Powered by Blogger.

Wednesday, 17 May 2017

मनमीत

पाऊस...
सृष्टीची आरास
धुंद मधुमास
पाऊस...
पानांची सळसळ
प्राजक्‍ताचा दरवळ
पाऊस...
हळवा मृद्गंध
मन बेधुंद
पाऊस...
पक्षांचं कुजन
धरतीचं सृजन
पाऊस...
शहारली प्रीत
पाऊस मनमीत

स्वाती हुद्दार


 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह