983. चळवळीच्या कार्याच्या निमित्ताने नागालॅंडमध्ये प्रवास करीत असलेल्या अल्का सरमांना तिथल्या रहिवासींनी विचारले, क्या आप इंडियासे आयी है? या प्रश्नाने अल्काजींना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले, पण कार्याची दिशाही गवसली. त्यांनी शांतपणे उत्तर दिले की मै महात्मा गांधी के देश से आयी हूँ. अल्काजींच्या या उत्तराने तिथल्या रहिवाशांमधले आणि अल्काजींमधले अंतर संपले आणि कार्याची दिशाही स्पष्ट झाली. 1956 साली मुंबईत गांधीवादी घरात जन्मलेल्या अल्का सरमांचे शालेय ते आचार्यपदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच झाले. महाविद्यालयीन जीवनात त्या जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीकडे आकृष्ट झाल्या आणि छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या कार्याशी जुळल्या. 1978-79 साली जेपी चळवळीच्या निमित्ताने बिहारमध्ये गेल्या असताना एका सभेत पुरुष खुर्च्यांवर आणि महिला जमिनीवर बसलेल्या आढळल्या. स्त्री-पुरुष समानतेच्या वातावरणात वाढलेल्या अल्काजींच्या मनावर ही घटना कोरली गेली आणि स्त्रीमुक्तीच्या कार्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. नागेन सर्मा यांच्याशी विवाहानंतर अल्काजी आसाममध्ये आल्या. आणि हेच त्यांचे कार्यक्षेत्र झाले. आसाम गण परीषदेचे नेते असलेले नागेन सर्मा वन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नलबारी या त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात उल्फाच्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. त्यावेळी नागेन आणि अल्का यांची मुलगी पारोमिता अवघी दहा वर्षांची होती. सकाळी टाटा करून घरून निघालेल्या वडिलांचे शव रात्री घरी आले, तेव्हा आपले दु:ख बाजुला ठेऊन लेकीला काय समजवायचे, हा अल्काजींसमोर प्रश्न होता. पतीला एकदाच मृत्यू येतो, त्याच्या पत्नीला मात्र त्यानंतर वारंवार मरावे लागते. असे जिणे अल्काजींनी नाकारले आणि राजकीय क्षेत्र न आवडणाऱ्या अल्काजी पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नलबारी विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. आणि 2000 तसेच 2006 मध्ये त्या निवडूनही आल्या. 2006-2011 या कार्यकाळासाठी त्यांना उत्कृष्ट आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1979 सालापासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या अल्काजींनी 2013 मध्ये अक्षर फाऊंडेशनची स्थापना केली. त्या माध्यमातून आदिवासी मुले आणि महिलांना सुशिक्षित करण्याचे कार्य त्या अविरत करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाने गुवहाटीमधील शिक्षणाचा आलेख उंचावतो आहे. पतीच्या हत्येनंतर नागेन सर्मा मेमोरियल सोसायटीची स्थापन करून त्या माध्यमातून रोजगार, आरोग्य आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. महिलांचे गुण जेव्हा सार्वत्रिक होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजोत्थान होईल, असा विश्वास असलेल्या अल्काजींनी आसाम महिला समता सोसायटीची स्थापना केली. गांधी विचारधाराच आजच्या काळातही समाजोद्धाराचे माध्यम आहे, यावर अतुट विश्वास असलेल्या अल्काजी सर्वोदयी विचार, नई तालिम या माध्यमातून गांधी आचार-विचारांचा प्रचार-प्रसार करीत आहेत. द्वेष व्यक्तीचा नव्हे, त्याच्या दोषांचा करा, हे गांधीजींचे विचार अंमलात आणत गांधीयन थॉटस फॉर पीसच्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांसाठीही त्या कार्यरत आहेत. पूर्वोत्तर राज्यांच्या समस्या उर्वरीत भारतापेक्षा वेगळ्या आहेत, या सात राज्यांची 98 टक्के सीमा आंतरराष्ट्रीय आहे. इथली संस्कृती वेगळी आहे, वेष वेगळा आहे, भाषा वेगळी आहे. त्यामुळे इथला रहिवासी एकटा पडला आहे. त्याच्या मनात त्याच्या अस्तित्वाविषयीच प्रश्नचिन्ह आहे. पूर्वोत्तर राज्यांना मुख्य धारेत आणण्यासाठी माणसाचा माणसाशी संवाद गरजेचा आहे. अनेकदा दहशतवादी तयार होण्यासाठी सैन्याचे धोरणही कारणीभुत ठरते. कायदे आणि हिंसा हे इथल्या समस्यांचे उत्तर नाही. असे डॉ. अल्का सर्मा यांचे स्पष्ट मत आहे. आम्ही तर पोटासाठी पशुंची हत्या करतो, तुम्ही तर हुंड्यासाठी घरच्या स्त्रीची हत्या करता, असे जेव्हा आसामची एखादी व्यक्ती सुनावते, तेव्हा आपल्या सुसंस्कृततेवर ते मोठे प्रश्नचिन्ह आहे, असे अल्काजी म्हणतात. पतीच्या निर्घृण हत्येनंतरही खचून न जाता मला मरून चालणार नाही, जगलेच पाहिजे, असे म्हणत हिंमतीने त्यांचे कार्य पुढे नेणाऱ्या अल्का सर्मांच्या अलौकिक कार्याला सलाम! | |||
Monday, 17 July 2017
सकाळ @ फुटाळा चौपाटीवेळ सकाळी 6स्वाती हुद्दारनागपूर, ता. 8तरुणाईचे डेस्टिनेशन असलेली आणि रात्री 12 पर्यंत जाग असलेली फुटाळा चौपाटी सकाळी पुन्हा सहा वाजताच जागी झाली होती. संध्याकाळपासून तरुणांच्या उत्साही गर्दीने ओसंडणाऱ्या या रस्त्यावर सकाळी सहा वाजता मात्र मध्यमवयीन गर्दी दिसत होती. चौपाटीच्या फुटपाथलगत अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहने रांगेत पार्क केली होती. मोकळ्या रस्त्यावर ट्रॅक सुट आणि स्पोर्टस शुज परिधान केलेले पुरुष आणि महिला तलावावरून येणारे थंड प्रसन्न वारे अंगावर घेत मॉर्निंग वॉक करीत होते. एकत्र मॉर्निग वॉक करणाऱ्या मित्रांचा समुह हास्यविनोद करीत चालला होता. तर एकटे फिरणारे काही जण कानात इअर फोन लाऊन संगीताचा आनंद घेत होते. काही मध्यमवयीन जोडपीही संसाराच्या सुखदु:खाची चर्चा करीत फिरत होती. काही विशी-बावीशीचे तरुण जॉगिंग करीत होते. इतक्यात डोक्यावर हेल्मेट लावलेला तरुण-तरुणींचा घोळका मोकळया रस्त्यावर रेसिंग सायकल दामटत पुढे निघाला. तलावाच्या विरुद्ध दिशेला असलेले हॉटेल्स, फास्टफुड-जंकफुडचे ठेले, आईस्क्रीम पार्लरस अजून बंद होते. रात्री उशीरापर्यंत ग्राहकांना सेवा दिल्याच्या खुणा हॉटेल्स आणि ठेल्यांच्या आजूबाजूला विखुरल्या होत्या. रस्त्यालगतच्या कचराकुंड्या भरून वाहात होत्या. माणसांनी रात्री पोट भरल्यावर अर्धवट खाऊन टाकलेल्या खाद्पदार्थांवर सकाळी उपाशी कुत्री ताव मारत होती. चहाचे एक-दोन ठेले मात्र ग्राहकांच्या सेवेत पुन्हा रुजू होण्याच्या तयारीत होते. चहावाल्याने जोर लावत स्टोव्हला पंप मारला आणि चहाचे आधण ठेवलेला स्टोव्ह धगधगु लागला. पाण्याला उकळी आली तशी चहावाल्याने स्वच्छ धुतलेल्या ठेल्यावर ओळीने रचून ठेवलेल्या डब्यातील चहा-साखर त्यामध्ये घातली. आणि विशिष्ट रिदम निर्माण करीत तो खलबत्त्यात आले आणि विलायची कुटू लागला. दुसऱ्या स्टोव्हवर मोठ्ठे पातेले ठेऊन त्याने त्यामध्ये झोकात दुधाचे पुडे रिकामे केले. कुटलेले आले आणि विलायची चहामध्ये टाकताच चहाचा सुगंध दरवळला. मोठ्ठ्या पळीने तो चहा जसजसा ढवळू लागला तशी मॉर्निंग वॉक करणारी गर्दी ठेल्याभोवती गोळा होऊ लागली. रोजच्या गिऱ्हाईकांशी चहा गाळता-गाळता त्याच्या गप्पाही रंगल्या. ऍल्युमिनीयमच्या स्वच्छ केटलीतून त्याने चहा पेल्यांमध्ये ओतला आणि पायी फिरून दमलेली चहाची दर्दी गर्दी घाम पुसत त्या अमृततुल्य चहाचा आस्वाद घेऊ लागली. चहाच्या ठेल्याजवळून तलावाचा नजारा रमणीय दिसत होता. उगवत्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात तलावातले पाणी चमकत होते. आपल्या पिलांसह बदके जलविहार करीत होती. हिरव्या लुसलुशीत पानांवर उमललेली पांढरी कमळे तलावाचे सौंदर्य वाढवित होती. काठावरच्या दगडी भिंतीवर काही मासेमार पाण्यामध्ये गळ टाकून बसले होते. काठाच्या आजुबाजुला मात्र प्रचंड घाणीचे साम्राज्य होते. काठालगत पाण्यात कचरा साचला होता. पाण्याला दुर्गंधी येत होती. काठावर दारूच्या बाटल्या पडल्या होत्या. एक मनपा कामगार हातात लांब झाडू घेऊन परीसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत होता. हजारो हातांनी केलेली घाण दोन हातांनी स्वच्छ करणे केवळ अशक्य आहे. जबाबदार आणि सुजाण नागरिकांना कधीतरी याचे भान येऊन सार्वजनिक ठिकाणची अस्वच्छता नाहीशी होईल, या आशेसह. | |||
मन्वंतर काळाचे चित्रण करणारी वंशवृक्ष
स्वाती हुद्दार
सनातन धार्मिक परंपरा आणि मन्वंतर काळातील बदलती जीवनमूल्य यांच्या मंथनात घुसळल्या गेलेल्या मानवी भावभावनांच्या संघर्षाचे अत्यंत तरल चित्रण वंशवृक्ष या डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या कादंबरीत दिसते. या कादंबरीचे नायक श्रीनिवास श्रौती वेदविद्यापारंगत तर आहेतच, त्याशिवाय जीवनमुल्यांवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. सुखदु:खे समेकृत्वा हा भगवद्गीतेतील उपदेश त्यांनी अंगी बाणवला आहे. पूर्वजांच्या अमाप संपत्तीचा उपभोग आवश्यकतेपुरता घेऊन समाजातील गरजुंनाही त्या संपत्तीचा लाभ देण्याचा ते प्रयत्न करतात. व्रतस्थ जीवन अंगिकारलेल्या श्रौतींनी एकुलत्या एका मुलाच्या अकाली निधनाचे दु:खही त्यांना साजेशा धीरोदात्तपणे सहन केले आहे. मुलगा कर्ता झाल्यानंतर निवृत्तीकडे झुकलेले त्यांचे मन मुलाच्या मृत्युनंतर परत कर्तव्य भावनेने त्यांनी संसाराकडे वळविले.परंपरा, पुवर्जांचे ऋण, श्राद्धकर्म, वेदाध्ययन यांचे स्वत: कठोरपणे पालन करणारे श्रौती मुलाच्या मृत्युनंतर सुनेच्या केशवपनासाठी आग्रह धरीत नाहीत. एवढेच नव्हे तर तिच्या पुढच्या शिक्षणाला मान्यता देतात.
कात्यायनी पुनर्विवाहाचा निर्णय त्यांच्यापुढे जाहीर करते, तेव्हा वंश, त्यागावर आधारलेला सनातन धर्म आणि स्वत्व, स्वकेंद्रीत व्यक्तिनिष्ठ बदलती जीवनमुल्य यांचा सुप्त संघर्ष यातील भेद ते तिच्यापुढे उलगडतात. कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता श्रौती त्यांच्या सुनेला मन, भावना, शरीर यापलिकडे पाहणाऱ्या मुल्यांचा उपदेश करतात आणि निर्णय तिच्यावर सोपवतात. आणि तिचा निर्णय अत्यंत संयतपणे स्वीकारतात. सगळ्या आशा आपल्या नातवावर केंद्रीत करून पुन्हा मार्गक्रमण करीत राहतात.
भावना आणि शरीराच्या हाकेला ओ देऊन पुनर्विवाह करणारी कात्यायनी मात्र तो भर ओसरल्यावर परंपरा आणि व्यक्तिस्वातंत्र्य या द्वंद्वात भरडली जाते. पापपुण्य संकल्पनांच्या मानसिक द्वंद्वात अडकलेल्या कात्यायनीचा अत्यंत करुण शेवट होतो.
मन्वंतर काळातील पिढीचे कात्यायनी प्रतिनिधित्व करते. प्राप्त परिस्थिती आहे तशी स्वीकारणारी नागलक्ष्मी कर्तव्यनिष्ठेने जीवनाला सामोरी जाते. संशोधन हेच आपले जीवितकार्य मानणारे सदाशिवराव कर्तव्य, भावना यांच्या पलिकडे आहेत. जीवनावर भरभरून प्रेम करणारा राज आधुनिक पिढीचे प्रतिनिधित्व करतो. संशोधन कार्याच्या निमित्ताने सदाशिवरावांशी विवाहबद्ध झालेली आणि स्वत:च्या हक्कांविषयी अत्यंत काटेकोर असलेली करुणारत्ने नागलक्ष्मीवर आणि तिच्या मुलावर मात्र सहज अन्न्याय करते.
आयुष्यभर जोपासलेली परंपरा, वंशाभिमान याचा पायाच पोकळ असल्याचे सत्य आकळल्यानंतर आतल्याआत दुभंगलेले, कोलमडलेले श्रीनिवास श्रौती त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाला साजेशा पद्धतीने त्यातून सावरतात आणि एकुलत्याएक नातवाच्या संमतीने वडिलोपार्जित संपत्तीचा त्याग करून संन्यास स्वीकारतात. दोन पिढ्यांमधील बदलत्या जीवनमुल्यांची मुक साक्षीदार म्हणजे श्रौतींच्या घरची मोलकरीण लक्ष्मी.
मुलावर अधिकार कुणाचा, जन्मदात्या आईचा की त्याच्या वंशाचा, हा महाभारतकालिन सनातन संघर्ष बदलत्या काळाच्या पार्श्वभुमीवर एका कुटुंबकथेच्या निमित्ताने डॉ. भैरपांनी अत्यंत संयतपणे चितारला आहे. विधवा विवाह, आई-मुलाचे नाते, त्याला असलेला कायद्याचा आधार, एक पत्नी असतानाही केलेला दुसरा विवाह आणि परंपरेचा पगडा असलेल्या स्त्रीने पतीच्या दुसऱ्या विवाहाला दिलेली मुक संमती असे अनेक पैलू या कथेत येतात. इंग्रजी भाषा, साहित्य, पुरोगामित्व त्यानिमित्ताने भारतीय जीवन व्यवस्थेतही रुजत जाणारी पाश्चात्य मुल्य, त्यांचा स्वीकार, अस्वीकार याचा उहापोह या कादंबरीत येतो. डॉ. भैरप्पांच्या सिद्धहस्त लेखणीचे प्रत्यंतर, त्यांचा भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास, त्यावरील निष्ठा याचे दर्शन ठायी ठायी घडते.
पाश्चात्य साहित्य, विचारधारा, जीवनमूल्य, यांचा प्रभाव असणारी पण जुन्या परंपरा, धर्मनिष्ठा यांचेही जोखड झुगारून देण्याची हिंमत नसणारी संक्रमण काळातील पिढीचे नेतृत्व करणारी कात्यायनी हरली की धर्मनिष्ठा, परंपरा, वंशवृद्धी आणि त्यागमय जीवनाचा पुरस्कार करणारे श्रीनिवास श्रौती हरले, याचा निर्णय वाचकांनी घ्यावा.
डॉ. भैरपांच्या कादंबरीच्या कथावस्तुला कुठेही धक्का न लावणारा अत्यंत सरस अनुवाद उमा कुळकर्णी यांनी केला आहे.
Monday, 3 July 2017
सकाळचे नागपूर@रेल्वेस्थानकप्लॅटफॉर्म क्रमांक 8, वेळ पहाटे 4.30स्वाती हुद्दारएरवी चालणेही कठीण जावे, इतका गजबजलेला संत्रा मार्केटचा रस्ता, चुकार वाहन आणि एखाद-दुसरा पादचारी वगळता शांत होता. रेल्वे स्थानकाबाहेर ऑटोंची रांग आणि गाडी यायला वेळ असल्यामुळे ऑटोच्या मागच्या सीटवर पेंगुळलेले ऑटो चालक. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर उजव्या हाताला पार्किंग. तिथल्या पोऱ्यानी दोन खुर्च्या एकमेकांना जोडून त्यावरच ताणून दिलेली. गाडीचा आवाज ऐकून तारवटलेल्या डोळ्यांनीच गाडी यहा नही वहा लगाओ, ऐसी काटो, आगे लो पिछे लो, त्याच्या आदेशवजा सुचना. पार्किगच्या बाजुला वळकट्या डोक्याशी घेऊन निजलेले भिकारी. त्यांच्यातून वाट काढत प्लॅटफॉर्म गाठण्याची कसरत. आत शिरल्याबरोबर विशिष्ट कुबट वास नाकात शिरला. तिथले रेल्वेचे मोठ्ठे पांढरे घड्याळ 4.35 ची वेळ दाखवत होते. रेल्वेच्या बाकड्यांवर काही प्रवासी सामानसह दाटीवाटीने बसले होते. सामान आणि दोन छोट्या मुलांसह एक जोडपे घाईघाईने आत आले. छोट्या बाळाला आईने कडेवर घेतले होते. दुसऱ्या हाताने बॅग खेचताना तिची तारांबळ उडत होती. वडीलांच्या हाताला धरून अर्धवट झोपेत असलेला थोरला कसाबसा चालत होता.झोपाळलेल्या डोळ्यांनी चहाच्या बुथचा पोऱ्या दुकानाचे शटर उघडत होता. शटर उघडून त्याने माझा, कोला, सोयामिल्कचे क्रेट बाहेर काढून दुकानातली गर्दी कमी केली. दुकानातले दिवे उजळले. चहाचे मशीन सुरू केले. बाजुचे बुक काऊंटर मात्र बंद होते. दुकानाच्या शटरसमोर एका फळीवर मळकट चादर टाकून दुकानातला पोऱ्या झोपला होता. इंडिकेटरवर गाडीची वेळ आणि डब्यांची पोझिशन दिसू लागली. जोडीला यात्रीगण कृपया ध्यान दे अशी अनाऊंसमेंट सुरू झाली. थोडे आधी पोहोचलेले आणि बाकड्यांवर स्थिरावलेले प्रवासी सावध झाले. काही प्रवासी धावतपळत प्रवेश करत होते. दूरून गाडीचे दिवे दिसू लागताच प्लॅटफॉर्मला गती आली. हळूच गाडीने प्रवेश केला आणि वातावरण सजीव झाले. आत शिरणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची एकच हुल्लड माजली. गाडीतून बाहेर पडलेले प्रवासी झोपाळलेल्या डोळ्यांनी आपले सामान तपासू लागले. त्यातच चाय गरम चाय च्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. थंडे पानी की बोतल म्हणणारे पोरे इकडेतिकडे धावू लागले. त्यांच्याकडून पाणी बोतल किंवा चहा घेऊन गाडी सुटण्याच्या आत त्यांच्याशी पैशाची देवाण घेवाण करण्याची कसरत प्रवासी करीत होते. जनरल डब्यातील मंडळी प्लॅटफॉर्मच्याच नळावरून घाईघाईने पाणी भरत होती. तेवढ्यात गाडी सुटण्याची शिटी झाली आणि एकच पळापळ करीत मंडळी गाडीत शिरली. कुणी धावत गाडी गाठली. सोडायला आलेले निरोपाचे हात हलले आणि गाडीने वेग घेतला. प्लॅटफॉर्म परत ओस, शांत. हळूहळू पुढच्या गाडीचे प्रवासी प्लॅटफॉर्मवर येऊ लागले. पुन्हा तिथले बेंच माणसांनी भरले. एक आंधळा भिकारी एकतारीवर सूर छेडत भजन गात होता. कुणीतरी त्याच्या दिशेने नाणे फेकले. नाण्याच्या आवाजाने त्याने गाणे थांबवले आणि तो आंधळा भिकारी नाण्यासाठी जमिन चाचपडू लागला. त्याची ती तगमग बघून बेंचवरचे प्रवासी कुत्सित हसू लागले. सकाळचे साडे पाच वाजले होते. बाहेर हळूहळू उजाडू लागले होते. त्या भिकाऱ्याच्या डोळ्यातला आणि त्याच्यावर हसणाऱ्यांच्या मनातला अंधार मात्र तसाच कायम होता. | |||
Monday, 5 June 2017
साठा-उत्तराची कहाणी...स्वाती हुद्दारआज परत कोलाहल, गप्पा, गजबज, बिल्वरांची किणकिण, उदधुपाचा सुगंध, वाती-फुलवातींचा सोज्वळ उष्ण प्रकाश, दह्यादुधाचा शिडकावा आणि कच्च्या सुताचे पक्के फेरे, जुन्यावर नवे, परत नवे, परत नवे, आवर्त युगायुगांचे. मी इथेच, या बांधावर उभा. आशा, अपेक्षांच्या धाग्यात बंदिस्त, कधीचा. पिढ्या बदलल्या, ऋतू बदलले, पारंब्या रुजल्या, नवे जीवन उमलले, फुलले, बहरले, पुन्हा रुजले. इथेच माझ्या साक्षीनं. माझ्या हिरव्याकंच डेरेदार सावलीत ती पतीचे मस्तक मांडीवर घेतलेली. यमाला वादविवादात जिंकून पतीच्या प्राणांचे वरदान प्राप्त करणारी महाभारतातल्या वनपर्वातील सत्यवानाची सावित्री. अखंड सौभाग्याचे वरदान घेऊन सत्यवानासह जेव्हा ती माझ्या छायेत विसावली, तेव्हा माझ्यासह सगळा भवताल मंगलगीत गायला होता आणि तेव्हापासून युगानुयुगे मी गावाच्या वेशीवर आईबहिणींच्या सौभाग्याचे रक्षण करीत उभा. वादळवारा, ऊनपाऊस झेलत. ऊनपावसाच्या समेवर माझा एक दिवस. गावातून वाहणारे उष्ण वारे आणि पावसाचा सांगावा घेऊन वेशीवर दाटून आलेले काळे ढग. अशावेळी हातभर बांगड्या, कपाळी रुपयाएवढे कुंकू ल्यायलेल्या, मेंदीने सजलेल्या हातात पूजेची तबक घेतलेल्या त्या समूहाने येतात. काही चंचल डोळ्यात नवेपणाचा साज ल्यायलेल्या नवथर, तर काही अनुभवसंपन्न शहाणपण अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या. एरवी गावातल्या बुजरुगांच्या गप्पा आणि गुरांसाठी वळचण असलेला माझा पार या लाघवी लगबगीनं फुलून येतो. आणि फांद्याफांद्यांवर विसावलेली पाखरांची चिवचिवही मंजूळ कुजबुज जीवाचे कान करून ऐकू लागते. पारंब्यांना लय प्राप्त होते आणि घोळक्यातल्या लेकीबाळी त्यावर झुलू लागतात. पारावरची माती उकरून धान्यानं पेव भरली जाते. दह्यादुधाचे ओघळ दुथडी भरून वाहू लागतात. हळद-कुंकू, अबीर-गुलालाची रंगपंचमी रंगते. मोगऱ्याच्या फुलांनी आणि हारांनी पूजा बांधली जाते. फुलवाती तेवतात. आणि सुरू होतो आर्त स्वरातला आरतीचा गजर, जोडीला टाळ्यांनी बांधलेला ताल आणि आईच्या पदराला धरून वडाला आलेल्या पाच-सहा वर्षाच्या चिमुकल्या हातातील घंटाही किणकिणू लागते. कापूर आरती सुरू होते आणि सुवासिक धुराचे लोट वातावरण भारून टाकतात. त्यानंतर सुरू होते वृद्ध कापऱ्या आवाजातील सावित्री-सत्यवानाची साठा उत्तराची कहाणी. युगामागून युग लोटली, कहाणी सांगणारी आणि ऐकणारी पात्र बदलली. कहाणी आणि मी मात्र तोच. तरीही कहाणी नवी भासते आणि दरवर्षीप्रमाणे मी भान हरपून ती ऐकत राहतो. मग सुरू होतात सुताचे फेरे. किती अलगदपणे सुताच्या बंधनानं मी वचनबद्ध होतो. कच्च्या सुताचे फेरे यांच्या भावभक्तीनं कधी वज्राचे होतात, माझं मलाच कळत नाही. हात जोडले जातात. अहेवपणाचं मागणं मागितलं जातं. जन्मोजन्मीची साथ आणि पतीच्या दीर्घायुरारोग्याचा आशीर्वाद मागणाऱ्या या मातृशक्तीपुढे मीच नतमस्तक होतो. गहिवरतो. एकमेकींच्या कपाळी हळदीकुंकवाची बोटं उमटवली जातात. वाणं वाटली जातात. हळूहळू गर्दी पांगते. उरतात पणत्यांमधून तेवणाऱ्या आशेच्या ज्योती. अर्धवट जळत्या उदबत्त्या. पायांखाली येऊन मलूल झालेली फुलं, खोडावरून ओघळलेल्या दुधादह्याचा ओशट गंध, धान्याच्या राशी, काही नाणी आणि आंबे. परीघभर पसरलेल्या माझ्या खोडामागून अलगद फाटक्या कपड्यातलं 8-10 वर्षाचं दारिद्य्र प्रगटतं. हातापायाच्या काड्या आणि पोटाचा नगारा. केस पिंजारलेले. मळकट बाहीनं वाहतं नाक पुसणाऱ्या त्या दारिद्य्राची चोरटी नजर इकडेतिकडे भिरभिरते. आपल्या काळपट काटक्या हातांनी ते पारावरची चिल्लर गोळा करून फाटक्या झग्याच्या खिशात सारतं. कळकट पिशवीत इवल्या हातांनी धान्य भरण्याचा प्रयत्न करतं. आंबे गोळा करताना हाताला लागलेला गोड वासाचा रसरशीत आंबा मुखी काढून चोखू लागतं आणि त्याचे समाधानानं चकाकणारे डोळे ही वटसावित्रीची कहाणी सुफळ संपूर्ण झाल्याची ग्वाही देतात. | |||
Saturday, 20 May 2017
बहिणाबाईंच्या कवितालेक सरस्वतीचीघरोटंदेवा घरोटं, घरोटं तुझ्या मनातील गोटसर्व्या दुनियेचं पोट, घरी कर्माचा मरोट अरे जोडता तोडल त्याला नातं म्हनू नही ज्याच्यातून पीठ येतं, त्याले जातं म्हनू नही जशी तुझी रे घरोटा पाऊ फिरे गरगर तसं दुधावानी पीठ पडलं रे भुईवर दाने दळता दळता जशी घामानं मी भिजे तुझी घरोटा तशी पाऊ झिजे झिजे अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी तस तसं माझ गानं पोटातून येतं ओठी बहिणाबाईंच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या अनुभवांचं अधिष्ठान त्या कवितेला लाभलं आहे. त्यांचं जगणं सहजसोपं नव्हतं. परिस्थितीचे चटके खाऊन अनुभवाच्या भट्टीत तावून सुलाखून बहिणाबाईंची कविता समृद्ध झाली आहे. बहिणाबाई म्हणतात, कुटुंब सुखसमाधानानं जगायचं असेल तर कुणाला तरी जात्यात भरडल्या जावंच आगतं. म्हणजे कुणाच्यातरी प्राक्तनात भरडणं निश्चित आहे. लौकिकार्थानं माणूस एकटा असतो, परंतु तुमच्या ताटातल्या प्रत्येक घासामागे किती जणांचे कष्ट असतात, ते परमेश्वरच जाणे. जीवन जगताना अनेक मंडळी आपल्या आजुबाजुला वावरत असतात. प्रत्येकाशीच आपले सुर जुळतील, असं नाही. काही वेळा नात्यात मतभेद निर्माण झाले तर ते नातं संपून जातं. बहिणाबाई म्हणतात जे तुटतं त्याला नातं कसं म्हणायचं? इथे बहिणाबाईंची शब्दचमत्कृती बघा, त्या म्हणतात, ज्यातून पीठ येतं त्याला जातं म्हणू नये. जे येतं त्याला आपण जातं म्हणतो, या दुनीयेची ही उलटी रित आहे. म्हणतात ना दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. जसजशी जात्याची पाऊ फिरते, तसतसे दुधासारखे पांढरेशुभ्र पीठ भुईवर पडते. घरच्या अत्यंत गरिबीमुळे अश्वत्थाम्याची आई त्याला दूध म्हणून पांढऱ्या शुभ्र पीठात पाणी कालवून देत असे. दुधावानी पीठ ही संकल्पना मांडताना बहिणाबाईंना अश्वत्थामा आठवला असेल का? रहाटगाडगं चालण्याकरिता कुणाला तरी घाम गाळावाच लागतो. कुणाला तरी झिजावच लागतं. पांढरशुभ्र पीठ दळताना जसजशी जात्याची पाऊ झिजते तशीच बहिणाबाईही घामानं भिजते आहे. जात्यावर पीठ दळणं हे इथे कर्मयोग आणि तपश्चर्या या अर्थानं येतं. कर्मयोगाची महती सांगायला कृष्णाला भगवद्गीता लिहावी लागली आणि टिळकांना गीतारहस्य .बहिणाबाईचं जीवन ही एक तपश्चर्या आहे. तपश्चर्येनं समृद्ध झालेल्या बहिणाबाईच्या शब्दांना प्रतिभा स्वत: अमृताचं सिंचन करते. आणि त्यातून एक रसरशीत तत्वज्ञान आपल्यासारख्या रसिकांसमोर उभ ठाकतं. शब्दांना हे सामर्थ्य प्राप्त करण्याकरिता जीवनाच्या शाळेतील बाराखडीच गिरवावी लागते. स्वाती हुद्दार | |||
वेड्याचे घरऑफिसला जाताना त्या झाडाखाली रोज एक वेडा भेटतो. अगदी तिथेच. कधी हातवारे करतो, कधी येणाऱ्या-जाणाऱ्यांना शिव्या देतो. कधी नुसताच शुन्यात बघत बसतो. माझी खूप घाईची वेळ असते. जवळपास रोजच उशीर झालेला असतो. तरीही नजर हटकून त्याच्याकडे जातेच. ठरवूनही दूर्लक्ष करता येत नाही. इतर येणारे-जाणारे बघितले. त्यांच्या लेखी तो नसतोच. मी मात्र...45 डिग्री तापमान. त्या झाडाखाली तो. जीवाची काहिली करणाऱ्या उन्हात कसा राहात असेल? समोर उच्चभ्रू वस्ती. याच्या खाण्यापिण्याचं काय? मनात प्रश्नांचं काहूर. एखाद्या दिवशी दिसला नाही तर उगाच चुकल्यासारख वाटतं. त्या दिवशी नजरानजर झाली. अंगावर शहारा आला. काय होतं त्याच्या डोळ्यात? एक भकास, उद्विग्न् नजर! दिवसभर मन त्याच्याभोवती फिरत होतं. का वेडा झाला असेल हा? घर असेल का त्याला? घरी कोण कोण असेल? वेडाच्या भरात न सांगता निधुन आला असेल का? अजुनही त्याच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलं असेल का? की मुद्दामच घालवून दिलं असेल त्याला घराबाहेर? त्या अनोळखी , अपरिचित वेड्याच्या माहिती नसलेल्या घरापाशी माझं मन घुटमळत राहतं. स्वाती हुद्दार | |||
Friday, 19 May 2017
उजळलेली वाटखूप दूरवर आल्यावर तिच्या लक्षात आलं की आपण अनोख्या प्रदेशात आलो आहोत. पण कसं काय? वाट चुकली. भोवतालचा हिरवागार परिसर कधीच मागे पडला. आजुबाजुला आहे केवळ बोरीबाभळीचं काटेरी विराण बन. ते डेरेदार आम्रवृक्ष कुठे गेले? तिच्या डोळ्यात अपार कारुण्य दाटलं. घशाला कोरड पडली. हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकू लागला, म्हणजे काही क्षणातच अंधारून येणार! तिला तो आठवला. तो नेहमी म्हणायचा. नवख्या वाटेनं कधीही जाऊ नये. रस्ता चुकलीस तर... ती हसून म्हणायची, तू येशील ना, मला शोधत. तो डोंगरापलिकडचा सूर्य मला नेहमी खुणावतो, वाटतं एकदा तरी त्या उगवत्या आरक्त सूर्यबिंबाला गळामिठी मारावी. क्षितीजापार जाऊन तिथला प्रदेश न्याहाळावा. तो म्हणायचा. जाताना तुझ्या पाऊलखुणा तरी मागे ठेव, माग घेणं सोपं जाईल.आज तिनं धाडस केलंचं. पक्ष्यांच्या किलबिलाटानं तिला जाग आली. झुंजुमुंजु झालं होतं. पूर्व दिशा आरक्त झाली होती. तिचं लाडकं सूर्यबिंब डौलानं वर येत होतं. ती त्या दिशेनं निघाली. सुरुवातीचा चालीचा वेग मंदावला, पण ओढ कायम होती. भर माध्यान्हीला ती डोंगरमाथ्यावर आली. कुतुहलानं आजुबाजुला न्याहाळू लागली. सूर्यबिंब तर खूप दूर होतं. ती आणखी पूर्वेकडे निघाली. उतरंडीला लागली. खळकन पायाखालचा दग निसटला. तिचा तोल जाताजाता राहिला. पाय घसरला असता तर? तिला तो आठवला. तिच्या पावलात काटा जरी रुतला तरी वेदना त्याच्या चेहऱ्यावर उमटायची. तो हळवा व्हायचा. त्याच्या आठवणीनं तिच्या मुखावर मंद स्मित फुललं. आता मात्र ती प्रत्येक पाऊल सावकाश टाकू लागली. डोंगरापल्याडचा प्रदेश पाहण्याची उर्मी मात्र कायम होती. ती पुढे पुढे जात होती. एका निराळ्याच धुंदीत. पावलं थकली होती. मन मात्र मानत नव्हतं. माध्यान्हीचा सूर्य पश्चिमेला झुकला होता. तिच्यापासून खूप दूर गेला होता. तिनं आकाशात पाहिलं. तिच्या लक्षात आलं की ती हे अंतर कधीही पार करू शकणार नाही. कसली वेडी ओढ आपल्याला इतक्या दूर घेऊन आली? तिच्या टपोऱ्या डोळ्यात अश्रुंनी गर्दी केली. ज्याच्यासाठी ती उर फुटेस्तोवर धावली होती, तो सूर्य तर तिच्याकडे पाठ फिरवून निघाला होता. तिनं आजुबाजुला पाहिलं. समृद्धीच्या जिवंतपणाच्या कुठल्याही खुणा आसपास नव्हत्या. सगळीकडे रुक्ष प्रदेश हळूहळू अंधार दाटून आला. भेदरलेली ती अंग चोरून उभी होती. परतीची वाट दिसेनाशी झाली होती. तेवढ्यात एक चिरपरिचित सुगंध वातावरणात पसरला. तिनं नेणीवेनं जाणलं. की तिचा माग घेत तिचा कस्तुरीमृग येतो आहे. तो आला. तिच्या नयनात पश्चात्तापाचे अश्रु उभे राहिले. त्यानं काही न बोलता तिला मागे येण्याची खुण केली. आकाश चांदण्यांनी भरलं होतं. चंद्रप्रकाशात वाट उजळली होती. तचं मनही उजळलं होतं. त्याच्यावरच्या प्रेमानं, आदरानं. स्वाती हुद्दार | |||
संध्यारंगसंध्यारंगांनी आकाश आरक्त झालं होतं. एरवी निळसर भासणारं आकाश संध्यारंगरत किती सुंदर भासत होतं. कृष्णप्रेमात लाजून लाल झालेल्या राधेसारखं. सूर्य हळूहळू डोंगराआड दडत होता. काळोखानंतरच्या नव्या पहाटेचं आश्वासन देऊन. दूरवर पसरलेल्या डोंगररांगांवरची हिरवी सृश्टी सुद्धा अधकि गडद झाली होती. हरिभक्तीत तन्मय झाल्यासारखी. स्वत्व विसरून हरवल्यासारखी. शांत निश्चल ध्यानमग्न तो डोंगर. स्थितप्रज्ञ साधुसारखा अविचल. पक्ष्यांच्या किलबिलाटानं आसमंत भरून गेलेला. अंधारायच्या आत त्यांना आपापली घरटी गाठायची होती. घरट्यात त्यांची पिलं. त्यांच्या वाटेकडे आस लावून बसलेली. चोचीतले घास पिलांच्या मुखात भरवण्यासाठी त्या पक्षांचा जीव व्याकुळलेला. पाखरांनासुद्धा असतेच ना प्रेम आणि माया. डोंगराजवळून वाहणारी नदी संथपणे मार्गक्रमण करीत होती. प्रवाहाचा शांत, गंभीर नाद कानांना सुखावत होता. गवयाने संधिकालचा मारवा आळवावा तसा. नदीचा प्रवाह अविरत मार्गक्रमण करीत होता. पुढे काय आहे याचा विचार न करता, मागे कुणासाठीही न थांबता, कुठल्याही पाशात न अडकता, न गुरफटता पुढे पुढे जाणे हाच आपला धर्म आहे, एवढंच त्या नदीला माहित. एवढी कसली ओढ त्या नदीला लागली होती, की षडरिपुही तिला अडवू शकत नव्हते. केवळ एकच ध्यास. त्या निश्चित ध्येयाला पोहचण्याचा. परमतत्वात विलीन होण्याचा. नदीकाठच्या वाळूत कोणीतरी लुटुपुअुचे घर उभारले होते. धर बांधणारा मात्र तिथून निधुन गेला होता. ते घरही किती काळ उभे राहणार होते? कुणाच्या तरी धक्क्याने, साध्या वाऱ्याच्या झोताने सुद्धा त्याचे अस्तित्व संपणार होते. ते घर उभारणाऱ्याला हे माहिती असेल का? ते वाळूचे घर उभारणाऱ्या चिमुकल्या हातांनी काही क्षण का होईना, आपल्या स्वप्नांना तिथे वसवले असेलच ना? स्वप्नेच ती विरून जाणारच. पाण्यातल्या बुडबुड्यासारखी. हळूहळू काळोख गडद झाला. आकाश चांदण्यांनी भरून गेले. नक्षत्रांच्या प्रकाशात धरती न्हाऊन निघाली. त्या चांदण्या आपल्यातले तेज सृष्टीच्या चराचरात मिसळू लागल्या. फुलांना रंग दिले. गंध दिले. दूरस्थ नक्षत्रांवरही असेल का अशीच सृश्टी. त्यांनाही असतील का आपल्याच सारख्या भावभावना. या चांदण्या म्हणजे जणू चंद्ररुपी कृष्णाच्या सख्या. गोपिकाच जणू. कृष्णप्रेमात वेड्या झालेल्या आकाशात रंगली होती रासक्रीडा. कृष्णाच्या बासरीच्या स्वरांनी बेधुंद होऊन त्या रंगल्या होत्या रासक्रीडेत. सगळी सृष्टी धुंद होऊन तो भक्तीसोहळा अनुभवत होती. नि:शब्दपणे. दूरवर देवीच्या मंदीरात घंटानाद ऐकू येत होता. संध्याकाळच्या आरतीचे घनगंभीर स्वर कानावर येत होते. वातावरण भक्तीमय झालं होतं.क्लेशापासून सोडवी दु:खापासून सोडवी तोडी भवपाशा रात्र चढत होती. सृष्टीचा कण न कण पुलकित झाला होता. माझे मी पण ह त्यात सामावले गले. परमेश्वराचे अस्तित्व चराचरात भरून राहिल्याच्या खुणा सर्वत्र विखुरल्या होत्या. स्वाती हुद्दार | |||
Wednesday, 17 May 2017
चांदणझुलादूरवर समुद्राची गाज गुंजत होती. चांदण्यांच्या दुधेरी प्रकाशात चंदेरी वाळू चमकत होती. नि:शब्द किनाऱ्याला अलवार लाटा चाटून जात होत्या. रामेश्वरमचा समुद्र मुळातच शांत. आततायीपणा त्याच्या स्वभावातच नाही. मंदीरातील घंटांचा मधुर ध्वनी आणि मशिदीतील अजानचे स्वर साऱ्या वातावरणात भरून राहिले होते. एकमेकांमध्ये हरवलेले ते दोन जीव ओलसर वाळूत पावलं उमटवित चालत होते. तो पुढे, ती त्याची अनुगामिनी. त्याच्या उमटलेल्या रेखीव पावलांवर स्वत:चं पाऊल ठेवताना तिची नाजुक धावपळ होत होती. प्रत्येक हेलकाव्याबरोबर होणारी तिची नुपुरांची नाजुक किणकिण शांत वातावरणात एक लाडिक नाद उत्पन्न करीत होती.चालता चालता तो एक क्षण थांबला. तिच्याकडे वळून म्हणाला, बघ तुझ माझ्यावरचं प्रेम या चांदण्याच्या रुपात कसं आकाशभर पसरलं आहे. तिनं आकाशात पाहिलं. शुक्राची चांदणी तिच्याकडे पाहून खुदकन हसली. ती लाजून चूर झाली. तिच्या आरक्त गालावरच्या गोड खळीनं हसून दाद दिली. त्यांचं मुग्ध प्रेम बघून समुद्राला भरतं आलं. एक थंड लाट तिच्या आलत्यानं रंगलेल्या पावलांना हळूच स्पर्शून गेली. पायाखालच्या वाळूनं तिच्या तळव्यांना गुदगुल्या केल्या. त्यानं मागे वळून बघितलं. वाळूत उमटलेली त्यांची पावलं त्या लाटेबरोबर विरली होती. पण तो होता रांगडा गडी. त्यानं आपला कणखर हात तिच्यासमोर केला. तिनं काकणभरल्या हातानं तो घट्ट धरला. त्याच्या डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास होता आणि तिच्या डोळ्यात त्याच्यावरच्या विश्वासाचं चांदण. पुन्हा एकदा त्यानं ओल्या वाळूवर पाऊल रेखलं. तिनं त्याचं अनुकरण केलं. ओल्या वाळूत पावलं उमटत होती. त्यांना पक्क माहित होतं. पुन्हा एकदा लाट येईल, हे ठसे पुसले जातील. पण म्हणून चालणं थांबवायचं नसतं. लाटांना घाबरायचं नसतं. फक्त साथ सच्ची हवी. हात हातातून सुटायला नको. नाहीतर साथ संपायला एक लाटही पुरेशी असते. पण त्यांना तर क्षितीज गाठायचं आहे. समोर आहे विस्तीर्ण क्षितीज आणि मागे ठेवायची आहे पाऊलवाट येणाऱ्या असंख्य ध्येयवेड्यांसाठी. उत्तररात्र सरत होती. शुक्राची चांदणी अधिक तेजस्वी दिसत होती. म्हणजे लवकरच रात्र सरून उष:प्रभा येणार होती. ती थबकली. त्याच्या विशाल खांद्यावर तिनं थकून मान टेकली. तो हसून म्हणाला, इतक्यात थांबून कसं चालेल? त्यानं स्वर्णिम झालेल्या आकाशाकडे बोट दाखवलं. दूरवर पसरलेल्या समुद्राआडून सूर्यकिरणं वर येत होती. चांदणं धुसर होत होतं. तिच्या मात्र मनभर चांदणं फुललं होतं. तृप्तीचं समाधानाचं. आणि ती त्या चांदणझुल्यावर त्याच्या साथीनं झुलत होती. ती हळूच म्हणाली, तो बघ! तुझ्या माझ्या स्वप्नांचा सूर्य! म्हणजे मार्ग योग्य होता, अखेर ध्येय गाठलं. स्वाती हुद्दार | |||
Thursday, 11 May 2017
पीसी इन ट्रेंच कोर्ट बॉल गाऊनswati huddarभारतीय अभिनेत्रींनी आपल्या अभिनय कौशल्याने आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि फॅशन विश्वातही नाममुद्रा रेखली आहे. ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोन आणि प्रियांका चोप्रा यांनी हॉलीवूडपटांमध्ये भूमिका साकारून तिथेही भारतीय अभिनयाचा आणि सौंदर्याचा दबदबा निर्माण केला. गेल्या दीड दशकांपासून ऐश्वर्या कान्स महोत्सवात हजेरी लावत आहे. विद्या बालन, सोनम कपूर यांनीही कान्समध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. एकंदरीत आंतरराष्ट्रीय चित्रपट विश्वाला भारतीय अभिनेत्रींची दखल घेणे भाग पडते आहे.गेल्या दोन वर्षांपासून प्रियांका चोप्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने झळकते आहे. कधी तिच्या एक्झोटिक, आय कान्ट मेक यू लव्ह आणि इन माय सिटी या गाण्याच्या अल्बमच्या निमित्ताने. कधी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेल्या डिनरच्या निमंत्रणामुळे, कधी बेवॉच या हॉलीवूडपटातील मुख्य भूमिकेमुळे तर कधी क्वांटिको या अमेरिकन सिरीजमधील सीआयएच्या अभिनयामुळे. मेट गाला फॅशन महोत्सवातील पीसीच्या ड्रेसअपमुळे मात्र तिला आंतरराष्ट्रीय मीडियाच्या कौतुकासोबतच भारतीय चाहत्यांची टीकाही सहन करावी लागली. प्रियांका राल्फ लॉरेलने डिझाइन केलेल्या तिच्या क्वांटिकोमधील सीआयएच्या भूमिकेचे प्रमोशन करणाऱ्या ट्रेंच कोट बॉल गाऊनमध्ये न्यूयॉर्कमधील मेट गाला 2017 च्या रेड कार्पेटवर उतरली आणि आंतरराष्ट्रीय मीडियाच्या नजरा तिच्यावर खिळल्या. आणि कॅमेरे लकाकले. मोठ्या कॉलरच्या या गाऊनवर प्रियांकाने ब्लॅक बूट परिधान केले होते. कानात सिल्व्हर इअरिंग्ज घातले होते. स्मोकी आयमेकअप केलेल्या पीसीने टॉपनॉट हेअर स्टाइल केली होती. हा पायघोळ गाऊन पाठीमागून इतका लांब होता की रेड कार्पेटवर त्याचा घेर सांभाळण्यासाठी सतत एक व्यक्ती लागत होता. आणि हेच टीकाकारांच्या टीकेचे कारण होते. आंतरराष्ट्रीय मीडियाने पीसीचा हा सेक्सी आणि कुल लुक उचलून धरला; मात्र तिच्या देशी चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली उडवली. प्रियांका न्यूयॉर्कमध्ये स्वच्छ भारत अभियानाचे प्रमोशन करीत असल्याचे ट्विट काहींनी केले. तर, तिच्या गाऊनच्या घेराने कोणी क्रिकेटचे मैदान झाकलेले दाखवले. कोणी त्याला कारचे कव्हर बनवले तर कोणी त्याला पॅराशूट म्हणून आणि कोणी झाडू म्हणून हिणवले. कोणी तिच्या ड्रेसला चहाच्या कपातली साय म्हटले. याआधीही वर्षाच्या सुरुवातीला प्रियांका ऑस्करच्या रेड कार्पेटवर उतरली होती, तेव्हाही तिच्या ड्रेसला कोणी काजू कतली, तर कोणी जयपुरी रजई म्हटले होते कोणी तर फ्लॉवर पॉटही म्हटले होते. प्रियांकाने मात्र चाहत्यांची ही टीका अत्यंत खिलाडूवृत्तीने घेत टोलवली आहे. प्रियांका म्हणते, तुमच्या क्रिएटिव्हिटीला सलाम. माझ्या एका ड्रेसमुळे फॅशनशिवाय इतरही कामे होऊ शकतात, म्हणूनच मला मेट गाला आवडतो. तुमची क्रिएटिव्हिटी अशीच टिकून राहो, पुढच्या वेळपर्यंत असेच हसत राहा, असे ट्विट करून प्रियांकाने फोटोशॉपमध्ये चाहत्यांनी तयार केलेल्या मजेदार इमेजेसही शेअर केल्या आहेत. बॉलीवूडमध्ये प्रियांकाच्या अभिनयाची आणि दिसण्याची तारीफ करणारे तिचे चाहते तिचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील फॅशन सेन्स पचवू शकत नाहीत. कारण आंतरराष्ट्रीय फॅशनची मानकं निराळी असतात. तिथे भारतीय शालीन परिधान वेगळेपण मिळवून देऊ शकते; मात्र आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वात टिकू देणार नाही. पाश्चिमात्य ड्रेस सेन्स बोल्ड असणारच. तिथे रेड कार्पेटवर उतरणाऱ्या ग्लोबल फॅशन विश्वाला साजेशी हटके फॅशनच आपल्याही अभिनेत्रींना करावी लागेल. अन्यथा त्या प्रवाहाबाहेर फेकल्या जातील. रुजलेल्या फॅशनपेक्षा निराळे काहीतरी करून चर्चेत येणे, हे रॅपवर उतरविण्याचे कारण असते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ड्रेस डिझायनर याचे भान ठेवूनच या मॉडेल्सचे ड्रेस डिझाइन करीत असतात. ग्लोबल कार्पेटवर उतरण्यापूर्वी या अभिनेत्रीही खूप कॉन्शस असतात. ड्रेस डिझायनरच्या अनुभवावर आणि कौशल्यावरच त्यांची भिस्त असते. त्यामुळे खूप विचारपूर्वक ड्रेस डिझाइन केले जातात. लुक ठरवले जातात. अर्थात लोकप्रियता आणि टीका दोन्ही सहन करण्याची तयारी त्यांना ठेवावी लागते. आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वात वेगळे दिसण्यासाठी कधीतरी ऐश्वर्या राय जांभळे लिपस्टिक निवडते, त्यावरही भारतीय चाहते टीका करतात. अर्थात फॅशन आणि मेकअपच्या पलीकडे आहे भारतीय अभिनेत्रींचा आत्मविश्वास. ज्या आत्मविश्वासाने त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वावरतात, त्याला नक्कीच सलाम. | |||
पिरियड्सही कराच्या विळख्यातस्वाती हुद्दारस्त्री हक्काचे ढोल बडवले जाणाऱ्या समाजात तिच्या आरोग्यविषयक मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत, हे वास्तव आहे. आजही देशातील 80 टक्के महिला मासिकधर्म काळात जुने कपडे, भुसा, वाळू, झाडाचा सुकलेला पालापाचोळा, जुन्या वर्तमानपत्राचा उपयोग करतात. 23 टक्के मुली मासिकधर्म सुरू होताच शिक्षण सोडून देतात. सॅनिटरी नॅपकिन्सविषयी ज्या देशात अजूनही पुरेशी जागरूकताच निर्माण झाली नाही, अशा समाजात सॅनिटरी नॅपकिन्सचा गरजेच्या वस्तूंमध्ये समावेश न करता चैनीची वस्तू म्हणून त्यावर 14.5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय अत्यंत दु:खद आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात ट्विटरच्या माध्यमातून लहु का लगान नावाची मोहीमच सुरू झाली आहे आणि अडीच लाख व्यक्तींनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे.मासिक धर्म ही स्त्री जीवनातील अविभाज्य घडामोड. एक जैविक प्रक्रिया. बालपण आणि तारुण्य यांतील उंबरठा. मातृत्वाच्या, सृजनाच्या दिशेने वाटचाल. मात्र, परंपरांच्या जोखडांनी स्त्री जीवनातील हा उत्सव काजळून टाकला आहे. मासिक धर्म ही लाजिरवाणी, अस्पर्श, लपवून ठेवण्याची गोष्ट आहे. असे काहीसे संस्कार परंपरेने आमच्यावर केले आहेत. परिणामी याविषयी बोलणे, याकाळात स्वच्छता ठेवणे, आरोग्याची काळजी घेणे याविषयीच्या प्रबोधनापासून आपला समाज कोसो दूर आहे. उच्च वर्ग, उच्च मध्यम वर्ग आणि काही प्रमाणात मध्यम वर्ग वगळता मासिक धर्म, त्याकाळातील आरोग्यविषयक काळजी, स्वच्छता आणि याकाळात वापरण्याची साधने यासंबंधी आमचा समाज आजही मागासलेलाच आहे. महिलांमधील हे अज्ञान दूर करण्याकरिता अनेक समाजसेवी संस्था आणि सरकारही पुढे आले. ग्रामीण भागामधील शाळांमधून सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराविषयी जागरूकतेचे अभियान राबविले जाऊ लागले. अनेक स्वयंसेवी संस्था गरीब महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवितात. काही एनजीओंच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांमध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीनही लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्त्री जीवनातील या अत्यंत नाजूक घटनेला आत्ताशा कुठे शब्द फुटू लागले असताना केंद्र सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सचा समावेश चैनीच्या वस्तूंमध्ये करीत त्यावर 14.5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आणि त्याविरुद्धचा आक्रोश सोशल मीडियावर उमटला. ज्या देशात आजही 80टक्के महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स माहीतच नाहीत, आणि माहीत झाले तरी परवडत नाहीत, अशा देशात या जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावणे अन्यायकारकच आहे. सर्वप्रथम मुंबईच्या ऋतिका ग्रोवरने पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना ट्विटरवर सवाल केला की त्यांना महिलांचा मासिकधर्म लक्झरी वाटतो का? ऋतिकाच्या या प्रश्नाने झंझावाताचे रूप घेतले आणि बॉलीवूड, क्रीडा विश्व अशा सगळ्या क्षेत्रातील महिलांनी याविरुद्ध आवाज उठवला. शी सेज या महिलांसाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेने "लहू का लगान' नावाचे अभियानच छेडले आणि ट्विटरवर ट्व्ट्टिसचा पाऊस पडला. अडीच लाखाच्यावर लोकांनी या अभियानाला प्रतिसाद दिला आहे. बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा, अभिनेत्री अदिती हैदरी, स्वरा भास्कर, गुल पनाग, लिजा रे अ'शा अनेक अभिनेत्रींनी अर्थमंत्र्यांना सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी रद्द करण्याची विनंती केली आहे. या अभियानात पुरुषदेखील मागे नाहीत. गायक सोनू निगम, विशाल ददनानी, टापसे पन्नू, गुलशन ग्रोवर, सायरस अशा अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत सॅनिटरी नॅपकिन्सवरील जीएसटी रद्द करण्याची विनंती केली आहे. आसाममधील सिलचरच्या आमदार सुष्मिता देव यांनी याविरुद्ध ऑनलाइन याचिका दाखल करीत म्हटले आहे की पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्सवर टॅक्स लावू नये आणि इतर सॅनिटरी नॅपकिन्सवर कमीतकमी टॅक्स लावण्यात यावा. या अभियानात उत्तर प्रदेशातील 20 हजार महिला सहभागी झाल्या आहेत. कानपूरच्या रश्मी अग्रवालने यासाठी स्वाक्षरी अभियान राबवित 5 हजार महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन अर्थमंत्र्यांना सादर केले. आजवर केवळ दिल्ली राज्याने सॅनिटरी नॅपकिन्सवर टॅक्स न लावण्याची घोषणा केली आहे. इतर राज्यांनी मात्र याविषयी मौन पाळले आहे. एकूणच या आंदोलनाने आता वेग पकडला आहे. महिला आरोग्याच्या प्रश्नाविषयी समाजाने इतके जागरूक असावे, ही आशादायक घटना तर आहेच आणि सोशल मीडियाचा उपयोग अशा सामाजिक प्रश्नांच्या व्यासपीठासाठी व्हावा, हेदेखील समाधानकारक आहे. अर्थमंत्र्यांनी अजून या अभियानाची दखल घेतली नसली तरी ती घेतली जाईल आणि सॅनिटरी नॅपकिन्सचा समावेश चैनीच्या वस्तूंमध्ये न होता जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात येईल, या आशेसह! | |||
Wednesday, 3 May 2017
वाग्यज्ञाची
सावली
३ मे हा प्राचार्य राम शेवाळकरांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त नानासाहेब आणि विजयाताईंच्या सहजीवनाचे शब्दचित्र.
--------------------------------------------
वक्तादशसहस्त्रेषु राम शेवाळकर यांनी आयुष्यभर सरस्वतीची आराधना केली. अखंड वाचन, मनन, चिंतन, लेखन आणि वक्तृत्व या माध्यमातून त्यांनी ज्ञानयज्ञ तेजाळत ठेवला आणि त्यांना सतत सावलीसारखी सोबत करणाऱ्या विजया शेवाळकरांनी त्यांचा संसारयज्ञ सुखेनैव सांभाळला. या दोघांच्या सुखी संसाराचा गाभा होता समाधान.
---------------------------------------
ज्ञानपथाचे यात्रिक प्राचार्य राम शेवाळकर आणि संसाराची असोशी असलेल्या विजयाताई ही दोन्ही वेगळ्याच मुशीत घडलेली माणसे. १९५७ पासून दोघांची साथ. एकमेकांना पूरक असलेली. ज्ञानगंगेत सदैव डुंबणाऱ्या नानासाहेबांपर्यंत विजयाताईंनी संसाराची उणीदुणी कधी पोहोचू दिली नाहीत. उपलब्ध साधनसामग्रीत आनंदाने आणि समाधानाने त्यांनी नानासाहेबांचे विस्तीर्ण कुटुंब विनातक्रार सांभाळले. कारण समाधान ही सुखी संसाराची गुरुकिल्ली असते, यावर विजयाताईंचा पुरेपूर विश्वास आहे.
नानासाहेब आणि विजयाताई यांचा त्याकाळी प्रेमविवाह. लग्न झाले तेव्हा नानासाहेब नांदेडला एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. वक्तृत्व आणि लेखनाची आवड शालेय जीवनापासूनच होती. शाळा-महाविद्यालयांतील हस्तलिखितांचे संपादन, वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग असे उपक्रम सुरूच होते. नांदेड मुक्कामी बहि:शाल व्याख्यानमालेच्या निमित्ताने वक्तृत्वाला अधिकाधिक पैलू पडत गेले. नरहर कुरुंदकरांची तिथे भेट झाली आणि लेखन-वक्तृत्व बहरत गेले. आठवड्यातील पाच दिवस प्राध्यापकी आणि शनिवार-रविवार दोन दिवस व्याख्याने असा परिपाठच सुरू झाला. विजयाताई म्हणतात, मी त्यांना कधीही व्याख्यानाची तयारी करताना पाहिले नाही. वाचन मात्र अखंड सुरूच असायचे. नानासाहेबांना प्रवासात सतत पुस्तके लागत. वाचन हाच त्यांचा ध्यास होता आणि वाचन हाच त्यांचा विरंगुळा होता.
नानासाहेबांना बुद्धिमत्तेची देवदत्त देणगी लाभली होती. एकदा वाचले की, त्यांना परत तो संदर्भ कधी बघावा लागत नसे. ओघवती वाणी हा त्यांच्या घराण्याचा वारसा होता. त्यांचे आजोबा प्रवचनकार होते. वडील कीर्तनकार होते. सरस्वती जणू त्यांच्या वाणीवर वास करीत होती. ते बोलायला लागले की लोक मंत्रमुग्ध होत. त्यांच्या ज्ञानाराधनेच्या आड मी कधीही आले नाही. त्यांना पूरक ठरेल, असेच आचरण मी कायम ठेवले, असेही विजयाताई सांगतात.
पुढे नानासाहेब वणीला प्राचार्य म्हणून रुजू झाले. तोपर्यंत वक्ता आणि लेखक म्हणून ते सुप्रसिद्ध झाले होते. माणसांची असोशी हा नानासाहेब आणि विजयाताई या दोघांच्याही स्वभावातील समान धागा. त्यामुळे कुटुंब विस्तारत गेले. वणीचे शेवाळकरांचे घर सतत माणसांनी भरलेले. साहित्यिक, सांस्कृतिक गप्पा आणि जोडीला विजयाताईंनी निगुतीने रांधलेला स्वयंपाक. सरस्वती आणि अन्नपूर्णा जणू एकत्र नांदत होत्या. ग. दि. माडगूळकर, पु. भा. भावे, सेतू माधवराव पगडी, बाबा आमटे अशी अनेक मंडळी वणीच्या घरी येत, हक्काने राहत. समानधर्मी माणसे अनायासेच जुळत जातात. सरस्वतीचे उपासक असलेल्या नानासाहेबांवर अनेक विद्वज्जनांनी अकृत्रिम प्रेम केले आणि त्या सगळ्यांनी विजयाताईंनाही आपले मानले.
‘अमृताचा घनु’ या ज्ञानेश्वरीवरील निरुपणाच्या कार्यक्रमामुळे मंगेशकर आणि शेवाळकर कुटुंबीयांचे असेच ऋणानुबंध जुळले. ते आजही तेवढेच घट्ट आहेत. नानासाहेबांच्या पंचाहत्तरीला लतादीदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी हजेरी लावली हा कृतकृत्यतेचा क्षण होता, असे विजयाताई सांगतात. नानासाहेबांना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार लाभले; मात्र पणजी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली बिनविरोध निवड हा आमच्या आयुष्यातील अपूर्व आनंदाचा क्षण होता. कारण लेखक आणि वक्ते म्हणून मोठे असलेले नानासाहेब माणूस म्हणूनही अजातशत्रू आहेत आणि त्यांच्या चाहत्यांचे त्यांच्यावर अपार प्रेम आहे, हे त्या घटनेने सिद्ध केले. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही नानासाहेबांच्या वक्तृत्वाचे आणि लेखनाचे चाहते आहेत. अमेरिकेतही दीड महिना नानासाहेबांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
नानासाहेबांना लोकांचे इतके अपार प्रेम मिळाले कारण मी कुणी वेगळा आहे, मला काही विशेष महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांच्या वागण्यातून कधीही जाणवले नाही. घरातसुद्धा ते वाचत किंवा लिहीत असताना कुठलीही पाबंदी नसायची. कुणी भेटायला आले तर त्यांनी कधीही त्यांना नकार दिला नाही. कितीही नवोदित साहित्यिकाने पुस्तकाला प्रस्तावना मागितली तरी त्यांनी कधीही नकार दिला नाही. माणसांचे अलोट प्रेम हेच नानासाहेब आणि विजयाताईंनी आपले वैभव मानले. विजयाताई सांगतात, समाधानाने आणि आनंदाने आमचे सहजीवन काठोकाठ भरले होते. अनेक चांगले सिनेमे, नाटके, गाण्यांचे, व्याख्यानांचे कार्यक्रम आम्ही एकत्र ऐकले, पाहिले. आयुष्यभर आनंद मिळवला आणि वाटलाही. नानासाहेब गेल्यानंतरही नॉर्थ अंबाझरी रोडवरील शेवाळकरांच्या घरी माणसांचा जमावडा असतो. मोठ्यांपासून सामान्यांपर्यंत सगळे इथे येतात, आपल्या वाट्याचा आनंद ओंजळी भरभरून घेतात आणि समाधानाने परततात.
वाग्यज्ञाची सावली असलेल्या विजयाताईंनी आनंदाचे दान देण्याचा वसा आजही कायम ठेवला आहे.
-------------------------
स्वाती हुद्दार
सावली
३ मे हा प्राचार्य राम शेवाळकरांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त नानासाहेब आणि विजयाताईंच्या सहजीवनाचे शब्दचित्र.
--------------------------------------------
वक्तादशसहस्त्रेषु राम शेवाळकर यांनी आयुष्यभर सरस्वतीची आराधना केली. अखंड वाचन, मनन, चिंतन, लेखन आणि वक्तृत्व या माध्यमातून त्यांनी ज्ञानयज्ञ तेजाळत ठेवला आणि त्यांना सतत सावलीसारखी सोबत करणाऱ्या विजया शेवाळकरांनी त्यांचा संसारयज्ञ सुखेनैव सांभाळला. या दोघांच्या सुखी संसाराचा गाभा होता समाधान.
---------------------------------------
ज्ञानपथाचे यात्रिक प्राचार्य राम शेवाळकर आणि संसाराची असोशी असलेल्या विजयाताई ही दोन्ही वेगळ्याच मुशीत घडलेली माणसे. १९५७ पासून दोघांची साथ. एकमेकांना पूरक असलेली. ज्ञानगंगेत सदैव डुंबणाऱ्या नानासाहेबांपर्यंत विजयाताईंनी संसाराची उणीदुणी कधी पोहोचू दिली नाहीत. उपलब्ध साधनसामग्रीत आनंदाने आणि समाधानाने त्यांनी नानासाहेबांचे विस्तीर्ण कुटुंब विनातक्रार सांभाळले. कारण समाधान ही सुखी संसाराची गुरुकिल्ली असते, यावर विजयाताईंचा पुरेपूर विश्वास आहे.
नानासाहेब आणि विजयाताई यांचा त्याकाळी प्रेमविवाह. लग्न झाले तेव्हा नानासाहेब नांदेडला एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. वक्तृत्व आणि लेखनाची आवड शालेय जीवनापासूनच होती. शाळा-महाविद्यालयांतील हस्तलिखितांचे संपादन, वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग असे उपक्रम सुरूच होते. नांदेड मुक्कामी बहि:शाल व्याख्यानमालेच्या निमित्ताने वक्तृत्वाला अधिकाधिक पैलू पडत गेले. नरहर कुरुंदकरांची तिथे भेट झाली आणि लेखन-वक्तृत्व बहरत गेले. आठवड्यातील पाच दिवस प्राध्यापकी आणि शनिवार-रविवार दोन दिवस व्याख्याने असा परिपाठच सुरू झाला. विजयाताई म्हणतात, मी त्यांना कधीही व्याख्यानाची तयारी करताना पाहिले नाही. वाचन मात्र अखंड सुरूच असायचे. नानासाहेबांना प्रवासात सतत पुस्तके लागत. वाचन हाच त्यांचा ध्यास होता आणि वाचन हाच त्यांचा विरंगुळा होता.
नानासाहेबांना बुद्धिमत्तेची देवदत्त देणगी लाभली होती. एकदा वाचले की, त्यांना परत तो संदर्भ कधी बघावा लागत नसे. ओघवती वाणी हा त्यांच्या घराण्याचा वारसा होता. त्यांचे आजोबा प्रवचनकार होते. वडील कीर्तनकार होते. सरस्वती जणू त्यांच्या वाणीवर वास करीत होती. ते बोलायला लागले की लोक मंत्रमुग्ध होत. त्यांच्या ज्ञानाराधनेच्या आड मी कधीही आले नाही. त्यांना पूरक ठरेल, असेच आचरण मी कायम ठेवले, असेही विजयाताई सांगतात.
पुढे नानासाहेब वणीला प्राचार्य म्हणून रुजू झाले. तोपर्यंत वक्ता आणि लेखक म्हणून ते सुप्रसिद्ध झाले होते. माणसांची असोशी हा नानासाहेब आणि विजयाताई या दोघांच्याही स्वभावातील समान धागा. त्यामुळे कुटुंब विस्तारत गेले. वणीचे शेवाळकरांचे घर सतत माणसांनी भरलेले. साहित्यिक, सांस्कृतिक गप्पा आणि जोडीला विजयाताईंनी निगुतीने रांधलेला स्वयंपाक. सरस्वती आणि अन्नपूर्णा जणू एकत्र नांदत होत्या. ग. दि. माडगूळकर, पु. भा. भावे, सेतू माधवराव पगडी, बाबा आमटे अशी अनेक मंडळी वणीच्या घरी येत, हक्काने राहत. समानधर्मी माणसे अनायासेच जुळत जातात. सरस्वतीचे उपासक असलेल्या नानासाहेबांवर अनेक विद्वज्जनांनी अकृत्रिम प्रेम केले आणि त्या सगळ्यांनी विजयाताईंनाही आपले मानले.
‘अमृताचा घनु’ या ज्ञानेश्वरीवरील निरुपणाच्या कार्यक्रमामुळे मंगेशकर आणि शेवाळकर कुटुंबीयांचे असेच ऋणानुबंध जुळले. ते आजही तेवढेच घट्ट आहेत. नानासाहेबांच्या पंचाहत्तरीला लतादीदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी हजेरी लावली हा कृतकृत्यतेचा क्षण होता, असे विजयाताई सांगतात. नानासाहेबांना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार लाभले; मात्र पणजी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली बिनविरोध निवड हा आमच्या आयुष्यातील अपूर्व आनंदाचा क्षण होता. कारण लेखक आणि वक्ते म्हणून मोठे असलेले नानासाहेब माणूस म्हणूनही अजातशत्रू आहेत आणि त्यांच्या चाहत्यांचे त्यांच्यावर अपार प्रेम आहे, हे त्या घटनेने सिद्ध केले. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही नानासाहेबांच्या वक्तृत्वाचे आणि लेखनाचे चाहते आहेत. अमेरिकेतही दीड महिना नानासाहेबांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
नानासाहेबांना लोकांचे इतके अपार प्रेम मिळाले कारण मी कुणी वेगळा आहे, मला काही विशेष महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांच्या वागण्यातून कधीही जाणवले नाही. घरातसुद्धा ते वाचत किंवा लिहीत असताना कुठलीही पाबंदी नसायची. कुणी भेटायला आले तर त्यांनी कधीही त्यांना नकार दिला नाही. कितीही नवोदित साहित्यिकाने पुस्तकाला प्रस्तावना मागितली तरी त्यांनी कधीही नकार दिला नाही. माणसांचे अलोट प्रेम हेच नानासाहेब आणि विजयाताईंनी आपले वैभव मानले. विजयाताई सांगतात, समाधानाने आणि आनंदाने आमचे सहजीवन काठोकाठ भरले होते. अनेक चांगले सिनेमे, नाटके, गाण्यांचे, व्याख्यानांचे कार्यक्रम आम्ही एकत्र ऐकले, पाहिले. आयुष्यभर आनंद मिळवला आणि वाटलाही. नानासाहेब गेल्यानंतरही नॉर्थ अंबाझरी रोडवरील शेवाळकरांच्या घरी माणसांचा जमावडा असतो. मोठ्यांपासून सामान्यांपर्यंत सगळे इथे येतात, आपल्या वाट्याचा आनंद ओंजळी भरभरून घेतात आणि समाधानाने परततात.
वाग्यज्ञाची सावली असलेल्या विजयाताईंनी आनंदाचे दान देण्याचा वसा आजही कायम ठेवला आहे.
-------------------------
स्वाती हुद्दार
Thursday, 13 April 2017
म्हारो प्रणाम...शब्दांकन : स्वाती हुद्दारतंत्रामध्ये अडकलेली गायकी भावपूर्ण करीत गेली सहा दशकं श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सच्चा सूर परमतत्त्वाला मिळाला असला, तरी त्यांनी आळवलेला सहेला रे, श्याम सुंदर राजसा, अवघा रंग एक झाला, पडले दूर देशी, अवघा तो शकुन, निर्गुणी भजन असं सुरेल संचित मागे रेंगाळतंय आणि त्याचबरोबर त्यांच्या अनेक आठवणीही. त्यांच्या अशा आठवणींना उजाळा दिलाय सप्तकचे विलास मानेकर, उदय पाटणकर, डॉ. उदय गुप्ते, डॉ. श्रीराम काणे आणि नितीन सहस्रबुद्धे यांनी.कलेला देश-प्रदेशांच्या भिंती नसतातच मुळी. सच्चे कलावंत आणि सच्चे कलारसिक या सगळ्यांच्या पलीकडे असतात. साहित्यिकाच्या शब्दांमधील भाव असोत, चित्रकाराच्या कुंचल्यातून चितारलेल्या अर्थपूर्ण रेषा असोत की गायकाच्या साधनेतून तप:पुत होऊन आलेले स्वर असोत, सच्चे रसिक त्या कलाविष्कारात देहभान विसरून चिंब न्हाऊन निघत असतात.साधारण 1980 चा काळ. संगीतावर प्रेम करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणांनी नागपूरकर रसिकांना संगीताची मेजवानी देण्याचे ठरवले आणि सप्तकची स्थापना झाली. सप्तकच्या माध्यमातून मोठमोठ्या कलावंतांच्या मैफिली नागपुरात सुरू झाल्या. परवीन सुलतानासारख्या दिग्गज कलावंतांनी इथे हजेरी लावली. या संगीतवेड्यांच्या मनात किशोरी आमोणकरांना नागपुरात आणण्याचा विचार आला. त्याआधीही किशोरीताई नागपुरात गायल्या होत्या. मात्र, या मंचावर किशोरीताईंना आमंत्रित करण्याचे ठरवून ही मंडळी कामाला लागली. किशोरीताईंची भेट घेऊन त्यांना विनंती करण्यात आली आणि त्यांनी अगदी सहज होकार दिला. सप्तकच्या माध्यमातून किशोरीताईंची मैफल रंगली. सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणातली जाणकार दर्दी गर्दी. गडद होत चाललेली रात्र आणि किशोरीताईंच्या दैवी स्वरातून उमलत चाललेला यमन. त्यानंतर भावपूर्ण बंदिशीने नटलेला बागेश्री ताई गायल्या आणि नागपूरकर रसिकांच्या कानाचे पारणे फिटले. याच मैफिलीत त्या "कोई कछु कहे मन लागा' हे भजन गायल्या होत्या. या वेळी तानपुऱ्यावर त्यांच्या मागे होत्या अश्विनी भिडे यांच्या मातोश्री माणिक भिडे, संवादिनीवर होते बबनराव आठ्यले आणि तबल्यावर होते गोपाळराव वाडेगावकर. किशोरीताईंचे गाणे आणि आप्पां वाडेगावकरांचा तबला म्हणजे मणिकांचन योग होता. 1980 ते 1993 सप्तकने किशोरीताईंचे सहा कार्यक्रम नागपुरात घडवून आणले. या काळात सप्तकशी आणि नागपूरशी ताईंचे अतूट असे बंध जुळले ते कायमचेच. मैफल सुरू होण्यापूर्वी मात्र किशोरीताई खूप गंभीर असत. या काळात त्यांना खूप सांभाळावे लागे. सगळी वाद्यं सुरात लागेपर्यंत त्यांचं गाणं सुरू होत नसे. तानपुरे आणि स्वरमंडळ यांचा मेळ जमला की, त्या गायला सुरुवात करीत. आणि एकदा का स्वरसाधना सुरू झाली की, किशोरीताई आणि रसिकही अलौकिक विश्वात संचार करीत असत. कारण, किशोरीताईंसाठी गायन ही केवळ एक मैफल नसायची, तर तो अमूर्ताशी संवाद असायचा. परमेश्वराची आराधना असायची. उच्च कोटीचा आध्यात्मिक अनुभव देणारा तो क्षण असायचा. म्हणूनच त्यांच्यासह रसिकही परमोच्च आनंदाचा अनुभव घेत असत. पुढे तर सप्तकच्या मंडळींशी ताईंचे सूर इतके जुळले की, त्या आजच्या मैफलीत काय गाऊ, असे या मंडळींना विचारायच्या. असेच एकदा कोणीतरी पुरीया धनाश्रीची फर्माइश केली; मात्र ताईंनी नम्रपणे त्यास नकार दिला. पण, त्या मैफलीत त्या अविस्मरणीय असा मारवा गायल्या आणि आयोजकांना आणि श्रोत्यांनाही त्यांनी तृप्त केले. सप्तकचे डॉ. श्रीराम काणे यांना तर पुढे किशोरीताईंकडे सतार शिकण्याचे भाग्य लाभले. एवढेच नव्हे, तर म्हारो प्रणामच्या प्रॅक्टिसदरम्यान डॉ. काणेंनी त्यांना सतारीवर साथही केली आहे. गुरू म्हणून किशोरीताई अत्यंत प्रेमळ होत्या, असे डॉ. काणे सांगतात. किशोरीताईंचे नागपुरी साड्यांवर निरतिशय प्रेम. कार्यक्रमासाठी त्या इथे आल्या की, साड्यांची खरेदी ठरलेलीच असायची आणि अशा काही क्षणी ताईंचे निराळेच रूप बघायला मिळायचे. एकदा तर कॉटन मार्केटच्या रस्त्याने जाताना भाजीबाजार लागला. बाजारातली ताजी भाजी पाहून ताई इतक्या खूश झाल्या की, त्यांनी गाडी थांबवून खूप भाजी खरेदी केली आणि आपल्या बरोबर विमानातून मुंबईला नेली. एका गानतपस्विनीची ही वेगळी रूपं सप्तकच्या आयोजकांना अनुभवायला मिळाली. किशोरीताई त्यांची आई आणि गुरू मोगूबाई कुर्डीकरांविषयी भरभरून बोलायच्या. पं. भीमसेन जोशी, गंगूबाई हंगल, झाकिर हुसेन आणि अनेक कलावंतांविषयी, त्यांच्या कलेविषयी किशोरीताईंना नितांत आदर होता. सप्तकच्या माध्यमातून किशोरी आमोणकरांच्या नागपुरात झालेल्या सहा मैफली म्हणजे नागपूरच्या इतिहासातील सहा सोनेरी पानेच. हिऱ्यामाणकांची झगमगती दीपमाळच जणू. त्या मैफलींचे सूर कलारसिकांच्या मनात कायम रुंजी घालत राहतील. | |||
Tuesday, 7 February 2017
मधुबाला
इंट्रो
14 फेब्रुवारी हा मधुबालाचा जन्मदिन. त्यानिमित्त तिचे स्मरण
हम ना रहे तो...
खुशियॉं थी चार दिन की
आँसू है उम्रभर के
तनहाईयों में अक्सर रोये है याद करके
वो वक्त जो के हमने इकसाथ है गुजारा
गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा
हाफिज खुदा तुम्हारा
असे म्हणत दूर दूर जाणारी, डोक्यावर घुंघट घेतलेली गंभीर चेहऱ्याची गोड गोड दिसणारी "शिरीन फरहाद'मधली मधुबाला काळीज चिरत जाते. कळायला लागल्यावर मधुबालाचे हे मला झालेले पहिले दर्शन. मधुबालाला असे "हाफिज खुदा' म्हणताना पाहिले आणि ती मनात ठसली ती कायमचीच. रुपेरी पडदा, चित्रपट, अभिनेत्री हे सगळं कळण्याचं ते वय नव्हतं. मात्र, तरीही मधुबालानं वेड लावलं. ब्लॅक ऍण्ड व्हाइट टीव्हीचा तो काळ होता. वाहिन्यांची रेलचेल नव्हती. दूरदर्शन एके दूरदर्शन आणि रविवारी त्यावर दाखवला जाणारा सिनेमा. एवढंच जुने सिनेमे पाहण्याचं माध्यम होतं. मात्र, त्यानंतर ती अशीच अधूनमधून भेटत राहिली. कधी "चलती का नाम गाडी'मधली "पाच रुपय्या बारा आना'साठी किशोरकुमारला छळणारी अवखळ मधुबाला, कधी "अच्छा जी मैं हारी' म्हणत "काला पानी'मध्ये देवानंदसमोर सपशेल शरणागती पत्करणारी ओढाळ प्रेयसी, "जाने कहॉं मेरा जिगर गया जी' म्हणणारी "मिस्टर ऍण्ड मिसेस 55'मधली लडिवाळ मधुबाला, "हम किसी से ना कहेंगे, चुपचुप से रहेंगे' असं म्हणणारी "यहुदी कि लडकी'मधली मधुबाला, "एक लड़की भीगी भागी सी'मधलं मधुबालाचं मोहक दर्शन आणि
"हाए वो रेशमी जुल्फों से बरसता पानी
फुल से गालों पे रुकने को तरसता पानी' या "बरसात की रात' चित्रपटातील गाण्यात नखशिखांत भिजलेली मधुबाला.
"सूर्ख आचल को दबाकर जो निचोड़ा उसने' या ओळीतील मधुबाला पाहताना हृदयाचं पाणी पाणी होतं. किती विविध रूपं आहेत मधुबालाची! सगळीच लोभस आणि मोहक.
मात्र, मधुबालाचं सगळ्यांत जास्त भावतं ते सात्त्विक चेहऱ्यावरचं खट्याळ हास्य. हा खट्याळपणा तिच्यात जन्मजातच असावा. उदास, गंभीर भूमिकाही मधुबालानं ताकदीनं पेलल्या. मात्र, मधुबालाचा रुपेरी पडद्यावरचा नटखट फुलपाखरासारखा भिरभिरता वावरच अधिक वेड लावून गेला आहे. तिच्या कारकिर्दीला व्यापून उरला आहे.
वयाच्या नवव्या वर्षी आर्थिक गरजेसाठी बालकलाकार म्हणून "वसंत' या सिनेमातून पडद्यावर आलेल्या मुमताज जेहान देहलवीला अभिनेत्री देविकाराणीनं "मधुबाला' हे नाव दिलं आणि सिनेसृष्टीतील या माधुर्यानं 1942 ते 1960 अशी जवळपास 18 वर्षे इथे अनभिषिक्त साम्राज्य केलं. मधुबालाला या जगातून जाऊन पन्नासहून अधिक वर्षे होऊनही ती आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. "नीलकमल' हा मधुबालाचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर महल, यहुदी की लड़की, मिस्टर ऍण्ड मिसेस 55, काला पानी असे एकाहून एक सरस चित्रपट मधुबालाने दिले.
मधुबालाने अशोककुमार, देवानंद, प्रदीपकुमार, राज कपूर, शम्मी कपूर, देवानंद आणि दिलीपकुमारसारख्या सर्वच आघाडीच्या कलाकारांबरोबर भूमिका केल्या. पण, किशोर आणि मधुबालाला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणे हा सोहळा आहे. ही जोडी खऱ्या आयुष्यातही पती-पत्नीच्या नात्याने एकत्र आली; पण कुठला विसंवादी सूर लागला न कळे, संसाराचे गीत मात्र सुरेल होऊ शकले नाही.
अनेक नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम करीत 1960 मध्ये मधुबाला तिच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली. "मुगले आजम'ने तिच्या अभिनय कारकिर्दीत मानाचा तुरा खोवला. या सिनेमात मधुबालाच्या अभिनयाचा कस लागला आहे. मधुबालानेही हातचे काहीही राखून न ठेवता अभिनयकौशल्याची चुणूक "अनारकली' साकारताना दाखवली आहे. तिला या सिनेमाने फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळवून दिले.
सलीमवरच्या प्रेमासाठी हिंदुस्थानच्या शहेनशहालाही "प्यार किया तो डरना क्या' असा जाब विचारणारी अनारकली मधुबालाने अजरामर केली आहे.
"प्यार किया कोई चोरी नहीं की' असं सांगताना सलीमवरचे प्रेम, सच्चा प्रेमावरचा विश्वास, प्रेमाप्रतिचे समर्पण असं सगळं-सगळं एकाच वेळी मधुबाला आपल्या बोलक्या डोळ्यांनी व्यक्त करते, तेव्हा प्रेम ही एकच भावना अवघ्या विश्वाला व्यापून उरली आहे, असं वाटतं आणि हे सांगणाऱ्या मधुबालावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो. मधुबालाला खऱ्या आयुष्यात मात्र अशा प्रेमाला पारखं व्हावं लागलं.
वयाच्या तिशीतच मधुबाला दुर्धर आजारानं आजारी पडली आणि एका आरस्पानी सौंदर्याला सिनसृष्टीला मुकावं लागलं.
मधुबाला अल्पायुषी ठरली नसती तर तिच्या कसदार अभिनयानं सजलेल्या आणखी अनेक भूमिकांचा आनंद रसिकांना घेता आला असता.
पण... ते दैवी सौंदर्य अल्पकाळासाठीच भूलोकी अवतीर्ण झालं असावं. आज इतक्या वर्षांनंतरही मधुबाला, तिचा अभिनय आणि तिचे अप्सरेसारखे सौंदर्य दीपस्तंभासारखे तेजाळते आहे.
जॉर्जेटच्या साडीतली डोळ्यावर बट आलेली आपल्यातलीच एक वाटणारी मधुबाला जेव्हा "हम ना रहे तो याद करोगे समझे' म्हणते ते इतक्या वर्षांनंतरही किती खरं आहे ना!
इंट्रो
14 फेब्रुवारी हा मधुबालाचा जन्मदिन. त्यानिमित्त तिचे स्मरण
हम ना रहे तो...
खुशियॉं थी चार दिन की
आँसू है उम्रभर के
तनहाईयों में अक्सर रोये है याद करके
वो वक्त जो के हमने इकसाथ है गुजारा
गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा
हाफिज खुदा तुम्हारा
असे म्हणत दूर दूर जाणारी, डोक्यावर घुंघट घेतलेली गंभीर चेहऱ्याची गोड गोड दिसणारी "शिरीन फरहाद'मधली मधुबाला काळीज चिरत जाते. कळायला लागल्यावर मधुबालाचे हे मला झालेले पहिले दर्शन. मधुबालाला असे "हाफिज खुदा' म्हणताना पाहिले आणि ती मनात ठसली ती कायमचीच. रुपेरी पडदा, चित्रपट, अभिनेत्री हे सगळं कळण्याचं ते वय नव्हतं. मात्र, तरीही मधुबालानं वेड लावलं. ब्लॅक ऍण्ड व्हाइट टीव्हीचा तो काळ होता. वाहिन्यांची रेलचेल नव्हती. दूरदर्शन एके दूरदर्शन आणि रविवारी त्यावर दाखवला जाणारा सिनेमा. एवढंच जुने सिनेमे पाहण्याचं माध्यम होतं. मात्र, त्यानंतर ती अशीच अधूनमधून भेटत राहिली. कधी "चलती का नाम गाडी'मधली "पाच रुपय्या बारा आना'साठी किशोरकुमारला छळणारी अवखळ मधुबाला, कधी "अच्छा जी मैं हारी' म्हणत "काला पानी'मध्ये देवानंदसमोर सपशेल शरणागती पत्करणारी ओढाळ प्रेयसी, "जाने कहॉं मेरा जिगर गया जी' म्हणणारी "मिस्टर ऍण्ड मिसेस 55'मधली लडिवाळ मधुबाला, "हम किसी से ना कहेंगे, चुपचुप से रहेंगे' असं म्हणणारी "यहुदी कि लडकी'मधली मधुबाला, "एक लड़की भीगी भागी सी'मधलं मधुबालाचं मोहक दर्शन आणि
"हाए वो रेशमी जुल्फों से बरसता पानी
फुल से गालों पे रुकने को तरसता पानी' या "बरसात की रात' चित्रपटातील गाण्यात नखशिखांत भिजलेली मधुबाला.
"सूर्ख आचल को दबाकर जो निचोड़ा उसने' या ओळीतील मधुबाला पाहताना हृदयाचं पाणी पाणी होतं. किती विविध रूपं आहेत मधुबालाची! सगळीच लोभस आणि मोहक.
मात्र, मधुबालाचं सगळ्यांत जास्त भावतं ते सात्त्विक चेहऱ्यावरचं खट्याळ हास्य. हा खट्याळपणा तिच्यात जन्मजातच असावा. उदास, गंभीर भूमिकाही मधुबालानं ताकदीनं पेलल्या. मात्र, मधुबालाचा रुपेरी पडद्यावरचा नटखट फुलपाखरासारखा भिरभिरता वावरच अधिक वेड लावून गेला आहे. तिच्या कारकिर्दीला व्यापून उरला आहे.
वयाच्या नवव्या वर्षी आर्थिक गरजेसाठी बालकलाकार म्हणून "वसंत' या सिनेमातून पडद्यावर आलेल्या मुमताज जेहान देहलवीला अभिनेत्री देविकाराणीनं "मधुबाला' हे नाव दिलं आणि सिनेसृष्टीतील या माधुर्यानं 1942 ते 1960 अशी जवळपास 18 वर्षे इथे अनभिषिक्त साम्राज्य केलं. मधुबालाला या जगातून जाऊन पन्नासहून अधिक वर्षे होऊनही ती आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. "नीलकमल' हा मधुबालाचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर महल, यहुदी की लड़की, मिस्टर ऍण्ड मिसेस 55, काला पानी असे एकाहून एक सरस चित्रपट मधुबालाने दिले.
मधुबालाने अशोककुमार, देवानंद, प्रदीपकुमार, राज कपूर, शम्मी कपूर, देवानंद आणि दिलीपकुमारसारख्या सर्वच आघाडीच्या कलाकारांबरोबर भूमिका केल्या. पण, किशोर आणि मधुबालाला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणे हा सोहळा आहे. ही जोडी खऱ्या आयुष्यातही पती-पत्नीच्या नात्याने एकत्र आली; पण कुठला विसंवादी सूर लागला न कळे, संसाराचे गीत मात्र सुरेल होऊ शकले नाही.
अनेक नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम करीत 1960 मध्ये मधुबाला तिच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली. "मुगले आजम'ने तिच्या अभिनय कारकिर्दीत मानाचा तुरा खोवला. या सिनेमात मधुबालाच्या अभिनयाचा कस लागला आहे. मधुबालानेही हातचे काहीही राखून न ठेवता अभिनयकौशल्याची चुणूक "अनारकली' साकारताना दाखवली आहे. तिला या सिनेमाने फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळवून दिले.
सलीमवरच्या प्रेमासाठी हिंदुस्थानच्या शहेनशहालाही "प्यार किया तो डरना क्या' असा जाब विचारणारी अनारकली मधुबालाने अजरामर केली आहे.
"प्यार किया कोई चोरी नहीं की' असं सांगताना सलीमवरचे प्रेम, सच्चा प्रेमावरचा विश्वास, प्रेमाप्रतिचे समर्पण असं सगळं-सगळं एकाच वेळी मधुबाला आपल्या बोलक्या डोळ्यांनी व्यक्त करते, तेव्हा प्रेम ही एकच भावना अवघ्या विश्वाला व्यापून उरली आहे, असं वाटतं आणि हे सांगणाऱ्या मधुबालावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो. मधुबालाला खऱ्या आयुष्यात मात्र अशा प्रेमाला पारखं व्हावं लागलं.
वयाच्या तिशीतच मधुबाला दुर्धर आजारानं आजारी पडली आणि एका आरस्पानी सौंदर्याला सिनसृष्टीला मुकावं लागलं.
मधुबाला अल्पायुषी ठरली नसती तर तिच्या कसदार अभिनयानं सजलेल्या आणखी अनेक भूमिकांचा आनंद रसिकांना घेता आला असता.
पण... ते दैवी सौंदर्य अल्पकाळासाठीच भूलोकी अवतीर्ण झालं असावं. आज इतक्या वर्षांनंतरही मधुबाला, तिचा अभिनय आणि तिचे अप्सरेसारखे सौंदर्य दीपस्तंभासारखे तेजाळते आहे.
जॉर्जेटच्या साडीतली डोळ्यावर बट आलेली आपल्यातलीच एक वाटणारी मधुबाला जेव्हा "हम ना रहे तो याद करोगे समझे' म्हणते ते इतक्या वर्षांनंतरही किती खरं आहे ना!
Tuesday, 17 January 2017
| बाईची गं माझी जात स्वाती हुद्दार विनयभंग, अत्याचाराच्या घटना सततच्याच. अशा घटनांनंतर समाजात उठणारे पडसादही नेहमीचेच. काहींचे हेलावणे, सल्ले देणेही कायमचेच. मात्र, आता स्त्रीनेच याविरुद्ध ठामपणाने उभे राहिले पाहिजे, काहीतरी ठोस केलेच पाहिजे, या निष्कर्षापर्यंत या अलीकडच्या घटनांनी आणून पोहोचवले आहे. | डिसेंबर-जानेवारीच्या समेवरची गोठवणारी थंडी. 2016 मधून सारे जग 2017
मध्ये संक्रमित होत होते. सगळीकडे नववर्षाचा जल्लोष सुरू होता. मात्र, बदलत्या
वर्षाच्या साक्षीने बंगळुरूसारख्या मोठ्या शहरात बदलत्या पिढीचे प्रतिनिधित्व
करणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग होत होता. नसते उठले आवाज, नसत्या झडल्या अर्थहीन आणि
परिणामहीन चर्चा याही घटनेविषयी, तर ही घटनादेखील काळाच्या कुठल्याशा कोपऱ्यात
वळचणीला दडपली गेली असती इतर एक, दोन, तीन, अनेक, अनंत, रोजच घडणाऱ्या घटनांसारखी.
मात्र, सीसीटीव्हीच्या डोळ्यांनी ही घटना टिपली आणि मग सुरू झाले चर्वितचर्वण न
संपणारे. आम्ही तर रोजच अनुभवतोय असे प्रसंग. कधी गर्दीचा फायदा घेऊन होणारे नकोसे
स्पर्श, नकोसे इशारे, नकोशा नजरा... करतोच आहोत की सामना या सगळ्यांचा
वर्षानुवर्षे, युगानुयुगे... अगदी रामायणकाळापासून. रामासारखा योद्धा पती असलेल्या
सीतेलाही सहन करावा लागला रावणाचा हिडीस स्पर्श, स्वीकारावी लागली त्याची कैद आणि
प्रियतम पतीने स्वीकारावे म्हणून द्यावी लागली आपल्याच पवित्रतेची अग्निपरीक्षा.
अहल्येलाही मिळाली होती शिक्षा मनविहीन, भावनाविहीन दगड बनण्याची... न केलेल्या
चुकीसाठी. आणि बघावी लागली होती वाट राम नावाच्या पुरुषाचीच उद्धारासाठी.
महाभारतातली द्रौपदीही नव्हती अपवाद या अवमानाला. पाच योद्धे पती समोर असताना
दु:शासनाने केली फरपट भरसभेत, दुर्योधनाने दाखवली उघडी मांडी आणि कर्णानेही केली
निर्भर्त्सना. आजही आम्ही होतोच आहोत अवमानित. घरी, दारी, बंगल्यात आणि झोपडीतही.
काळ बदलतोय की सोकावतोय आमच्यासाठी न कळे! जिजाऊ, सावित्रींनी प्रशस्त केलेल्या मार्गावर पावले टाकत आम्हीही कर्त्या झालो आहोत. मोठ्या पदव्यांचे आणि पदांचेही रेशमी वस्त्र परिधान करून जगभर मिरवतो आहोत. पण, पुरुषी अहंकाराने लादलेले अवमानाचे लक्तर काही पाठ सोडत नाही. उलट, अवमानाच्या या कुरूप खुणा दिवसेंदिवस अधिकच बटबटीत होत जाताहेत, अस्वस्थ करताहेत समाजमन. "तितलियों के पखों पर रख दिये गये पत्थर, रेशमी लिबाजों को चिरते है कुछ खंजर' हीच तर स्थिती आहे ना! मग कुणी म्हणते, कायदे कठोर करा. कुणी म्हणते, कठोरातली कठोर शिक्षा करा. कुणी म्हणते, कपडे बदला. कुणी म्हणते, सातच्या आत घरात व्हा. कुणी म्हणते, कराटे शिका. कुणी म्हणते, मोबाईल ऍप डाउनलोड करा. कुणी म्हणते, जोरात ओरडा. कुणी म्हणते, तीच जबाबदार, तिचे कपडे जबाबदार, तिचे दिसणे जबाबदार... कधीतरी कुणी म्हणेल तिचे असणेच जबाबदार... त्याची वृत्ती जबाबदार, असे कुणी का म्हणत नाही? त्याची दृष्टी वाईट, असे कुणी का म्हणत नाही? त्याने बदलावे, असे म्हणण्याची हिंमत कुणी का करीत नाही? पुन्हा हव्या आहेत सावित्रीबाई, आमच्या मनगटात ताकद भरण्यासाठी. आमच्या मनात स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत प्रज्वलित करण्यासाठी. अवमानाविरुद्ध ठाम उभे राहण्यासाठी. त्याला त्याच्या चुकीचा जाब विचारण्यासाठी. हवी आहे पुन्हा एक जिजाऊ परस्त्रीविषयी आदर बाळगण्याचे बाळकडू पाजणारी. आणि हो, हवा आहे एक शिवबाही आयाबहिणींच्या अब्रूसाठी रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडणारा, शत्रूच्या सुनेचाही साडीचोळी देऊन गौरव करणारा, तिच्यातही आपली आई पाहणारा. प्रत्येकच ऋतुचक्रात शिशिर येतोच, पानगळ होतेच. मात्र, हा शिशिर वसंताच्या आगमनाची शुभवार्ता घेऊन येतो. वठलेल्या झाडांना आशेची लुसलुशीत पालवी येते. पण, मैत्रिणींनो, आमच्या जीवनातला शिशिर सरता सरत नाहीए. वठलेल्या बुध्यांना प्रतीक्षा आहे नवसंजीवनी देणाऱ्या वसंताची. तो वसंत फुलविणे तुमच्या-माझ्याच हातात आहे. गरज आहे प्रत्येक स्त्रीने जिजाऊ बनण्याची, आपल्या मुलाच्या मनात महिलांविषयी आदरभाव निर्माण करण्याची. एवढे जरी आपण केले, तरी नक्कीच अशा नकोशा घटनांची संख्या कमी होईल. आपण जागरूक झालो तर सरकारने शाळा-महाविद्यालयातून लैंगिक शिक्षण दिले किंवा न दिले तरी फरक पडणार नाही. थोडासा संकोच बाजूला ठेवून आपल्या घरातल्या मुलामुलींना वास्तवाची जाणीव करून द्या. स्त्री आणि पुरुषाच्या शरीराचे वेगळेपण सांगा. मात्र, स्त्रीलाही मन असते, हे सांगायला विसरू नका. अर्धे प्रश्न तिथेच संपतील आणि हळूहळू का होईना, वसंताचे आगमन होईलच. पुरे झाली असोशी संसाराची, समाजाची. आता घ्यायलाच हवा शोध माझ्यातल्याच "मी'चा. तन्वीर गाझी म्हणतो त्याप्रमाणे- तु खुद कि खोज में निकल तु किस लिये उदास है तु चल तेरे वजुद कि समय को भी तलाश है | ||||||
Subscribe to:
Posts (Atom)